जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

भारतीय सुद्धा काळेच, द्वेष भावना संपवा !

द्वेष भावना संपवा
सर्व 4 पोलिस अधिकार्‍यावर  आरोपपत्र दाखल झाले. जॉर्ज फ्लॉईड ह्या कृष्ण वर्णीय अमेरिकन नागरिकाला गोऱ्या पोलिसांनी अत्यंत निर्दयपणे मारले.आणि जगभर लोक कोरोना व्याधीने ग्रासले असताना देखील प्रचंड आंदोलन उभे राहिले. अमेरिकेच्या प्रत्येक शहरात आंदोलन उभी राहिली. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्ते राष्ट्रपती ट्रम्पच्या व्हाइट हाउस ह्या निवास्थनात घुसले. राष्ट्रपती पळून गेले. तसेच युरोपच्या प्रत्येक शहरामध्ये आणि जगामध्ये फ्लॉईडच्या हत्ये विरोधात जगभर आंदोलन होत आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना होताच  आहेत. काळे आणि गोर्‍यातील संघर्ष हा जुनाच आहे. अनेक भारतीय हिंदूंना सुद्धा अमेरिका आणि युरोप मध्ये मारण्यात आले. तुम्ही आमची नोकरी खात आहात. तुम्ही तुमच्या देशात परत जा. काळ्या माणसाचा द्वेष पूर्ण युरोप आणि अमेरिकेत मी पाहिला आहे. काळ्या माणसात भारतीय आणि पाकिस्तानच्या  लोकांचा सुद्धा समावेश आहे. 
ह्या विषयावर अमेरिकेत १८६१ ते १८६५ दरम्यान भयानक युद्ध झाले. इम्ब्राहीन लिंकन हे राष्ट्रपति झाल्यावर त्याने गुलामगिरीवर बंदी आणली. अमेरिकेतील दक्षिण राज्यामध्ये गुलामांच्या  आधारावर हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते.  गुलामगिरी नष्ट झाल्यामुळे दक्षिण राज्यातील सर्व शेतकरी अडचणीत आले. आणि त्या राज्यांनी अमेरिकेतून फुटून जावून नवीन देश बनविण्याचे ठरविले. इम्ब्राहीन लिंकनने ते मान्य केले नाही. मग उत्तर राज्य व दक्षिण राज्यामध्ये युद्ध सुरू झाले. इम्ब्राहीन लिंकन जिंकले. व गुलामगिरी कायदेशीर रित्या नष्ट झाली. पण गोर्‍या आणि कृष्ण वार्नियामध्ये द्वेष - भावना कायम राहिली. गोर्‍यांनी कुक्लूक्षक्लन नावाची कट्टरवादी संघटना बनवली. हे काळ्या लोकांना मारत होते. आज देखील अमेरिकीत ही संघटना गुप्तपणे जीवंत आहे. व भारतीयांसकट  सगळ्या कृष्ण वर्णीय विरोधात कमालीचे अत्याचार करत आहेत. 
