मराठ्याचा पुन्हा एकदा आक्रोश- सोलापूर बंद यशस्वी
नातेपुते( श्रीकांत बाविस्कर) : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने मराठा समाजाने 21 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या बंदला सर्व समाजाने पाठिंबा दिल्याने बंद 100% यशस्वी झाला. मराठा क्रांती मोर्चाने शहरातील मुख्य बाजारपेठ नवी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला नवी पेठ, सराफ बाजार येथील व्यापाऱ्यांनी भरघोष पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बंद यशस्वी झाला.
आंदोलना दरमान्य मराठा युवकांनी घोषणा देवुन सरकार विरोधातील नाराजी व असंतोष व्यक्त केला. तसेच शहरातील सर्वच समाजाच्या नेत्यांनी नवी पेठ येथील आंदोलन स्थळी भेट देवुन पाठिंबा दिला. तसेच आंदोलनकर्त्यानी गृह विभागाने काढलेल्या पोलीस भरतीचा निषेध नोंदविला. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत पोलीस भरतीसह, महाराष्ट्रात कोणतीही नोकर भरती करू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी करण्यात आली.
तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील एस.ई.बी.सी. प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवून त्यांची या वर्षाची शैक्षणिक फी शासनाने भरावी. तसेच मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल होईपर्यंत नियोजित पोलिस भरती व महाराष्ट्रातील सर्वच पदांच्या नोकर भरतीस तातडीने स्थगिती देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. मराठा समाजाचा विरोध डावलुन पोलीस भरती केल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी देण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे, देवेंद्र कोठे, संतोष भोसले, प्रताप चव्हाण, नाना मस्के, श्रीकांत घाडगे, अमोल शिंदे, मनोज गादेकर, जॉन फुलारी, अशोक मुळीक, योगेश पवार, संजय शिंदे, दास शेळके, महेश धाराशिवकर, सुनील रसाळे, बाळासाहेब गायकवाड, मनोज शिंदे, मतीन बागवान, दिनेश शिंदे, राम गायकवाड, फारूख शेख, राजु हुंडेकरी, शेखर फंड, दिनेश जाधव, विजय पोखरकर, अमोल जाधव, जयवंत सुरवसे, संजय पारवे, शिरीष जगदाळे, रतिकांत पाटील, राहुल काटे, निलेश शिंदे, विष्णु माने, नागेश घोरपडे, सचिन महामुनी, मनोहर गोयल, प्रदीप भंडगे, सागर शिंदे, ओंकार लोखंडे, गणेश चिन्नवार यांसह असंख्य मराठा युवक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!