ज्यांना आपल्या दुःखाच घेणं देणं नाही त्या उत्सवात सहभागी होऊ नका तो उत्सव परदेशात जन्माला आला आहे त्या उत्सवाची विचारसरणी सुद्धा परदेशीच राहणार
★★ रोटरी उत्सव २०२० मध्ये सहभागी न होता ★★
● आपल्या लेकीच्या सन्मानासाठी बहिष्कार टाका ●
हिंगणघाटकर नागरिकांनो तुम्ही समजदार आहे दिनांक ३ फेब्रुवारीला हिंगणघाट शहरात घडलेली घटना ही अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटत आहे राज्य आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी पेटून उठले आहे पण आपलीच आपल्याला लाज वाटेल असा उत्सव हिंगणघाट शहरात आजपासून सुरू होत आहे ही किती लज्जास्पद बाब आहे एकीकडे आपली लेक मृत्यूशी प्रत्येक मिनिटाला झुंज देत आहे आणि रोटरी उत्सव आयोजन समिती हिंगणघाट उत्सव साजरा करण्याचे नियोजन करत आहे तो नियोजित कार्यक्रम होता तो रद्द करता येणार नाही असे आयोजन समिती कडून बोलले जात आहे अरे या ठिकाणी तुमच्या घरातील लेक असती तर तुम्ही तिच्या दुःखातून बाहेर येत फक्त ३ दिवसात उत्सव साजरा केला असता काय ? परदेशातील विचार तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र राज्यात आणत आहेत नागरिकांकडून अवाढव्य पैसे आकारून आपण उत्सव झाल्यानंतर परदेशी मौजमजा करण्यासाठी जाता आणि आज संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असतांना स्वतःच्या स्वार्थासाठी आपण ते दुःख बाजूला सारून आनंद साजरा करत आहेत याचा निषेध करावा तेवढा कमी आहे पण मला चांगल्याने माहिती आहे की आमच्या हिंगणघाट शहरातील जनता आपल्या लेकीच्या दुःखाचे दुःख बाजूला सारून आपल्या उत्सवात सहभागी होणार नाही
नागरिकांनो माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या लेकीसाठी या स्वार्थी उत्सवात सहभागी होऊ नका यांचा हा कार्यक्रम हाणून पाडा आपल्या लेकीला आपली व आपल्या प्रार्थनेची गरज आहे आणि या रोटरी उत्सव समितीला आपल्या पैश्याची गरज आहे आपण जर यांच्या उत्सवात सहभागी नाही झालो तर यांचे जमिनीवर नसलेले पाय जमिनीवर येईल हे आपल्या दुःखात सहभागी नाही होऊ शकत तर यांच्या सुखात सुद्धा सहभागी होऊ नका
आपल्या लेकीसाठी प्रार्थना करा व नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पेटून उठा आपल्या खूप लेकी असल्या विकृत नराधमांच्या कृत्याला बळी पडल्या आता आपणच आपल्या लेकींना सुरक्षित ठेवू आणि कायदा जर आरोपीला पळवाटा देत असेल तर त्या पळवाटा आपण रोखून छत्रपती शिवरायांचा कायद्याप्रमाणे त्यांना आपणच शिक्षा देऊ
आता अन्याय सहन करायचा नाही आणि होऊ पण द्यायचा नाही
आता विकृतीला वेळीच ठेचायचं
रोटरी उत्सव २०२० वर बहिष्कार टाका लेकीच्या सन्मानासाठी
जय हिंद जय शिवराय
[ सदर लेख लेखकाचे नाव खोडून कुणीही कॉपी पेस्ट करू नये ]
लेख जास्तीत जास्त प्रमाणात शेयर करा
_____________________________________
♀ लेखक ♀
राहुल रमेशराव दारुणकर
जिल्हा अध्यक्ष व समाजसेवक
युवा परिवर्तन की आवाज सामाजिक
संघटना वर्धा जिल्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!