             ह्या गोर्‍या संघटनावर एक प्रचंड चकराप म्हणजे २००८ मध्ये अमेरिकेतला पहिला कृष्ण वर्णीय राष्ट्रपती ओबामा बनला. तो अत्यंत यशस्वी ठरला. गोर्‍या व काळ्यांना एकत्र आणण्याचा त्याने भरपूर प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. त्याचा परिणाम म्हणून की काय डोनाल्ड ट्रम्प हा गोर्‍या कट्टरवादी संघटनेचा समर्थक राष्ट्रपती झाला. व त्याने ह्या  न त्या मार्गाने गोर्‍या वर्णाचा पुरस्कार केला आहे. या काळात अनेक काळ्या लोकांची हत्या झाली. त्यात भारतीय लोकांचा देखील समावेश आहे. २००० मध्ये अमेरिकन भारतीयांची संख्या USA मध्ये अर्धा टक्क्याहुन २०१० मध्ये १ टक्का म्हणजे २८ लाख झाली. न्यूयोर्क  मध्ये २०१७ साली २ लाख ५० हजार भारतीय वंशाचे लोक होते.  एका अहवालाप्रमाणे भारतातील सर्वात उत्कृष्ट लोक अमेरिकेमध्ये जातात. डॉक्टरांच्या संख्येमध्ये भारतीय अमेरिकेत दुसर्‍या नंबरवर येतात. भारतीय वंशाच्या लोकांचे सरासरी उत्पन्न १ लाख डॉलर आहे. त्या उलट मुळ अमेरिकन लोकांचे उत्पन्न सरासरी ५६ हजार डॉलर आहे. त्यामुळे गोरे कट्टरवादी भारतीय लोकांचा छळ करतात. अनेकांना रस्त्यात मारण्यात आले आहे. ह्या सर्वांचे कारण म्हणजे काळ्या गोर्‍या मधील द्वेष भावना.  प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रमाणात ही द्वेष भावना अस्तीत्वात आहेत. हिटलरने तर गोर्‍या आर्यन वर्चस्वाची नाझी संकल्पना बनवली. व 60 लाख जू लोकांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याला आणि त्यांच्या अनेक साथीदारांना आत्महत्या करावी लागली. आज प्रत्येक देशामध्ये त्यांचे समर्थक आहेत. 
              ब्रिटिश भारतात आले आणि आपल्या भांडणांचा उपयोग करून भारतावर 150 वर्ष राज्य केले. राज्य करण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणल्या. तोफा फोडा आणि राज्य करा ह्या  नीतीचा  अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापर केला. भारताच्या पहिल्या स्वतंत्र लढ्यात सर्व भारतीयांनी १८५७ साली शेवटचा मोगल बहादुर  शाह जाफरला  भारताचा सम्राट करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्याचा परिणाम  म्हणजे इंग्रजांनी हिंदू मुस्लिम फूट पाडण्याचे कारस्थान रचले. त्यातुनच पाकिस्तानचा जन्म झाला. महमद अली जिंन्हा हे काँग्रेसचे नेते होते. म्हणून ते मुस्लिम कट्टरवादी नव्हते असे निश्चितपणे सांगता येते. त्यांना पण भारताचे स्वतंत्र पाहिजे होते. पद्धत  वेगळी होती. जसे सुभाषचंद्र बोसची वेगळी होती. तेव्हा काँग्रेस मध्ये आता प्रमाणेच गट होते. त्यांच्यात मतभेद विकोपाला गेले म्हणून हे वेगळे झाले आणि वेगवेगळ्या मार्गाने गेले.  जिन्हा आणि पंडित नेहरूंना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व्हायचे होते. पण काँग्रेस पक्षात ते होऊ शकत नव्हते.  म्हणून ते मुस्लिम लीग मध्ये शामील झाले व मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तानची मागणी सुरू केली. विषय राजकीय महत्वाकांक्षेचा होता पण तो धार्मिक बाबींच्या आड लपवण्यात आला. 
                  हेच खरे सत्य आहे. राज कारणासाठी धर्म, जाती, भाषा उपयोगात आणले जातात. राज ठाकरे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. शिवसेनेतून तुटताना त्यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष - भावना उठवली. नंतर भाजप विरोधात प्रचंड प्रचार केला. आता हिंदुत्वादी झाले. सर्वच पक्ष हे नाटक करतात. कोण मुसलमानाचा मसिहा बनतो तर कोणी हिंदुत्व म्हणतो. दूसरा मराठ्यांचा नेता बनतो आणि एका निष्पाप मुलीवर बलात्काराचा उपयोग करून मराठ्यांसाठी आरक्षण मागतो. लोक प्रक्षोभाचा उपयोग करून नेता बनायला अनेक लोकांनी प्रयत्न केले. बलात्कार बाजूलाच राहिला. व आरक्षणासाठी चळवळ सुरू झाली. आता प्रत्येक जात आरक्षण मागत आहे. व त्यासाठी दुसर्‍या जातीचा द्वेष करणारे नेते बनत आहेत. कोणी दलिताचा नेता बनून राज्य सभा किंवा विधान परिषदेमध्ये जागा मिळवतो. तर कोणी दलित मुसलमानांना न्याय देण्यासाठी वंचित बनतो. हयातले बरेच वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते बनतात. आणि शेवटी येऊन अंबानी अदानीला मोठे करतात. 
