जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बातमी दिली म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात... NUJ ने केली पत्रकाराची सुटका

वृत्तांकन करणे गुन्हा आहे का?  आटपाडीत पत्रकाराचे नाव आरोपींच्या यादीत !

रात्रभर ठेवले पोलीस ठाण्यात, आटपाडी पोलिसांचे निंदनीय कृत्य !

एनयुजे महाराष्ट्राच्या प्रयत्नाने सुटका, दोषींवर बडतर्फीची मागणी

मुंबई(प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारालाच कोणतीही शहानिशा न करता  आरोपी म्हणून गुन्ह्यातील यादीत नाव दाखल करून,त्यांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवसापर्यंत पोलीस ठाण्यात ठेवले. फिर्यादी व पोलिसांच्या या निंदनीय  प्रकारामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला,पत्रकारितेला सुरुंग लावण्याचा प्रकार आटपाडीमध्ये घडला आहे. आटपाडीतील घटनेचा तीव्र निषेध करीत याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर निलंबनासह बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या अध्यक्षा व एनयुजे इंडियाच्या राष्ट्रीय सचिव शीतल करदेकर यांनी केली आहे.त्यांच्या कणखर प्रयत्नांमुळे दुसऱ्या दिवशी या पत्रकाराची पोलिस ठाण्यातून सुटका करण्यात आली आहे.
आटपाडी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रस्त्याच्या कामावरुन एका राजकीय पक्षाचे नेते अनिल पाटील व सार्वजनिक बांधकाम विभाग आणि 'राजपथ' ठेकेदार कंपनी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून संघर्ष सुरू आहे.मूळ मंजूर असलेला व गायब झालेला रस्ता झाल्याशिवाय आटपाडीतील काम होऊ देणार नाही,असा वारंवार इशारा निवेदने देऊन व आंदोलने करून अनिल पाटील यांनी प्रशासनाला दिलेला आहे. 
शुक्रवार दि.१७ सप्टेंबर रोजी ठेकेदार राजपथ कंपनीने आटपाडी येथील आबानगर चौकामध्ये कामास सुरुवात केली.त्यावेळी अनिल पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह उपस्थित राहून हे काम बंद करण्याचा प्रयत्न केला.यावेळी कामावर सुरू असलेले ग्रेडर मशीन फोडण्यात आले व काम बंद पाडले.

आटपाडी येथील 'प्रगल्भनायक'चे तालुका प्रतिनिधी पत्रकार नरेंद्र दिक्षीत यांच्या घरापासून काही अंतरावर व दृष्टिक्षेपातच हा प्रकार घडत असताना त्यांनी तेथे जाऊन या घटनेचे फोटो व व्हिडीओ चित्रीकरण करून वृत्तांकन केले व त्याचे वृत्त प्रकाशित केले.
सायंकाळी अनिल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये गु.नं. ३५७/२०२१  दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये वृत्तांकन करणारे पत्रकार नरेंद्र दिक्षीत यांचे नाव यात दाखल करण्यात आले.याप्रकरणी केवळ ठेकेदाराने नाव सागितले आणि आटपाडी पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराचे नाव आरोपींच्या यादीत घालून गुन्हा दाखल केला.हा निंदनीय व धक्कादायक प्रकार पोलीस व ठेकेदार याचे संगनमताने झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही !  यांनी थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच सुरुंग लावण्याचे काम केले आहे. एवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत, तर त्यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकार दिक्षीत यांच्या आबानगर चौकातील निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवसापर्यंत पोलीस ठाण्यात ठेवले. वृत्तांकनाशिवाय त्यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसताना चुकीच्या पद्धतीने नाव दाखल करून पोलीसांनी पत्रकार सुरक्षा कायद्याचीही पायमल्ली केली आणि निर्दोष पत्रकारांवर अन्याय व विविध प्रकारे त्रास देण्याचे काम केले आहे.
या घटनेबाबत पोलिस निरीक्षक निंभोरे  यांच्याशी इतर पत्रकार सहका-यांनी भेटून संवाद साधला असता  त्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराचे नाव आरोपींच्या यादीत घातल्याचे समजल्यानंतर व निरीक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (एनयुजे) महाराष्ट्र च्या अध्यक्ष व एनयुजे इंडिया च्या राष्ट्रीय सचिव  शीतल करदेकर व सांगली जिल्हाच्या टीमने वरिष्ठ पातळीवरून न्याय्यासाठी प्रयत्न केले. शीतल करदेकर यांनी सांगली जिल्ह्याच्या टीमला  मार्गदर्शन करून रात्रीतच वरिष्ठ कार्यालये व राज्यस्तरावर निवेदने दिली.तसेच या निंदनीय व अपमानकारक घटनेचा निषेध नोंदविला.
शीतल करदेकर यांच्या कणखर प्रयत्नातून दुसर्‍या दिवशी पत्रकार दिक्षीत यांना मुक्त करण्याच्या हालचाली होऊन त्यांची सुटका करण्यात आली.
कोणतीही शहानिशा न करता बेफिकीरपणाने घटनेशी वृत्तांकनाशिवाय संबंध नसताना केवळ  आकसाने पत्रकारावर  डोळे झाकून गुन्हा दाखल करणे ही निंदनीय व क्लेशदायक बाब संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे.या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात आला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनासह बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी होत आहे.
  
बांधकाम विभागाचा बकराही दोषी

 'पत्रकार दिक्षीत यांनी यापूर्वी या घटनेशी संबंधित घडलेल्या सर्व आंदोलनाच्या व घटनांच्या बातम्यांचे वृत्तांकन केले होते.त्याचा राग मनात धरून की काय? परंतु बांधकाम विभागाने दिलेल्या फिर्यादीत पत्रकार दिक्षीत यांचे या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून नाव समाविष्ट केले आहे.बांधकाम विभागाच्या या अधिकाऱ्याच्या बुडाखाली अंधार असताना व त्यांचे काळे कारनामे उघड होत असताना सैरभैर झालेल्या अधिकाऱ्याने आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी थेट पत्रकाराचा बळी घेतला आहे',अशी आटपाडीत चर्चा आहे. 

त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यावरही बडतर्फीची कारवाई केल्याशिवाय यापुढे घडणार्‍या अशा घटनांना आळा  बसणार नाही,असे मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रशासन व राज्यकर्ते पत्रकारांवर पूर्ववैमनस्यातून, सूडबुद्धीने डाव साधण्यासाठी टपून असतात.कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतात.यामुळे निर्दोष पत्रकाराला विनाकारण त्रास होतो. त्यांची गळचेपी होते.वृत्तांकन करणाऱ्या निर्दोष पत्रकाराला यापुढे आकसापोटी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभरातून आवाज उठवण्यात येईल,असा इशाराही शीतल करदेकर यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!