बांधकाम कामगारांच्या पेंडीग प्रश्नासाठी २० मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा
कोल्हापूर (प्रतिनिधी): बांधकाम कामगारांच्या राज्य व स्थानिक पातळीवरील पेंडीग प्रश्नासाठी २० मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय राज्य फेडरेशनच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे हे होते.या बैठकीस राज्य सिटु अध्यक्ष डॉ. डि. एल. कराड, राज्य जनरल सेक्रेटरी कॉ एम. एच. शेख यांनी मार्गदर्शन केले.
मागील २ व ३ हजार कोविड अनुदानापासुन अजुनही कांही नोंदीत व पात्र बांधकाम वंचित आहेत, त्यांना चालु १५००/-रूपयासह मागीलही कोविड अनुदान मिळावे, कोरोणा संसर्ग झालेल्या बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रूपय् मिळावे या व अन्य मागण्यांसाठी २० मे रोजी राज्यभरातील सर्व बांधकाम कामगार आपआपल्या दारात उभा राहुन शासन व कल्याणकारी मंडळाविरोधात तिव्र निदर्शने करणार असल्याची माहिती लाल बावटा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम यांनी दिली.
2011 साली हसन मुश्रीफ महाराष्ट्राचे कामगार मंत्री असताना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा व कल्याणकारी मंडळ स्थापन करून अनेक योजना तयार केल्या व महाराष्ट्रात पहिल्यांदा बांधकाम कामगारांना वेगवेगळे लाभ मिळू लागले, मात्र गेल्या 6 वर्षांमध्ये बराच खंड पडला आहे, अनेक योजना पेंडिंग आहेत, हजारो कामगार विविध लाभ,आणि नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्या सोडवणेसाठी कामगार मंत्री मान. हसन मुश्रीफ व कल्याणकारी मंडळाने तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे सर्व काम ऑनलाईन चालू केल्यामुळे फार मोठा गोंधळ बांधकाम कामगारांमध्ये निर्माण झाला आहे, तसेच मागील लाभाचे हजारो अर्ज मंडळाकडे पेंडिंगआहेत. आणि 2020 पासून कोविड 19 विषाणू प्रसारामुळे लाखो कामगारांना नूतनीकरण करता आलेले नाही व नूतनीकरण न झाल्याने लाखो कामगार नोंदणी आणि लाभापासून वंचित राहिले आहेत तसेच लाखो कामगारांना मागील कोविड काळातील २०००,३००० रुपयाचा लाभ मिळाला नाही, २०२० सालामध्ये २०००,३००० चा लाभ मिळाला त्यांनाच प्राधान्याने १५००/- रुपयाचा लाभ मिळत आहे, व बहुतांशी कामगार या सर्वच लाभापासुन वंचित रहात आहेत.
ऑनलाईन शोध पद्धती(searching) मुळे वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार वाढला आहे त्यामुळे नियमित नोंदणी, नूतनीकरण केलेल्या कामगारांचे हजारो अर्ज पेंडिंग राहिले आहेत, क्षुल्लक कारणावरून नोंदणी नूतनीकरण चे काम महिनो न महिने पेंडिंग ठेवले जाते, कामगाराचा ऑनलाईन अर्ज submit झाल्यानंतर wc आणि कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अर्ज तपासल्यानंतर बऱ्याच कामगारांना मेसेज जात नाही, otp जात नाही त्यामुळे त्रुटी दूर करणे अडचणीचे होत आहे, अर्जातील त्रुटी दूर करून ही तो अर्ज दोन तीन महिने तपासला जात नाही. नवीन कामगारांना स्मार्ट कार्ड मिळते आणि जुन्या कामगारांना फक्त ऑनलाईन पावती मिळते यासह खालील मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्वच नोंदीत आणि ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या कामगारांना कोविड अनुदान 2000,+3000+1500 ताबडतोब अदा करावे वाढीव लॉकडाऊनचे आणखी ५ हजार रूपये कोविड अनुदान द्यावे, बांधकाम कामगारांना घरबांधणी करीता दोन लाखाऐवजी प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान दिले जावे, डिसेंबर २०१९ अखेर ज्यांची नोंदणी जीवित होती अशा सर्व कामगारांना अवजारे खरेदी अनुदान देनेबाबत आदेश करावा, ६० वर्षावरील कामगारांना महिना रुपये ५०००/- पेंशन द्या,वशिला आणि भ्रष्ट शोध पद्धत(searching)बंद करा आणि ज्या अधिकाऱ्यांनी असे काम केले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, बोगस दाखला देणाऱ्यावर कडक कारवाई करावी, जिल्हावार नोंदणी आणि लाभार्थी यादी प्रत्येक महिन्याला जाहीर करा, मंडळाच्या 5 टक्के निधीतून प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने कायमस्वरूपी आवश्यक स्टाफ भरा, भांड्याचे अनुदानाची रक्कम कामगाराच्या बँक खात्यात जमा करा,ऑनलाईन अर्ज दाखल केलेनंतर आणि त्रुटी पूर्ण केलेनंतर 8 दिवसात तपासून कामगारांना स्मार्ट कार्ड द्यावे तसेच नूतनीकरण केलेल्या कामगारांना ही पावती ऐवजी स्मार्ट कार्ड द्यावे, कामगारांना व त्यांचे पाल्याना सायकल घेणेकरिता अनुदान द्या, नोंदीत महिला कामगारांना मातृत्व लाभ म्हणून 6 महिने, महिना ३००० रुपये अनुदान मिळावे, बांधकाम कामगारांचे एका मुलीच्या लग्नकारिता 1 लाख रुपये अनुदान दया
सदर मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी तसेच सविस्तर चर्चा करण्यासाठी ताबडतोब मंडळाच्या सदस्यासोबत बैठक लावुन सिटू च्या प्रतिनिधींना त्यामध्ये सहभागी करून वरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही मान. मुख्यमंत्री, उद्धवजी ठाकरे, कामगार मंत्री मान हसन मुश्रीफ , मंडळाचे सचिव मान. श्रीरंगम यांच्याकडे मेलव्दारे करण्यात आली आहे.
तरी दारात उभा राहुन करण्यात येणाऱ्या या आंदोलनामध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोदवावा असे अहवानही कॉ भरमा कांबळे व कॉ शिवाजी मगदूम यांनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!