जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी रक्तदान करून घेतला आढावा

डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी रक्तदान करून जिल्ह्यातील परिस्थितीचा घेतला आढावा
नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक व राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आज शुक्रवार दिनांक 27 रोजी अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ,जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील , अकलूज उपविभागीय प्रांतअधिकारी शमा पवार ,अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू ,माळशिरस ते तहसीलदार अभिजीत पाटील ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते यांच्याशी फोनवरून संपर्क साधत आपल्या कार्यात महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेची आपणास गरज भासली तर तात्काळ कळवा जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते आपल्या मदतीसाठी सदैव तयार आहेत असे मदतीचे आश्वासन दिले .

डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्वतः रक्तदान केले आणि येत्या आठवडाभरात महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्यावतीने एक हजार बाटल्या रक्त संकलन करणार असल्याचे यावेळी सांगितले यावेळी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतली अद्याप पर्यंत सोलापूर जिल्ह्यात एक कोरोना व्हायरस ची लागण झालेला रुग्ण सापडला नसल्याची माहिती मिळाली असून कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र बंदी आहे मात्र काही लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत यामुळे या लॉक डाऊन ला हरताळ फासला जात आहे अशी माहिती प्रशासनाकडून डॉ धवलसिंह यांना दिली गेली याच बरोबर सर्वत्र बंदी असल्याने रस्त्यावरील पाळीव प्राणी याच बरोबर मागून खाणारे काही लोक उपाशी राहात असल्याची माहिती डॉ धवलसिंह यांना मिळाली यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्यावतीने बंद च्या काळात दररोज  अन्नाची पाकिटे तयार करून संबंधित ठिकाणच्या पोलीस यंत्रणेकडे सोपवली जाणार असून पोलीस बांधवांकडून ही अन्नाची पाकिटे ज्यांना गरज आहे त्यांना पुरवली जाणार आहेत डॉ धवलसिंह मोहिते-पाटील आणि महाराष्ट्र राज्य सेवा संघटनेने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे

विनाकारण बाहेर फिरू नका - डॉ धवलसिंह
संपूर्ण जगभर थैमान घातलेला कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्याने विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नका अत्यावश्यक सेवा वगळता शासनाने इतर सर्वच गोष्टींवर बंदी घातली असून घरातील एकाच व्यक्तीने अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी बाजारात यावे बाजारातही सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी करावी कोणत्याही गोष्टींची अथवा अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात साठवण करू नये स्वच्छता बाळगा बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात पाय धुऊनच घरात प्रवेश करावा घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी ,खोकला ,ताप श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या मात्र विनाकारण लॉक डाऊन च्या परिस्थितीत रस्त्यावर फिरू नका असा सल्ला डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी दिला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!