जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

खूप कमावला पैसा आता थोडं घरात बसा : अरूण भाई गवळी उर्फ डयाडी

मुंबई : स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदू डॉन, माजी आमदार अरुण गुलाब गवळी” हे नुकतेच पत्नीच्या आजारपणाच्या निमित्ताने पेरोल’ वर आलेले आहेत. त्यांची लोकप्रियता ही इंडियन रॉबिन हूड ची” त्यामुळे त्यांना दगडी चाळीवर भेटायला येणाऱ्याची संख्या अफाट ! पण कोरोनोच्या संकटामुळे विधानसभेचे माजी सदस्य असलेल्या ड्याडीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या लॉकडाऊन संकल्पनेला सार्थ साथ देत जनतेला आवाहन केले.
ते म्हणाले, नमस्कार मंडळी !
मी अरुण गुलाब गवळी उर्फ ड्याडी या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला आवाहन करतो कि, आपण सर्वांनी मिळून कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वत:ला घरात कोंडून घेवूया. कोरोना हा आजार खूप मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे संसर्ग होऊ नये, त्याचा प्रसार रोखण्यासाठी संसर्ग वहन थांबविणे अत्यंत निकडीचे आहे. हे तेंव्हाच सिद्ध होऊ शकते जेंव्हा आपण आपली नैमातिक भेटी गाठी टाळून स्वत:च्या कुटुंबांसमवेत स्वत:ला घरातच थांबवून ठेवू शकलो तर. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्याप्रकारे आपल्या राज्याच्या जनतेची काळजी घेत आहे. लोकप्रशासन कसं राबवावं हे यातून दिसून येते. बाळासाहेबांनी २०% राजकारण आणि ८०% समाजकारणाचा दिलेला वसा उद्धव चांगल्याप्रकारे निभावत आहेत. 
जनतेला मी कळकळीची विनंती करतो कि, त्यांनी घरातून बाहेर पडू नये. मला भेटण्यासाठी चाळीत येऊ नये. मी हा वेळ घरातच कुटुंबासमवेत व्यतीत करणार आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असते त्याची किंमत मला विचारा. मी न केलेल्या गुन्ह्याची सजा गेली एक तप भोगत आहे... सगळ्यापासून दूर .... स्वत:च्या कुटुंबासमवेत वेळ काढण्यासाठी मला कित्येक दिवस वाट बघावी लागते. पण तुम्हांला तर फक्त १५ एप्रिल पर्यंतच स्वत:ला घरात कोंडून घ्यायचे आहे. यातच आपले सर्वाचे भले आहे. देशासाठी काहीतरी करायची हीच खरी वेळ आहे. भारतमातेच्या लेकारानो <“खूप कमविला पैसा आता थोड कुटुंबांसोबत बसा"> मुलांशी बोला, आई-बाबाशी बोला... नातेसंबंध दृढ करा.
मी कारागृहात असलो कि वाचन हाच माझा सखा सोबती असतो. तुम्ही वाचन करा... लिखाण करा. _फुले,शाहू, आंबेडकर वाचा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी समाजकारण आणि व्यक्तिगत संसार कसा केला हे जाणून घ्या._ स्वत:च्या जीवनात त्याचा स्वीकार करा. 

चला स्वत:चे आणि समाजाचे रक्षण करूया. 

देशभक्ती जगवूया ! 

स्वातंत्रसैनिकांचे स्मरण करूया ! 

लक्षात ठेवा... चुकीला माफी आणि कोरोनोला अजून उपचार नाही.

 त्यामुळे घरातच राहूया ! सुरक्षित राहूया ! 

प्रशासन, डॉक्टर, नर्सिंग टीम आणि पोलिसांचे आभार मानूया !

जय शंभो नारायण !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!