या घोड्यावर बसलेल्या महिला कोण आहेत?
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, पण ह्या योध्या महिला कोण आहेत?
त्यांच्या बाबत मला काही नाही माहीत. असे, महाराणी ताराबाई साहेब यांच्या छायाचित्राकडे बोट दाखवत माजी लष्करप्रमुख बिपीन रावतांनी कुतुहलपूर्वक विचारणा केली.
त्यांना मी सांगितलं की, आपल्या देशात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची माहिती जाणीवपूर्वक बरीच सांगितली गेली. त्यांच्या शौर्याला सुद्धा मानलं पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची सून असलेल्या ताराबाई साहेबांचा इतिहास लोकांच्या समोर सांगीतला गेला नाही. अल्पावधीत तीन छत्रपतींच्या मृत्यू मुळे मराठा साम्राज्याला जबरदस्त धक्का बसला होता. त्यावेळी खऱ्या अर्थाने स्वराज्यावर छत्र धरण्याचे कार्य या रणरागिणीने केले. औरंगजेबासारख्या शक्तिशाली बादशहासमोर ही रणरागिणी सलग 7 वर्ष लढा देत उभी होती. औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीतच आपली कबर खोदवी लागली. अश्या या महान कर्तबगार स्त्रिचा देशपातळीवर उचित गौरव केला गेला नाही.
असे मी म्हणताच बिपीन रावत साहेबांनी एक इच्छा व्यक्त केली. आमच्यासाठी आज नवीन प्रेरणास्थान ठरलेल्या महाराणी सोबत फोटो घ्यायचा आहे. तोच हा इतिहास समजून घेत असलेला फोटो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि एकंदरीतच मराठ्यांच्या इतिहासाने विशेष प्रभावित असलेले माजी लष्कर प्रमुख, आणि वर्तमान सी डी एस तिन्ही सेनादलांचे प्रमुख जन. बिपीन रावत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!