महाराष्ट्र पोलिसांच्या नावाने बनाव... महाराष्ट्र द्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी
मुंबई पोलिसांचा व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडीओने मुंबईकरांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत “१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते”, असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल मेगा माईक वरून घोषणा करताना दिसतो. हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने मुंबईसह उपनगरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र हा व्हिडिओ आणि मॅसेजमुळे लोकं पॅनिक झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली, त्यानंतर जे सत्य बाहेर आलं ते संतापजनक आहे.
हा व्हिडिओ सोनी लाईव्ह या वाहिनेने आपल्या नवीन येणाऱ्या एका सिरीयलचे प्रमोशन करण्यासाठी तयार केल्याचे कळते आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबई पोलिसांचा नसून सोनी लाईव्ह वाहिनेने तयार केला असून त्यांच्या प्रमोशनसाठी तो व्हायरल करण्यात आला असल्याची महिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने या व्हिडीओ ची दखल घेतली आहे.
सध्या राज्य व देश मेडिकल इमर्जन्सी मध्ये असताना सवंग लोकप्रियतेसाठी सोनी लाईव्ह ने हा नीच आणि घाणेरडा प्रकार केला आहे. त्यामुळे काही नागरिकांनी सोनी लाईव्ह ओटीटी प्रोव्हायडर वर राज्यद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!