लॉकडाउन मधील कर्जाची चिंता सोडा.
कर्ज असे फेडतात... ”डॉनच्या निर्मिती मागची स्टोरी”
चांगल्या हेतूने केलेली कुठलीही गोष्ट चांगलंच फळ देऊन जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॅान (अमिताभला) हा सिनेमा. सिनेसृष्टीतले प्रसिद्ध छायाचित्रकार नरिमन इराणी यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी मित्रांनी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट म्हणजे डॉन ची निर्मिती. इतक्या सिनेमांचे आपण चित्रीकरण केले आहे आपण एखादा चित्रपट काढून पाहायला हरकत नाही म्हणून नरिमन इराणी यांनी जिंदगी-जिंदगी नावाच्या सिनेमाची निर्मिती केली, तो सॉलीड आपटला आणि त्यांच्यावर १२ लाखांचं कर्ज झालं (७८ सालचे १२ लाख). यानंतर ते मनोजकुमारच्या रोटी, कपडा और मकान ह्या सिनेमाचं चित्रीकरण करत होते, त्याच वेळी टांझानियामध्ये जन्मलेला, वाढलेला नंतर लंडनमध्ये स्थायिक झालेला चंद्रा बारोट इंग्लंडला काही कामधंदा जमला नाही म्हणून मनोजकुमारकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सात वर्षांपासून काम करत होता. कॅमेर्यामधून प्रत्येक शॉट बारकाईने आणि अभ्यासाने पाहण्याच्या चंद्राच्या सवयीने नरीमन इराणींना चंद्रा आवडू लागला आणि त्यांची दोस्ती झाली ह्या सेटवर इराणी सोडल्यास अमिताभ, झीनत अमान आदी सगळी चंद्राच्याच वयाची मंडळी होती. आपण भलं की आपलं काम भलं ह्या वृत्तीचे पण कामात चोख असलेले नरीमन इराणी सगळ्यांचे लाडके होते. एके दिवशी इराणींनी चंद्राला हजार रुपये मागितले. चंद्राला आश्चर्य वाटले पण त्याने ते दिले. त्यांनंतर त्यांनी काही दिवसांनी दहा हजार मागितले तेही चंद्राने दिले आणि कारण विचारलं इराणींनी त्याला जिंदगी-जिंदगी ची कथा सांगितली. साठ हजार रुपये महीना कमावणारे इराणी बारा लाखाचं कर्ज कसं फेडायचं ह्या चिंतेत होते. त्यावर यातून निघण्यासाठी आपण एक सिनेमा काढू असे चंद्राने त्यांना सांगितले. त्यासाठी त्याने अमिताभ, झीनत यांना पटविले. सगळ्यांनी इराणींसाठी होकार भरला. आता प्रश्न कथेचा तर चंद्राने वहीदा रहमान यांच्या मार्फत सलीम खानशी संपर्क साधला आणि सलीमने त्यांना तीन-चार वर्षांपासून पडून आहे आणि जितेंद्र, धर्मेंद्र, देवानंद, प्रकाश मेहरा इत्यादी दिग्गजांनी नाकारली आहे असे सांगून ‘डॉन वाली स्टोरी’ दाखवली. जेम्स बॉंडच्या सिनेमांवर वाढलेल्या चंद्राला सूटा-बूटातल्या खलनायकाची कथा एकदम आवडली. तोपर्यंत हिंदी सिनेमातले खलनायक धोतरं नेसून घोड्यावर यायचे. त्या तुलनेत हे धाडसच होतं. सात वर्षात चंद्रा चांगला तयार झाला आहे त्याला दिग्दर्शन सोपवायला हरकत नाही अशी ग्वाही मनोज कुमारने इराणींना दिली. सलीम खान चर्चा करतांना नेहमी ‘डॉन वाली स्टोरी’ असा उल्लेख करायचे. त्यामुळे इराणींनी ‘डॉन’ हे शीर्षक नोंदवून टाकले. कल्याणजी आनंदजींना संगीताची जवाबदारी सोपवली इराणी कर्जातून बाहेर निघण्यासाठी आणखीन सिनेमा काढताहेत तेही नव्या दिग्दर्शकाला घेवून, तेही अनेकांनी नाकारलेल्या कथानकावर आधारीत यावरुन सिनेसृष्टीत लोकं चेष्टेच्या सुरात बोलायला लागले. त्यातून इराणी-चंद्रा जोडी फारच मजेदार होती. इराणी सहा फुटी धिप्पाड तर चंद्रा साधारण प्रकृतीचा, साडेपाच फुटाचा. कर्जातून निघण्यासाठी सिनेमातर काढायचा पण त्यासाठी