सांस्कृतीक दहशतवाद्यांच्या हिट लिस्ट वर डॉ. अमोल कोल्हे
आज अमोल कोल्हे यांना घेरून शब्दाचे फुकावीर IT सेल वाले त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व प्रथम ते त्यांची बदनामी करतील आणि मग कुणातरी बहुजन मुलां करवी त्यांचा खून करतील. याचे कारण अक्षय बोर्हाडे यांचे खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना निशाना केला जात आहे. यात आबांचा मुळीच दोष नव्हता फक्त विरोधकांना मिळालेले आयते कोलीत होते. जे आज अमोल कोल्हे यांच्या सोबत घडत आहे. मागील दोन दिवसांपासून अक्षय बोराडे प्रकरण चालू आहे प्रत्येक व्यक्ती ने आपापल्या परीने मत व्यक्त केली, एक सामान्य नागरिक म्हणून अक्षय बोराडे यांना जर मारहाण झाली असेल, तर ती चुकीची आहे आणि सबंधित व्यक्ती वर गुन्हा नोंद झाला पाहिजे. माझा ही पाठिंबा असेल न्याय सर्वांना मिळायलाच हवा, आज मला स्वर्गीय आबा ची आठवण येईल मुंबई हल्यात अबानी एक स्टेटमेंट दिले होते, "बडे बडे शहरो मे छोटी मोटी घटनाये होतो राहती है"
गाव पातळीवर राजकारण आहे की वर्चस्ववाद दोषी असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी .
यात खासदार अमोल कोल्हे हे दोषी कुठे?
काही बोले अमोल कोल्हे यांना वकिली कोणी करायला सांगितली! अगदी योग्य बोले
पण मीडिया मध्ये अमोल कोल्हे आणि सेरकर यांच्या सोबतचा फोटो व्हायरल होत, होता यावर मौन पाळले असते तरी ही काही बुद्धिजीवी नी अमोल कोल्हे शांत आहेत म्हणजेच ते शेरकर याला पाठीशी घालत आहेत आणि लाईव्ह येवून ही तोच प्रकार घडला.
माझा मित्र आहे सांगितले म्हणून का ते दोषी? दोषी असेल तर निष्पक्ष पोलिसानं कार्य करावे
हे सांगितले म्हणून का ते दोषी?
प्रत्येकाला आपापल्या परीनं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तो असायलाच पाहिजे. पण गावपातळीवरच्या राजकारणात अमोल कोल्हे का टार्गेट केले जातात'
1:- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, यांना घराघरात खरा इतिहास पोहचव ला म्हणून का ते दोषी?
काहींनी घाण कमेंट केल्या आहेत,
: कोल्हे नी पैशा साठी सिरीयल केल्या
: कोल्हे राजकारणा साठी लाचार
: लबाड कोल्हा ढोंग करतोय
अनेक खालच्या पातळीवर च्या कमेंट पाहायला मिळाल्या.
अक्षय च्या खांद्यावर बंदूक लावून जो तो आपापल्या परीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय का?
हा विचार देखील होणे गरजेचे आहे. अमोल कोल्हे का टार्गेट केले जाते, एक सामान्य परिवारातील व्यक्ती नट म्हणून लोकांनी डोक्यावर घेतला. एक खासदार, वक्ता विरोधकांना नामोहरम करण्याची कला..खूप कमी कालावधीत भेटलं असे नाही. त्यासाठी अपार कष्ट... प्रचंड विरोध... घराचा लिलाव... करावा लागला तरी शंभू विचार चरित्र जनसामान्य पर्यंत पोचले पाहिजे यासाठी सदैव झटत राहिले. त्यात यश मिळत गेले, साहजिक आहे मुरबी राजकारणी यांना हे रुचणार तर नाहीच ना !
कधी जुने व्हिडीओ दाखून बदनाम करायचे काम केले. तर कधी जातीवर आधारित राजकारण केले. पण तरी हा माणूस लढतोय स्वतः कधी चकीचं विधान नाही केलं ना प्रतिमा मलिन नाही मग अमोल कोल्हे यांचा विरोध करायचा तरी कसा ?
