जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

काँग्रेस इतकी कृतघ्न कशी वागते....

SAM बहादुर या चित्रपटात माणेकशॉ यांचा संपूर्ण जीवनपट त्यांना फील्ड मार्शल पद मिळाले तो पर्यंत दाखविला आहे. 

त्यांचे पुढचे आयुष्य हे "अप्रिय सत्य सांगू नये" (न ब्रूयात सत्यम अप्रियम) या संस्कृत उक्तीप्रमाणे सांगितले नाही. 

त्या साठी हा प्रपंच.

राजकीय मत नाही पण कधीकधी काँग्रेस इतकी कृतघ्न कशी वागते याचे हे उदाहरण आहे.

फील्ड मार्शल हे पद तहहयात असते. फील्ड मार्शल कधीही निवृत्त होत नाही. शेवटपर्यंत तो त्याची वर्दी वापरू शकतो. इतर सर्व अधिकाऱ्यांची Command Cane त्यांच्या युनिट ची निशाणी वागवतात. पण फील्ड मार्शल Command Cane वर भारताची राजमुद्रा 
(चार सिंह) आहेत. संपूर्ण भारत तुमच्या कमांड मध्ये आहेत हे दाखवण्याचे ते प्रतिक आहे.

फील्ड मार्शल पद मिळाल्यापासून माणेकशॉ ३० वर्ष हयात होते.

या ३० वर्षात सरकार ने त्यांच्यावर परदेशी चलन व्यवहार अंतर्गत खटला भरला. (त्यांच्या जावयाच्या कंपनी मध्ये ते Advisor होते म्हणून) सुदैवाने हे युद्ध माणेकशॉ कोर्टात जिंकले आणि निर्दोष बाहेर आले.

त्यांचा या ३० वर्षाचा पगार काँग्रेस सरकारने थांबवला. ते शेवटच्या आजारात राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यांना भेटायला गेले तेंव्हा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही गोष्ट कलाम यांना सांगितली. तेव्हा ते हादरले. निवृत्त नाही म्हणून पेन्शन नाही आणि नोकरीत असून पगार नाही अशा अवस्थेत त्यांनी तक्रार न करता ३० वर्ष काढली.
कलामां नी चौकशी केल्यावर नोकरशहा उत्तरले की फील्ड मार्शल नवीन पद असल्याने
 पे स्केल ठरले नाही. राष्ट्रपती नी नेहमीच्या कामात हस्तक्षेप करू नये हा पायंडा मोडून कलामांनी विजेच्या वेगाने काम करून त्यांचा ३० वर्षाचा पगार तसेच Arrears आणि त्यावरील व्याज धरून श्री. माणेकशॉ यांचेकडे पाठवून दिला. रक्कम होती रू.१.३ कोटी !!!
राष्ट्रपतींच्या सचिवाने तो चेक श्री.माणेकशॉ यांना दिल्यावर त्याच वेळी श्री.माणेकशॉ यांनी ते सर्व पैसे आर्मी विधवा फंड यांना दान केले.

ते गेले त्यावेळी श्रीमती प्रतिभा पाटील राष्ट्रपती होत्या, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि
 ए के अँटनी रक्षा मंत्री. या तिघांपैकी एकही महानुभाव त्यांच्या अंत्यात्रेला उपस्थित नव्हता.

सैन्याच्या प्रथा आपण इंग्लंड कडून घेतल्या आहेत असे म्हणतो. इंग्लंड चे राजघराणे कुठल्याही Funeral Service ला उपस्थित राहत नाही हा दंडक आहे. अपवाद फक्त राजघराण्यातील मृत्यू किंवा फील्ड मार्शल चा मृत्यू.

इंग्लंड कडून आपण घेऊ नये ते घेतले पण कृतज्ञता घेतली नाही.

क्रांतिसिंह नाना पाटील, नरसिंह राव, फील्ड मार्शल माणेकशॉ यांच्याबद्दल काँग्रेस असा का वागला की 'मरणांतानी वैराणी' हे साधे तत्व पण विसरला हे कळत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!