जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

विविध प्रकारचे कॅमेरा फ्लॅश : अभिजित धोत्रे

II दुर्मिळ कॅमेऱ्यांची माहिती II
विविध प्रकारचे कॅमेरे फ्लॅश ( भाग : ८ वा )
      गेले आठ दिवस आपण विविध कॅमेऱ्यांची माहिती व त्याचा इतिहास पाहिला,आज मात्र आपण कॅमेरासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा भाग व थोडक्यात कॅमेराचा जणू लहान भाऊच म्हणजेच " फोटो फ्लॅश होय " याची माहिती व इतिहास जाणून घेणार आहोत.
     प्रकाश चित्रणकलेच्या शोधानंतर विविध प्रकारच्या कॅमेराचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाला अर्थात यामध्ये फ्लॅश लावण्याची सोय मात्र नव्हती. दिवसा ढगाळ वातावरणात किंवा एखाद्या खोलीमध्ये फोटो टिपल्यानंतर हे फोटो कमी प्रकाशामुळे धुसर येत असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात फोटो काढण्यात येत .जर एखाद्या झाडाखाली किंवा सावलीमध्ये फोटो काढायचा असल्यास कॅमेराच्याबाजूला चार लोकांच्या मदतीने पांढऱ्याशुभ्र कापड पकडून त्याचा "रिफ्लेक्टर" प्रमाणे उपयोग करण्यात येत असत. आजही एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी खास पद्धतीने बनवलेल्या रिफ्लेक्टरचा याच पद्धतीने वापर केला जातो.   पूर्वी रात्रीच्या वेळी फोटो काढताना प्रकाशयोजना नसल्यामुळे ते काढता येत नसत. यावर उपाय म्हणून मॅग्नेशियम (Magnesium) पासून बनवलेल्या तारेचा उपयोग "फ्लॅश" म्हणून करण्यात येऊ लागला. फोटो काढताना बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात असलेली ही तार जाळण्यात येत व त्या प्रकाशामध्ये फोटो काढला जात. परंतु या तारेमुळे मात्र प्रचंड धूर होऊन भाजण्याचाही धोका उद्धभवत .कालांतराने या तारे ऐवजी मॅग्नेशियम पासून बनवलेली पावडर वापरण्यात येऊ लागली. ही पावडर बंदुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या "गनपावडर"(Gun powder) मध्ये एकत्रित करून वापरण्यात येत असतं . या दोन्हीच्या मिश्रणाच्या ज्वलनशीलतेमूळे  प्रकाशाच्या तीव्रतेत खूप वाढ झाली. परंतु यात गनपावडर चा वापर होत असल्याने अनेक दुर्घटना घडून लोक मृत्युमुखी ही पडू लागले.
    यामुळे पुढे फक्तं फ्लॅशपावडर पासून बनवलेल्या गोळ्या बाजारात आल्या.या गोळ्या वापरण्यासही सुरक्षित होत्या. इंग्लिश मधल्या "  T " आकाराच्या स्टँडवर या गोळ्या ठेवून त्या पेटविण्यात येत .तरी पण त्याच्या प्रकाशाची तीव्रता तशीच जास्तीच होती आणि त्यामुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास सुध्दा होत असत.
    १९२९ साली जर्मनीमध्ये छोट्या बल्बच्या आत "ॲल्युमिनियमचा कागद" (Alluminium foil) व "ऑक्सिजन" सील करून "फ्लॅश बल्ब" बनविण्यात आला. त्या बल्ब च्या आतील कागद जाळून त्याचा उपयोग फ्लॅश म्हणून करण्यात येत असत. या बल्बच्या वापरण्याने मात्र वरील प्रकारचे धोके खूप कमी झाले. पुढे या बल्बमध्ये सुधारणा होऊन आत ॲल्युमिनियम कागदाऐवजी त्याच्या पासून बनविलेल्या जाळीचा उपयोग करण्यात आला.प्रत्येक फोटोसाठी एक बल्ब वापरण्यात येत असत.फोटो काढून झाला की तो बल्ब बाद होऊन टाकून द्यावा लागत असे. त्यामुळे काही महत्त्वाच्या फोटोसाठीच हे बल्ब वापरण्यात येत. या बल्बमध्ये अनेक आकार व प्रकार अस्तित्वात आले, अशा या बल्ब फ्लॅशचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
    १९६५ साली kodak कंपनीने instamatic या कॅमेरासाठी "फ्लॅश क्यूब" ( Flash cubes) ची निर्मिती केली. या चौकोन छोट्या प्लास्टिकच्या क्यूबमध्ये चारी बाजूस छोट्या आकाराचे फ्लॅश बल्ब लावण्यात आलेले होते ,त्यामुळे ४ फोटो काढल्यानंतर हा फ्लॅश क्यूब बाद होत असत.
   साधारण ४० ते ५०  वर्षांपूर्वी ऍसिडवर चालणारे बॅटरीचे फ्लॅश खास फोटोग्राफरसाठी बनवले गेले,या फ्लॅशचे वजन जास्त असून सतत गळ्यात अडकून ठेवावे लागत. त्यामुळे हे अतिशय जड फ्लॅश दिवसभर संभाळणे हे खूप अवघड काम होते. पुढे लवकरच या अॅसिड बॅटरी जागा पेन्सिल सेलनी घेतली.हे फ्लॅश वापरण्यास सुटसुटीत व हलके असून कॅमेराला "हॉट शू" च्या मदतीने लावता येत. अशा या फ्लॅशला "फ्लॅशगन" Flashgun म्हणून संबोधत. यात नॅशनल,स्टार ब्लिच, विव्हीटार या कंपन्यांचे फ्लॅशगन्स खूप प्रसिद्ध होत्या. या फ्लॅशगनचा वापर अगदी डिजिटल कॅमेरे येईसपर्यंत झाला.
   वर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या कॅमेरामध्ये फ्लॅश लावण्याची सोय नव्हती परंतु नंतर जे "अम्युचर" म्हणजेच हौशी लोकांसाठी जे छोटे कॅमेरे काढले त्यात फ्लॅश लावण्यात आलेले होते.
    अशा या कॅमेरा फ्लॅशसाठी अनेक प्रयोग व संशोधन होऊन, आजच्या या डिजिटल जमान्यात जे उच्चप्रतीचे फ्लॅश वापरतो हे त्याचेच फळ आहे.

--------------------------------------श्री.अभिजीत धोत्रे, पुणे.
.                                            मो: ९७३०४२८१८४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!