पैसे नाहीत. सुरवात गाण्याच्या शुटींगने केली त्याकरीता धाकट्या भावाच्या स्वप्नपूर्तीसाठी पैसे चंद्राच्या गायिका बहिणीने दिले. सिनेमाचं शुटींग रंगात आलं अन् प्राणला अपघात झाला तो लंगडत होता म्हणून मग कथेत बदल करुन त्याला लंगडा दाखवला ते होत नाही तर मोठा धक्का बसला खुद्द इराणींचा मृत्यु झाला. जुने बारा लाख आणि हा नवीन खर्च असा सर्व बोजा इराणींच्या बायकोवर आला, पुन्हा दोस्तांनी हिम्मत बांधली. डॉन जख्मी हुआ तो क्या हुआ, आखिर डॉन है ह्या संवादाला जागत शुटींग सुरू राहीले. अमिताभ, झीनत, प्राण यांनी पैसे नकोच सिनेमा पूर्ण करु असा धीर चंद्राला दिला. सिनेमाचे रशेस पाहून सलीम-जावेद ने चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा होतोय या शब्दात अमिताभ व चंद्राचे कौतुक केले. डॉन म्हणजे क्षणाक्षणाला धक्का देणारी अशी अतिशय चोख आणि बंदीस्त मनोजकुमारच्या शब्दात एअर टाईट पटकथा होती. त्यांनीच लोकांना रिलॅक्स व्हायला उत्तरार्धात एक गाणं टाकण्याची सुचना केली आणि मुळात बनारसी बाबू या सिनेमासाठी लिहीलेल्या ‘खईके पान बनारसवाला’ या गाण्याचा डॉनमध्ये समावेश झाला. त्यांत लावारिसच्या चित्रीकरणाच्या दरमयान पाय दुखावलेला असतानाही खैके पान चं चित्रीकरण अमिताभजींने थांबवले नाहि ... !!!) चित्रपट तयार झाला. चित्रातल्या ‘व्हाईट स्पेस’चे महत्व समजणार्या चंद्राने सिनेमाचे पोस्टर्स स्वतः करवून घेतले. पूर्ण पांढर्या पार्श्वभागावर एका रंगातली झीनत अमान आणि दिवाकर करकरे या चित्रकाराने काढलेला धावणारा अमिताभ इतकाच ऐवज असणारी ती पोस्टर्सही गाजली. त्यावेळचे मोठे चित्रपट प्रत्येक विभागात साधारण नऊ लाखाला विकले जायचे. डॉनला प्रत्येक टेरेटरीत एकवीस लाख अशी सॉलीड रक्कम मिळाली. एकूण ८४ लाखात तयार झालेल्या डॉनने पहिल्याच वर्षी ७ करोड बॉक्स ऑफिस कालेक्शन जमवले . डॉन नंतर महीनाभरात कल्याणजी आनंदजी अमिताभला घेवून वर्ल्ड टूरला निघाले. त्यांच्या प्रत्येक शोची सुरवात ‘जिसका मुझे था इंतजार ने ’ व्हायची तर शेवट ‘खईके पान बनारसवालाने’ . डॉन सर्व संबधितांच्या कारकीर्दीतलं सोन्याचं पान ठरला. चंद्रा स्वतःही नंतर तसा चित्रपट तयार करुन शकला नाही., आणि हो ज्या कारणासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला ते इराणींचं कर्जही फिटलं. व त्यावर्षीचे अवॉर्ड अमिताभजींना मिळाले .
कारण
तर हे सगळं लिहिण्याच् कारण ...सध्याच्या लॉक डाऊनमुळे आपण सर्वच कठीण आर्थिक परिस्थितीतुन जाणार आहोत .अपल्याला जमेल तिथं कुबेर व धनलक्ष्मी प्रसंन्न करुयात...अर्थात कामे व पॆसे एकजुटीने मिळवूयात . कोणी आपला दोस्त , मित्र मैत्रीण , नातलग प्रतिकोल परिस्थितून जात असेल तर शक्यतो आपल्याच अंतर्गत व्यवहार करून एकमेकाला सावरुयात . वरील पोस्टवरून चित्रपटाच्या निर्मितीचा मूळ हेतूच अहम मित्राला कर्जातून बाहेर काढण्यासाठी होता. पुढे घडलेल्या विपरीत घटनेतून कुटुंबास सगळ्यांनी निरपेक्ष वृत्तीने मदत केली. त्याची परतफेड ही मिळतेच . मग मदत कितीही छोटी का असेनात .
गेल्या वर्षीच्या गाजलेल्या सुबोधभावेच्या " तुला पाहते रे " मालिकेतल वाक्य आठवत ... दो रुपये भी बहुत बडी चीज होती हैं बाबू .... !!!!!
📽️ 📽️ 📽️ 📽️ 📽️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!