जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

मृत्यूनंतरही शिवाजी गुरुजींनी केली...शाळेची शिक्षण सेवा! - अमरसिंह राजे



कागल : उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा देत बस्तवडेचे भूमिपुत्र कर्मवीर रावबहाद्दूर डी. आर. भोसले यांचे 50 चरित्र ग्रंथ तसेच प्राथमिक शाळेसाठी पाच हजार रुपयांची देणगी दिवंगत शिवाजी पाटील गुरुजींच्या परिवाराने दिली. 

   बस्तवडे गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त मुख्याध्यापक  शिवाजी गणपती पाटील गुरुजी यांचे 8 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या उत्तर कार्याचा विधी आज बस्तवडे येथे पार पडला. 

    उत्तरकार्या निमित्त देण्यात येणाऱ्या वस्तू या नंतर अडगळीत जातात. त्यामुळे पुस्तके व शाळेस देणगी दिल्याने गुरुजींच्या आठवणी खऱ्या अर्थाने जपल्या जातील. योगायोगाची गोष्ट म्हणजे शिवाजी गुरुजी हे प्राथमिक शाळेत शिकत असताना एका स्पर्धेमध्ये त्यांना डी.आर. अण्णा यांच्याच हस्ते त्यावेळी दोन रुपये बक्षीस देखील मिळाले होते. त्याच डी. आर. अण्णा यांचे प्राचार्य डॉक्टर विलास पोवार यांनी लिहिलेले 50 चरित्रग्रंथ कागल तालुक्यातील सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती काही महत्त्वाची वाचनालये यांना देण्याचा निर्णय पाटील परिवाराने घेतला व त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप देखील आज करण्यात आले. 
भडगाव येथील सुशीला मगदूम ग्राम वाचनालयाचे ग्रंथपाल  मधुकर सुतार, सोनगे येथील केशव बळवंत पाटील वाचनालयाचे प्रमुख जयसिंगराव पाटील कुरकली येथील हंबीरराव पाटील वाचनालयाचे बाळासाहेब ढवण,बस्तवडे येथील हनुमान वाचनालयाचे विष्णू वांगळे यांना तसेच कौलगे येथील परिवर्तन सामाजिक विकास संस्थेस त्यांचे प्रतिनीधी पी.आर. पाटील सर यांनादेखील चरित्रग्रंथ सुपूर्द करण्यात आला.
     दुःखद प्रसंगातही पाटील परिवाराने दाखवलेला हा विवेक अनुकरणीय आहे. अशा प्रसंगी नक्कीच प्राथमिक शाळा आठवणे हे गुरुजींच्या शैक्षणिक प्रवासाशी  संयुक्तिक असेच आहे. हे शिवाजी गुरुजींनी त्यांच्या मुलांवर केलेले संस्कारच आहेत. 
शाळेसाठी अव्याहतपणे शिक्षण सेवा करणाऱ्या शिवाजी गुरुजींनी मृत्यूनंतरही शाळेला दिलेली ही सेवाच आहे, असे प्रतिपादन संपादक अमरसिंह राजे यांनी केले.

या श्रद्धांजली कार्यक्रमाचे निवेदन पत्रकार मधुकर भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच जयवंत पाटील यांनी केले. पी.डी.पाटील गुरुजींनी गुरुजींच्या बद्दल आणि डी. आर. आण्णा यांच्या आठवणी आपल्या भाषणातून जागवल्या. पाहुणे व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!