जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

धर्माच्या दलालांची चांदी... करूया शाळा बंदी ! नव्या सरकारचा फतवा

भूतकाळ

१०५ वर्षापूर्वी करवीर संस्थानने प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याचा कायदा केला.यावर्षी शाहूंची स्मृतीशताब्दी वर्ष आहे. परवा कर्मवीर भाऊराव अण्णांची जन्मतिथी होती.त्याबद्दल वेगळ लिहायची गरज नाही. 

आता वर्तमानकाळ.

फडणवीस मुख्यमंत्री असताना विनोद तावडेंनी शाळांसाठी नवीन धोरण आणल होत , नव्याने आघाडी सरकार जाऊन भाजप सरकार सत्तेत आल्यावर शिक्षण खात्याने पुन्हा फतवे काढायला सुरुवात केलीय. 

पूर्वप्राथमिक साठी २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करून २ किलोमीटरच्या आतल्या शाळेत समायोजित करणार.प्राथमिक साठी ३ किलोमीटर आणि माध्यमिक साठी ५ किलोमीटर अस धोरण आहे.

शिक्षकांना पण समायोजित केल जाणार आहे. शिक्षकांना नोकऱ्या आणि पगार अबाधित राहिल्यावर रडगाणं असलंच तर बदलीच्या जागेच असेल.

पण प्रश्न शाळेत येणाऱ्या लेकरांच्या भविष्याचा आहे.

मुळात गावातल्या शाळेत येणारी मुल सगळी गावातच राहणारी नसतात.आजूबाजूच्या वाडी वस्तीवरून येणारी मुल आताच ज्या शाळेत येतात ती येताना २-३ किलोमीटर वरून येतात.त्यांच्यासाठी हे अंतर अजून वाढेल. माध्यमिक मधली मुल तर आताच ७-८ किलोमीटर पायपीट करतात तिथे हे अंतर अजून वाढेल.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था , सायकलीची उपलब्धता , आर्थिक बाजू ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शाळेपर्यंत यायलाच दमवून टाकतात. अशी थकून भागून आलेली मुल काय आणि कस शिकणार हाही प्रश्न आहे.

राजेहो, या प्रश्नाला ग्रामीण महाराष्ट्राच्या अंगाने बघा, शहरात ऑटोरिक्षा असते, मोठ्या खाजगी शाळांच्या स्कुल बस असतात, ग्रामीण भागात ज्यांना खाजगी शाळांची फी परवडत नाही त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही का ?

आई बाप शेतात राबणारे किंवा दुसऱ्याकडे मोलमजुरी करायला जाणार असतील तर या लेकरांना हाताला धरून तीनचार किलोमीटर शाळेत कोण नेऊन घालणार ? घरची म्हातारी माणस डोळ्याला दिसत नाही,चालायला येत नाही म्हणून घरात बसलेली असताना या पोरांच्या शाळेत जाण्याच्या वाहतुकीची व्यवस्था काय ? 

रोजगार बुडवून रोज शाळेत नेउन घालायला जमत नसेल तर पोरांची शाळा सुटणार आणि बालकामगार म्हणून ही पोर कुठंतरी घमेले उचलून घराला हातभार लावणार.

वर आपण शहरात बसून " ग्रामीण भागातल्या मुलांची स्पर्धात्मक क्षमताच नसते " म्हणून नाक मुरडून मोकळे होणार.

मुद्दलात एकीकडे सरकार शिक्षणाच्या हक्काचा कायदा करतय आणि दूसरीकड शाळा बंद करतय.

आर्थिक मुद्दा महत्वाचा आहेच , त्याबद्दल दुमत नाही.शाळांचा खर्च परवडायला पाहिजे पण त्याचबरोबर आपण पुढल्या पिढ्या घडवायला जर हि गुंतवणूक करत असू अस जर म्हणतोय तर मग दूसरीकड कुठेतरी खर्च कमी करून ह्या प्रश्नाचा सुवर्णमध्य काढला पाहिजे आणि कमीत कमी अंतर पायपीट करून मुलांना शिक्षण मिळाल पाहिजे.

शिक्षणावर केलेला एकेक रुपया हा अकाउंट च्या भाषेत भलेही खर्चात नोंदवला जात असेल मात्र ही पुढल्या पिढ्या घडवायला केलेली गुंतवणूक आहे.अशी गुंतवणूक करणे हेच तर लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेच काम असत.

अर्थात “ १८५७ पूर्वीची शिक्षणव्यवस्था आदर्श होती “ म्हणणाऱ्या फडणवीस आणि संघाला ग्रामीण भागातली, डोंगराळ भागातली बहुजनांची पोर शिकलेली नकोच आहेत त्यामुळे फडणवीस सत्तेत आल्यावर शाळा बंद केल्या जातीलच यात शंका नाही. 

हिंदुत्व उरावर घेतल्यावर आपण नेमका कोणता धोंडा उरावर घेतलाय हे बहुजनांना समजाव म्हणून पोस्ट प्रपंच. 

आनंद शितोळे 

#रविवारची_पोस्ट

#शाळा_बंदी

#शिक्षणविरोधी_सरकार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!