जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

पोलीस अत्याचारविरुद्ध मी आवाज उठवत आहे मित्रांनो तुमची साथ हवी आहे: ऍड अमित शिंदे

पोलीस अत्याचारविरुद्ध मी आवाज उठवत आहे मित्रांनो तुमची साथ हवी आहे: ऍड अमित शिंदे

#पोलीसअधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्येच सर्व पोलिसांसमक्ष केली तक्रारदाराला मारहाण
ज्याला मारहाण केली त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची तयारी

मी #ऍड_अमित_शिंदे. #सांगलीमध्ये गेली 12 वर्षे विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय पणे काम करत आहे. सांगली जिल्हा सुधार समिती या संघटनेची व त्यानंतर राजकीय पक्षाची मी स्थापना केली व त्या माध्यमातून नागरी व सामाजिक प्रश्नावर मी काम करत आलो आहे. आज दि. २३/०६/२०२२ रोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रसंग माझ्या बाबतीत घडला. एका तक्रारीच्या निमित्ताने मी आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख श्री गेडाम साहेब यांना भेटलो व त्यांच्या सूचनेनुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये दुपारी १२ च्या सुमारास गेलो. माझ्यासोबत माझे पक्षकार महेश शिंदे व माझी पत्नी ऑड अरुणा शिंदे उपस्थित होते. त्यावेळेस विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुजारी यांनी मला व ज्या व्यक्तीची तक्रार आहे त्या व्यक्तीला वर्धन नावाच्या एपीआय सिकंदर विष्णू वर्धन कडे पाठवले. 

सदर वर्धन या अधिकाऱ्याने मला तक्रार कशी चुकीची आहे हे सांगण्यास सुरवात केली. त्यावेळी मी त्यांना तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर करा नसेल तर तस स्पष्टपणे सांगा मी पुढची कार्यवाही करतो अस सांगितलं. त्यामुळे तो अधिकारी अचानकपणे माझ्याशी जोरजोराने बोलून हुज्जत घालायला लागला. मी त्यांना तुम्ही चुकीचं बोलत आहात अस सांगताना, त्याने मला हे तुझं कोर्ट नाही अशी भाषा वापरली. त्यावर मी सुद्धा मी तुमचा कर्मचारी नाही असे उत्तर दिले असता त्याने "तू कोणपणे असशील मला फरक पडत नाही इथं मी इनचार्ज आहे, निघ इथून" असे अपमानास्पद बोलून मला पोलीस ठाण्याच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी मी त्याला "ही भाषा चुकीची आहे, तुम्ही माझ्याशी असे बोलता, मग सर्वसामान्य लोकांशी कसे बोलत असाल? चुकीचं वागल्यामुळे आम्ही सांगलीकरांनी आंदोलन केल्यामुळे पीआय, एस पी यांना देखील सांगलीतून जावे लागले आहे हे विसरू नका" असे म्हटले.त्यानंतर वर्धन हा रागाने खुर्चीवरून उठला व मला पीआय कडे चल तुला दाखवतो असे म्हणाला. त्यावर मी सुध्दा चला मी काही चुकीचं केलं नाही असं म्हणून पीआय पुजारी यांच्याकडे गेलो. त्यावेळी वर्धन मला एकेरी भाषेत बोलून "चल इथून" असे म्हणून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस देखील मी त्याला "व्यवस्थित वागा व एकेरी भाषेत बोलला तर मला सुद्धा एकेरी बोलावे लागेल" असे म्हटल्यावर *वर्धन याने पोलीस निरीक्षकासमोर माझ्या कानाखाली मारली व मला लाथा मारण्याचा प्रयत्न केला. त्याला मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिस निरीक्षक पुजारी नी मला ठाणे अंमलदारच्या कक्षामध्ये नेले.*

 त्यावेळी मी एसपी गेडाम साहेब यांना फोन करत असताना वर्धन यांने माझा मोबाईल हिसकावून घेतला व पाडला. त्यावेळी माझा फोन एस पी नी उचलल्याचे लक्षात आल्याने पुजारी यांनी मला फोन तात्काळ परत केला. मी एस पी ना सविस्तर हकीकत सांगितल्याने पुजारीनी मला पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन बसवले.

त्यानंतर माझ्यावरच शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दाखल करा असा पवित्रा वर्धन याने घेतला. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून सांगली जिल्ह्यामध्ये सामाजिक आंदोलनातून तसेच वकिली करून नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्याच्या आवारात एक माथेफिरू पोलीस कायद्याची भाषा बोलल्यावर चक्क मारहाण करत असेल व माझ्यावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत असतिल तर यावरून अनिकेत कोथळे प्रकरणानंतर देखील पोलीस खात्यामध्ये कोणतीच सुधारणा झालेली दिसत नाही हेच स्पष्ट होते.

नागरिकाला #पोलीसस्टेशन मध्ये #मारहाण करणे हे शासकीय काम असेल व अशा मारहाण करनाऱ्या पोलिसाचा प्रतिकार करणे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला अडथळा करणे असेल तर होय मी हा अडथळा केला आहे आणि त्याबद्दल पोलिसांनी माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करावा. त्याचा मी ठामपणे मुकाबला करेन. 

परंतु विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या एपीआय #सिकंदर विष्णू वर्धन या गुंड पोलिसांच्या गुंडगिरी विरोधात व चुकीचा असून देखील वर्धनला सहकार्य करणाऱ्या पोलिसांविरुद्ध मी आता तीव्र लढा देत आहे* पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या नागरिकांवरच गुरगुरणार्या वर्धन सारख्या पोलिसाला सदरक्षणाय खलनिग्रहाय म्हणजे काय हे समजावून सांगण्याची पुन्हा एकदा वेळ आहे.

आपला ऍड #अमितशिंदे 
९३७२३९१५५०.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!