त्यात खतपाणी घालणारे काही स्वकीय असतात तर काही विरोधी. काहींचे पित्ता खवळले तेंव्हा, जेव्हा शिवशंभू राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोचला !
खर तर अमोल कोल्हे यांचे कुल्बर्गी, दाभोलकर ,पानसरे, व्हायला हरकत नव्हती पण ! दाभोलकर ,पानसरे यांच्या पाठीशी समाज नव्हता म्हणून मारले गेले! अमोल कोल्हे यांच्या माघे अवघा महाराष्ट्र उभा होता म्हणून आज अमोल कोल्हे आपल्या समोर आहेत.
याचा कधी तरी विचार करा, विरोध करा पण. त्या व्यक्ती ची खरच चूक आहे का ?
भावनेच्या भरात एखाद्याची प्रतिमा मलिन करणे सर्व चांगल्या कामावर एखादे वाक्य पूर्ण आविष्या उध्वस्त करणारे असेल तर आज मला स्वर्गीय आबा ची आठवण येईल मुंबई हल्यात आबानी एक स्टेटमेंट दिले होते "बडे बडे शहरो मे छोटी मोटी घटनाये होतो राहती है..." ज्यावर आबा ना राजीनामा द्यावा लागला. खर पाहिले तर यात दोष अबांचा मुळीच नव्हता पण मनतात ना वाईट वेळ असते माणूस नाही. षडयंत्र कोणी करत असेल तर हे चुकीचं आहे..!
बोऱ्हाडे समाजसेवक आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये ही माझी सुद्धा भूमिका आहे. पण दोन्ही बाजूची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्ये समोर आलं पाहिजे. पण भक्तांनी याकडे संधी म्हनून पाहू नये. गेल्या कांही दिवसात सोषल मीडियावर सतत होणाऱ्या अपमानाचा जणू बदला घेण्याची संधीच भक्तांना बोऱ्हाडे प्रकरणातून मिळाली आहे अस व्यक्त होताना भक्त दिसत आहेत. त्यांच प्रेम बोऱ्हाडेवर नाही, त्यांना फक्त संधी हवी होती महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत असल्यामुळे आणि ते सत्यशीलचे मित्र असल्यामुळे भक्त भाजप प्रवक्ते पात्रा सारखे उत्तेजीत होत आहेत, त्यांना बोऱ्हाडे पेक्षा अमोल कोल्हे छोटे वाटायला लागलेत पण ते व्हिडीओ मधून नेमकं काय म्हणतात ते तरी ऎका एवढं उत्तेजित कशाला होताय.
आसो पुढे सुदैवाने सत्यशील शेरकर निर्दोष निघाले तर सरकार यांच होत म्हणुन मोकळे होणार. हे आम्हाला माहिती आहे आणि दोषी निघाले तर कोल्हेंची आजून बदनामी करणार हेही आम्हाला माहिती आहे. या प्रकरनाचा निकाल हे आधीच लावून न्यायाधीश बनून उभा आहेत. सरकार शेरकरची बाजू घेईल आसे वाटणे साहजिक आहे कारण त्यांना गेल्या 5वर्षांतला दांडगा अनुभव आहे. गेल्या 5वर्षात कसा पक्षपातीपणा केला जायचा याची उदाहरण भरपूर आहेत. पण संकुचित बुद्धिच्यानो ते तुमचं वर्णवर्चस्ववादी बहुजन विरोधी सरकार होत म्हणुन हे पण तसच आसेल अशी जरी तुम्हाला खात्री आसली तरी तसे होणार नाही. न्यायच होणार फक्त थोडी कळ सोसा. एवढं उत्तेजित होऊ नका. राहता राहिला विषय अमोल कोल्हेंचा तर त्यांच्याकड बोट दाखवायची तुमची लायकी नाही. त्यांनी तो निर्दोष आहे असं ही म्हणल नाही सर्व माहीती घेऊन आपलं मत मांडा शोषल मीडिया वरील व्हिडीओ पाहून एकतर्फी मत मांडू नका आसे ते म्हणतात पण तोपर्यंत हे बोऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून कमी पण शेरकर काँग्रेसचा आहे हे पाहून ज्यास्त पिसाळले. एवढे मोठे होऊन सुद्धा ते आपल्या मित्राला विसरले नाहीत संकटात सोबत आहेत याच कौतुक करन्यासारखं आहे त्यांच्या जागी तुम्ही आसते तर साधी ओळख तरी दाखवली असती का पण हे कोल्हेंना ना ना विध विशेषने लावून टीका टिपण्णी करून मोकळे झालेत तर भक्तांनो पिसाळू नका जरी तुम्हाला दंगलीचा अनुभव असला तरी. संपूर्ण प्रकरण समजून घ्या.
