"शाकाहारी असणारी व्यक्ती काय शंभर वर्षे जगत नाही आणि मांसाहारी असणारी व्यक्ती काही विस पंचवीस वर्षात मरत नाही"! असे प्रबोधनकार ज्ञानेश महारावसर कायम म्हणतात . खरे तर ८५% जग मांसाहारीच आहे, असेही समजले जाते. समुद्राकडून मिळणारे सीफुड हे मानवाला जगवणारे प्रमूख साधन आहे .असे आसले तरी भारतातील काही शाकाहारी समूह मुद्दाम मांसाहार हा वाईट व शाकाहार हा पविञ असा दावा करत असतात. यातूनच .देव ,देवताःचे शाकाहारी करणही खुप मोठ्या प्रमाणात सूरु आहे .इतकेच नाही तर ज्या गडकोटांवर ऐकेकाळी रेडे, बकरी बळी दिले जात होते त्या गडकोटांचेही शाकाहारीकरण फार मोठ्याप्रमाणावर सूरु आहे. असो आज माझा सहकारी मोडीलिपी तज्ञ आमित आडसूळे याने ऐक पोष्ट लिहलीय ती कोल्हापूर च्या अंबाबाई देवीला दाखवल्या जाणाऱ्या खार्या नैवेद्य बद्दल आहे . अस्सल कागद पञांच्या अधारावर आसणारी हि पोष्ट जरुर वाचा.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी - अंबाबाई ला दाखवला जात होता खारा नैवेद्य
श्री अंबाबाई - महालक्ष्मी मंदिर हे ९व्या शतकात बांधले असे मानले जाते पण मुख्य देवी फार प्राचीन आहे. या देवतेचे रुप हे शिवपत्नी पार्वती चे आहे. याचे अनेक संदर्भ आहेत. ते लवकरच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या अंबाबाई वरील पुस्तकातून पुढे येतील. असे असताना काही वर्षापूर्वी अचानक पणे ही देवता तिरुपतीची पत्नी आहे असे सांगण्यात येऊ लागले. तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन घ्यावेच लागते असे ही उठवण्यात आले होते. यासाठी हरिप्रिया नावाची कोल्हापूर ते तिरुपती रेल्वेही सुरू केली गेली. हे तिरुपती - महालक्ष्मीचे नाते दृढ करण्यासाठी तिरुपती देवस्थानाहून अंबाबाईला शालू ही येऊ लागला त्याचे स्वागतही थाटात केले जाऊ लागले. काही पोपटपंची अभ्यासक तयार करुन या देवतेचे लक्ष्मीदेवी हे स्वरुप जनमाणसांत ठसवले जाऊ लागले. काही महनीय यांनी तर तिरूपती - महालक्ष्मी कल्याण मोहत्सवही कोल्हापुरात घेतले. देवीचे स्वरुप बदलण्यासाठी आपल्या अराध्य देवीच्या मूर्तीवरील लिंग ,नाग अशी लांछनेही घालवली गेली. पण सुदैवाने कोल्हापुरातील सच्या अंबाबाई भक्तांनी ,संशोधकानी अभ्यास करुन देवीचे शिवपत्नी हे मूळ स्वरुप लोकांच्या लक्षात आणून दिले.
असो अंबाबाई देवी ही मराठा बहुजनांची देवता असल्याकारणाने तिचे स्वरूप ऊग्र आहे. या मुळेच तिच्या नैवद्या मध्ये सामिशाचा उपयोग केला जात असे. या देवतेला करवीर छत्रपतींकडून नवरात्री मध्ये आठव्या दिवशी बकरे बळी (जुन्या राजवाड्यातील भवानीदेवीला तर आजही दसऱ्याच्या नऊ दिवसही बळी दिला जातो.) दिले जायचे. याची सन १८२५ ते १८३६ दरम्यानची कागदपत्रे आम्हाला कोल्हापूरच्या दप्तरखान्यात काही वर्षापूर्वीच मिळाली होती. तसेच अलिकडे फेसबुकवर शाहू छञपतींचे सहकारी वासुदेव तोफखाने यांच्या घरातील काही कागदपञे त्यांच्या नातीने त्यांच्या फेसबूक अकाऊंट वरुन पोष्ट केली. यामध्ये सन १९०८ चे शाहू छत्रपती महाराजांचे सहीची एक नोंद मिळाली आहे यात "श्री करवीर निवासिनीस व वाड्यातील अंबाबाईस रोज मंगळवार नैवेद्य करावे ते गोडा (शाकाहारी) पाने ५० - खारा (मांसाहारी) पाने ५० पक्वान्नासहीत येणे प्रमाणे करावे. ता १७/५/०८ सही- शाहू छत्रपती" असा मजकूर आहे. आम्हला कोल्हापूरच्या दप्तरखान्यात मिळालेल्या अनेक कागदपञांना हा खासा राजर्षी शाहू छञपतीच्या सहीचा प्रतंतर पुरावा मिळाला. आता प्रश्न उरतो आपल्या अंबाबाईचे शाकाहारीकरण कधी झाले ? व ते कोणी केले ? याची उत्तरे ही कालओघात मिळतीलच. पण देवतेचे स्वरूप बदलणे , तिची आराधना पद्धत बदलणे हे का केले जाते ? ज्या अंबाबाई देवीच्या आरतीतच तिला दुर्गा म्हटले आहे तिला लक्ष्मी देवी का केले ? शिवाय दोन वर्षापूर्वी पगारी पुजारी नेमणुकीचा कायदा सरकारने केला त्याची अमंल बजावणी केंव्हा होणार ? असे प्रश्न शिल्लक राहतातच . आई अंबाबाई संबधीतांना चांगली बुद्धी देवो.
टीप : - पोष्ट इतिहासाची खरी माहिती मिळावी यासाठी लिहली आहे. यातून कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही.
(सोबत- कागदपञांचे , शाहूंच्या पञाची फोटो काॕपी जोडलीआहे)
अमित अडसूळे,
मोडीलिपी तज्ञ,
7/5/2020,
कोल्हापूर .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!