सदामामांच्या आई श्रीमती आक्काताई पावले यांचे निधन
गडहिंग्लज : श्री.अरुणभाई गुलाब गवळी उर्फ डॕडी यांचे निकटवर्तीय सहकारी मित्र व भायखळा दगडीचाळ नवरात्रौत्सव मंडळाचे कट्टर कार्यकर्ते कै.सदानंद भीमराव पावले (सदामामा) यांच्या आई श्रीमती आक्काताई भीमराव पावले यांचे, आज दि. ११ /११/२०२० रोजी पहाटे ४:३० वाजता, त्यांच्या राहत्या घरी पोस्ट बहिरेवाडी, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा-मुलगी, सुना, नातवंडे असा मोठ्ठा परिवार आहे.
भायखळा दगडीचाळ नवरात्रौत्सव मंडळ, अखिल भारतीय सेना पक्ष, दगडी चाळीतील रहिवाशी, त्रिवेणी सदन रहिवाशी, करीरोड आणि मित्रपरीवार त्यांच्या दुःखात पावले कुटुंबियांसोबत सहभागी आहेत. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो.
रक्षा विसर्जन उद्या दि. १२/११/२०२० रोजी बहिरेवाडी स्मशानभूमीत सकाळी १० वाजता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!