भाजपचा शेतकरी कामगार विरोधी कायदा मोडून काढू : ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील
गारगोटी दि.१६ ( प्रतिनिधी ) -
आज देशात दोनच गोष्टी वाढतात त्या म्हणजे मोदी साहेबांची दाढी आणि बेरोजगारी या पलिकडे काही वाढत नाही.भाजपने केलेला कायदा हा शेतकरी, कामगाराच्या विरोधातला असून त्याचा फायदा फक्त भाजपच्या मित्रांनाच होणार आहे.यासाठी ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शेतकरी, कामगार हितासाठी कॉंग्रस पक्ष कायमपणे लढत ठामपणे पाठीशी उभा राहाणार असल्याची ग्वाही ना.बंटी पाटील यांनी डिजिटल रँलिच्या भाषणात दिली.
राज्यातील प्रत्येक तालुका कॉग्रेस कमिटीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत रँलि प्रक्षेपित झालेल्या संगणकासमोर बसून या रँलीत सहभाग घेतला. भुदरगड तालुका कॉंग्रेस कमिटीनेही शेणगांव ग्रामपंचायतीच्या सभाग्रहात या डिजिटल रँलित सहभाग घेवून उपस्थीतांचे प्रबोधन केले.यावेळी तालुका अध्यक्ष शामराव देसाई यांच्यासह भुदरगड तालुक्यातील कॉग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.
यावेळी पुढे बोलताना ना.बंटी डी पाटील म्हणाले की, आघाडी सोबत राहून कॉग्रेसने राज्यात कर्ज खात्याची योजना यशस्वीपणे राबवली आहे पण किमाव वेतनाबध्दललहा कायदा काही बोलत नाही.छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षि शाहू महाराज यांनी रयतेसाठी कायदे केले पण भाजप सरकारने या घटकांच्या विरोधातले हे कायदे बनवले आहेत.ते मोडून काढण्यासाठी कॉंग्रेस चे हे राज्यभर आंदोलन छेडले जात आहे.केंद्राने आताच्या नव्या कायद्यात कामगार क्षमता १०० वरून ३०० वर केल्याने शासनाच्या परवाणगीशिवाय उद्योग उभा करता येणार नाही.आहे ते उद्योग चालू शकणार नाहीत.यातील बहुसंख्य कामगार बेकार होणार म्हणून हा कामगार व शेतकरी विरोधी कायदा मोडून काढण्याचे काम राज्यभल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने घेतला आहे. यासाठी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीने शेतकरी कामगार हितासाठी भाजपविरोधी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.यासाठी राज्यात कोल्हापूर, औरंगाबाद,कोकण, अमरावती, संगमनेर, नागपूर अशा सहा ठिकाणी भव्य सभा एकाच वेळी घेवून त्याचे प्रक्षेपण तालुका कॉंग्रेस कमिटिच्या माध्यमातून राज्याच्या तळागाळापर्यंत ही आंदोलनाची मोहिम पोचवून जागृती केल्याचे दिसून आले.या आंदोलनाच्या रँलितून कॉंग्रेसच्या राज्य पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपवर तोफा डागल्या. आधुनिक काळाला अनुरुप असे हे नवे माध्यम पक्षासाठी हाताळले गेले. यासाठी भुदरगड तालुक्यातील कॉंग्रेस कमिटीने शेणगांव ग्रामपंचायतीच्या सभाग्रहात जय्यत तयारी केली होती.यावेळी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव देसाई यांच्यासह, प्रकाश देसाई , भुजंगराव मगदूम, अँड.संजय सरदेसाई, शेणगांव चे सरपंच सुरेशराव नाईक, गारगोटीचे माजी सरपंच राजू काझी, ओबीसी सेल चे अध्यक्ष संदिप चव्हाण, एस एम पाटील, दत्तात्रय चोडणकर, नामदेव भालदार, बाबालाल महात, शिवाजी पाटील, संजय कुंभार,सुभाष सणगर, दत्तात्रय।साळोखे, पांडुरंग येडूरकर, नाना नागरपोळे आदि मान्यवर, ग्रा प सदस्य ग्रामस्थ उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!