             जगातील बहुतेक देशामध्ये अशा प्रकारे जाती, धर्म, भाषा यांच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करायला लावून राजकीय नेते आपली तुमडी भरत आहेत. नोव्हेंबर मध्ये अमेरिकन राष्ट्रपतीच्या निवडणुका होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प च्या पाठीमागे गोरे कट्टरवादी उभे आहेत. त्याचबरोबर कट्टर ख्रिश्चनवादी लोक देखील आहेत. त्यांच्या विरोधातील डेमोक्रटिक पक्षाबरोबर काळे, पिवळे लोक आहेत. त्यामुळे हा लढा आर्थिक प्रगतीपेक्षा धार्मिक कट्टरवादावर उभा आहे. हीच बाब सर्वीकडे आहे. पाकिस्तान मध्ये देखील सुन्नी आणि शिया मुसलमानात प्रचंड संघर्ष सुरू आहे. वेगवेगळ्या प्रातांमध्ये आणि भाषांमध्ये युद्ध सुरू आहे.  सौदी अरिबिया सुन्नी मुसलमानांचे  नेतृत्व करतात. तर इराण ह्या शिया मुसलमानांच नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मध्ये अनेक देशात युद्ध सुरू आहे. रशिया मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी धार्मिक जाती संघर्ष चालू आहेत. ह्या सर्वाला अपवाद फक्त चीन दिसतो. 
             1978 नंतर चीनने हे सारे मतभेद कमी केले. आणि फक्त आर्थिक आणि मानवाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत  केले. व आता चीन एक आर्थिक महासत्ता झाली आहे. शेवटी माणसाला काय पाहिजे असते, आपले कुटुंब व आपली स्वतःची आर्थिक प्रगती. शेवटी कोणी हिदुंत्वाचा प्रसार करून हिंदू शेतकर्‍यांना आत्महत्या करायला  लावत असेल, हिंदू कामगारांना बेकारीच्या खाईत लोटत असेल तर त्याचा काय उपयोग?  कोरोनाने तर कोणालाच सोडले नाही. कोरोनाने हे बघितले नाही की, कोण  हिंदू आहे की ख्रिश्चन आहे की मुसलमान आहे.  देशातील जनतेचा विभक्तपणा आणि द्वेष हा कुठल्याही देशाला घातक ठरतो. कमजोर आणि स्वार्थी नेते जाती धर्माचा उपयोग राजकारणासाठी करतात पण त्यातून समाज फुटतात. आपण बघितलं आहे की, जाती दंगलीत निरपराध लोक जास्त मरतात नेत्याला काहीच होत नाही. काश्मीर मध्ये आंतकवाद आहे असे म्हणतात. एका झटक्यात चाळीस सैनिकांना  मारले जाते. पण कुठलेही हिंदू किंवा मुस्लिम खासदार किंवा आमदार मारले जात नाहीत. हे गोड बंगाल काय आहे हे लोकांनी जाणून घ्यावे. काश्मीर दहशतवाद सर्व खेळ हे अफू आणि हत्याराच्या तस्करीचा आहे. त्यात अनेक हिंदू, मुसलमान आमदार, खासदार मालामाल झाले पण गरीब शेतकरी कामगाराचा खून झाला. जसे कोरोनाला एक संघ लढा आपण देत आहोत तसे देशातील द्वेष - भावना नष्ट करण्यासाठी आपल्याला लढाव लागेल. तरच भारताची प्रगती होऊ शकते. नाहीतर अधोगतीची दारे सताड उघडली आहेत. 
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत 
वेबसाईट  :  www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!