डॉ वर्षा चौरे यांच्या यशराज ओरल हेल्थ अँड एस्थेटिक्स क्लिनिकची धमाकेदार सुरुवात
नेरूळ नवी मुंबई येथे यशराज क्लिनिकचे उद्घाटन
नेरुळवासियांच्या सेवेत नवे क्लिनिक
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई मधील नेरूळ येथे नुकतेच डॉ वर्षा रा. चौरे यांच्या यशराज ओरल हेल्थ अँड एस्थेटिक्स क्लिनिकचे नवी मुंबई महानगरपालिका वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ विजय एस देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वर्षा रा. चौरे या मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील असून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण नवी मुंबई मधील तेरणा डेंटल कॉलेज नेरूळ येथून पूर्ण केले आहे. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन (पद्मा) या संस्थेच्या पदाधिकारी असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असतात.
डॉ वर्षा यांनी नेरूळ मधील सेक्टर ३ येथे पोस्ट ऑफिसच्या जवळ आपले यशराज ओरल हेल्थ अँड एस्थेटिक्स क्लिनिक सुरू केले असून नुकताच उद्घाटन समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सद्गुरू पतसंस्थेचे संचालक विरेंद्र लगाडे, सिडको कार्यकारी अभियंता कल्याणराव पाटील उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेत कार्यरत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा पद्मा संस्था अध्यक्ष डॉ अरुण गावडे, ओ एफ आय इंडिया कंपनीचे उप महाव्यवस्थापक संदीप माने, ब्रहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक महाव्यवस्थापक तथा पद्मा संस्था सचिव डॉ मनोजकुमार माने, अँडव्हिजन ग्राफिक्स अँड मीडिया संचालक विनोद कांबळे व सीमा कांबळे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक प्रसाद सास्तुरकर, राष्ट्रवादी बेलापूर विधानसभा अध्यक्ष दिनेश ठाकूर, आर व्हिजन चे संचालक रेडिओलोजिस्ट डॉ शंकर चोपडे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुवर्णा माने, महाराष्ट्र राज्य मंत्रालय कक्ष अधिकारी तथा पद्मा संस्था संचालक डॉ ललित धायगुडे, अथर्व डेंटल क्लिनिक संचालक तथा पद्मा संस्था सदस्य डॉ रुक्मिणी धायगुडे, तसेच अक्षय खाडे, बाबासाहेब मासाळ, डेंटल चेअर टेक्निशियन दंडणाईक, किरण कुटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!