नातेपुते येथे रक्तदानास उदंड प्रतिसाद
नातेपुते ( श्रीकांत बाविस्कर )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते व ग्रीन आर्मी नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदाना मध्ये महिलांसह अनेक तरुण युवकांनी विक्रमी रक्तदान करून देशासोबत आम्ही आहोत हे नातेपुतेकरानी दाखवून दिलेले आहे असे माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष विद्यमान सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
संपूर्ण देशामध्ये कोरोना या विषारी व्हायरसने अनेक लोकांना यमसदनास पाठवलेले आहे काही लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये रक्तदानाचा तुटवडा होऊ नये यासाठी भव्य रक्तदानाचे आयोजन करून रक्तदान माझ्या देशासाठी करोना शी लढण्यासाठी जीवघेण्या आपत्तीसाठी सामाजिक बांधिलकीसाठी या उदात्त हेतूने रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते.
सध्या या संचारबंदी असून 144 कलम लागू आहे यासाठी उद्घाटन वगैरे न घेता पाच पेक्षा ज्यादा माणसे एकत्र न येता हे रक्तदान शांततेमध्ये व नियोजनामध्ये पार पडलेला आहे या रक्तदान शिबिरासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते व डॉक्टर एम पी मोरे यांनी सदरच्या रक्तदानात भेट दिली त्यावेळेस त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उद्घाटनाचा कार्यक्रम टाळला आणि त्यांनी रक्तदानास सदिच्छा भेट दिली सदरच्या रक्तदानांमध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदात्यांनी देशावर महाराष्ट्रावर आलेले संकट दूर करण्याकरता आपले स्वतःचे रक्त देण्याकरता स्वयंस्फूर्तीने आलेले होते त्यामध्ये विशेष महिलांचाही सहभाग भाग मोठ्या प्रमाणात होता सदरचे रक्तदान यशस्वी करण्याकरता युवा नेते संदीप दादा ठोंबरे पंकज पिसे फत्तेसिंह राव वैभव पिसे सागर देवडे राहुल बोराटे माऊली खटावकर ज्ञानेश्वर शिंदे रुपेश भरते सुरज शेंडगे अक्षय झंजे आदी कार्यकर्त्यांसह ग्रीन आर्मी तील सदस्यांनी परिश्रम घेऊन स्वतः रक्तदान करून रक्तदानाचा उपक्रम यशस्वी केलेला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!