तुमच्या मालकांनी पिढ्यानपिढ्या जी बखरी, कथा, कादंबरी,नाटक,चित्रपट,व्याख्याना मधून संभाजी महाराजांची बदनामी करून ठेवली होती. त्या सगळ्याना मालिकेच्या माध्यमातून अंधार कोठडी दाखवणारे हेच ते अमोल कोल्हे आहेत. ज्यांच्यावर तुम्ही खाली दिलेल्या व्हिडीओ वर तोंड सुख घेत होता, अमोल कोल्हेंच कार्य केवढं आहे याचं तुम्हा बुद्धी घाण टाकलेल्याना काय कौतुक, कारण ते राष्ट्रवादी मध्ये आहेत ते भाजप मध्ये असते तर देशभक्त शिवप्रेमी वाटले असते इतर पक्षात देशभक्त आणि शिवप्रेमी नसतात अश्या विक्षिप्त मनोवृत्तीत जगणारे भक्त.
अमोल कोल्हेंच फक्त राष्ट्रवादीत आहेत एवढ्या एकाच गोष्टींमूळ या विचाराणी आपंग असलेल्या गुलामांचा पोटसूळ उठतो त्यांची बदनामी करण्यासाठी. का दुसरं पण काय कारण आहे. कोणाला माहिती आसेल तर स्पष्ट करा. सावरकर सारख्या आनेक बोरू बहाद्दराणी जी आमच्या विश्ववंदनिय शिवशंभुंची बदनामी खोडून सत्ये जगा समोर आणले ते धडाकेबाज काम करणारे ते हेच शिवशंभुप्रेमी डॉ अमोल कोल्हे आहेत. त्यांनी मित्राची बाजू घेतली म्हणून त्यांच्या कारकिर्दीवर घाण टाकण्याचं नीच संघटेपण करू नका. सत्ये काय आहे ते समोर येईलच. जिथं टाकायची तिथं तर तुम्ही घाण टाकली नाही. शेरकरांची बाजू घेतली म्हणून अमोल कोल्हेंची बदनामी करणारानो आजवर स्वराज्यद्रोह्यांची बाजू सावरत आलात ते आत्ता पुन्हा सिद्ध झालं आखा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्रद्रोही समजतोय.
विधानसभेत निम्मे आमदार मराठा असताना आमचे आमदार मराठा समाजासाठी उघड भूमिका घेत नाहीत अशी बऱ्याच मराठा समाजसेवक यांची तक्रार असते. पण एखादा मराठा आमदार अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी समाजासाठी घेतो त्यावेळी यातून तो जेव्हा राजकीय ,सामाजिक , वैयक्तिक , कौटुंबिक परिस्थितीत आमदार अडचणीत येतो त्यावेळी समाज त्याच्या पाठीशी राहत नाही.
उलट त्याने कसे चुकीचा पक्ष निवडला ,त्याने कसे राजकारण करायला हवे होते, असले फुकटचे सल्ले ज्यांना ग्रामपंचायत लढवायची माहिती नाही ते देत असतात.पण मुद्दा हा आहे सामाजिक काम करणाऱ्यांनी आपले काम झाल्यावर त्या मराठा आमदाराच्या राजकीय पक्ष, भूमिका याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. त्याची राजकीय काम करण्याची पध्दत ही वैयक्तिक असणार आहे.तिथं आपण बोलण्याचा अधिकार नाही. मग याची परतफेड ही आपण अडचणीच्या वेळी मदत करणे ही असणार आहे.
राजकारण कांहीं आसो अमोल कोल्हेंच शिवकार्य आमच्यासाठी प्रेरणादाई आहे. कोणत्याही प्रकरनाच्या आडून त्यांची बदनामी केली तर आम्ही शांत रहायला संत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!