आप्तांनी दूर केलेल्या ब्राम्हणाचे उत्तर कार्य मुस्लिम समाजातील तबलिगीनी केले
केवळ धार्मिक कट्टरपंथी सदस्यांच्या माहितीसाठी...
आज पुण्यामध्ये एमबीबीएस डाॅ. रमाकांत जोशी वय ७९ हे हृदय विकाराने मृत झाले. एक मुलगा आहे, पण तो अमेरिकेत डाॅक्टर आहे; आणि पत्नी वृध्द आहे... वय ७४. करोनाकाळ असल्यामुळे घाबरून कोणीही नातेवाईक भाऊबंद जवळ यायला तयार नाहीत.
ही घटना तब्लिग जमातीचे काम करणाऱ्या युवकांना कळली. त्यांनी लगेच माणुसकीच्या नात्याने सर्व व्यवस्था करून प्रेताला खांदा देत स्मशानभुमीपर्यंत नेऊन अंत्यसंस्कार केले.
ही आहे आपल्या देशातील विविधतेतील एकता. एकदा मुस्लीमांना आपुलकी दाखवा, ते तुमच्यासाठी जीवसूद्धा देतील. मुस्लीम समाजातील ह्या जमातीचे लोक कोठेही कधीही धडाडीने काम करत असतात.
लोक म्हणतात की, मुस्लमान वाईट लोक असतात. पण हे खरे नाही. उलट वाईट वेळेस मुस्लिम समाज असा कामाला येतो. सर्व धर्मातील समाजात अशी चांगली माणसे असतातच. फक्त त्यांच्यातला चांगुलपणा माणुसकीच्या नात्याने जपला पाहिजे. द्वेष करून मात्र फक्त अशांतता निर्माण होते. आपली भारतीय संस्कृती शेकडो वर्षे अशा प्रकारे सर्व धर्मियांना एकत्रितपणे एकमेकांना सांभाळून राहत आहे हे विसरून कसे चालेल?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!