जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

सत्यशोधक भाई माधवराव बागल जन्मदिन गौरव लेख


सत्यशोधक भाई माधवराव बागल जन्मदिन

जन्म - २८ मे १८९५ (कोल्हापूर)
स्मृती - ६ मार्च १९८६

#सत्यशोधक #भाई #माधवरावबागल यांना प्रथम त्रिवार अभिवादन. भारतीय इतिहासात करवीरनगरी कोल्हापूर या शहराने वेळोवेळी प्रत्येक क्षेत्रातील अनेक शिल्पकार नि शिलेदार जन्माला घातलेले आहेत. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानात २८ मे १८९६ ला जन्माला आलेले व महाराजांच्या निस्सीम प्रेमाने बहरलेले भाई माधवराव बागल हे असेच एक अजबगजब रसायन. चित्रकार, लेखक, स्वातंत्र्य चळवळ सेनानी, राजकारणी, सामाजिक सुधारणावादी, सत्यशोधक, गांधीवादी, फर्डा वक्ता, पत्रकार, शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता, मजूर चळवळीचा कार्यकर्ता, अस्पृश्यता निवारण कार्यकर्ता, मिश्रविवाह समर्थक, समाजवादी असे नाना पैलू असलेल्या महाराष्ट्राच्या या बहुआयामी महाविभूतीने केवळ गांधीजींच्या सल्ल्याने स्वत:मधील चित्रकार एका झटक्यात स्वत:तून बाजूला सारला. जे.जे. स्कूल्स ऑफ आर्ट्स या अत्यंत प्रतिष्ठीत अशा शिक्षणसंस्थेतून चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्या माधवरावांना महात्मा गांधींनी १९२६ मध्ये कोल्हापूरला “अशी चित्रे काढा की जनसेवा घडेल” अशी प्रेरणा देताच या स्वातंत्र्यसेनान्याने क्षणार्धात हातातील कूंचला बाजूला सारून अख्खे जीवन लेखणीला समर्पीत केले. महात्मा ज्योतीराव फुल्यांची सत्यशोधक चळवळ अत्यंत जोमाने पुढे नेताना ‘सत्यशोधकांनी समाजवादी व्हावे’ अशाप्रकारची मांडणी करून आंबेडकर-नेहरू यांना अपेक्षीत समाजवादी सुदृढ भारत घडविण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. १९३१ मधील त्यांच्या भाषणातील ‘महात्मा गांधी हे खरे सत्यशोधक आहेत’ हे त्यांचे वाक्य तत्कालीन महाराष्टीय समाजकारणाची कुस बदलविणारे ठरले. 

दलितांचे सामाजिक उन्नतीकरण व अस्पृश्यता निर्मुलन ही त्यांच्या सामाजिक कार्याची प्रमुख वैशिष्टे होय. १९३२ मध्ये जगदंबा मंदीर व मारुती मंदीरातील दलितांच्या प्रवेशाचा लढा त्यांनी मोठ्या निकराने लढला. त्यावेळेस त्यांना सामाजिक क्रांतीच्या प्रयत्नाकरिता राजद्रोहाची नोटीस बजावण्यात आली. कोल्हापूर संस्थानामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने १९३९ मध्ये त्यांनी स्थापन केलेली प्रजापरिषद त्यांच्या राजकीय जीवनातील एक मोठी उपलब्धी होय. या चळवळीमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. १९३८ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेवून काढलेल्या प्रचंड मोठ्या मोर्चामुळे त्यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वसामान्य जनतेला सरकार विरुद्ध संघर्ष करण्याची माधवरावांच्या विचारांतून प्रेरणा मिळू नये याकरिता त्यांच्या पायात लोखंडी बेड्या घालुन त्यांची कोल्हापूरच्या हमरस्त्यावरुन धींड काढल्या जात असे.

गांधीजींच्या विचारांनी प्रेरीत होवून त्यांनी १९४२ च्या भारत छोडो या लढ्यात करवीरनरेश छत्रपती शाहूंनी ईंग्रजांविरूद्ध लढा पुकारावा याकरिता प्रयत्न केलेत. ३० जानेवारी १९४८ ला झालेल्या त्यांच्या प्रेरणास्त्रोत म्हणजेच महात्मा गांधींच्या नृशंस हत्येमूळे ते प्रचंड उद्वीग्न झालेत. गांधी हत्येचा रोष म्हणून कोल्हापुर शहरात संघसमर्थक व हिंदूमहासभा समर्थकांची घरे व प्रतिष्ठानांची जनता जाळपोळ करित असताना त्यांनी कोल्हापुरच्या रस्त्यांवर फिरून संघ व हिंदुमहासभा अनुयायांना व त्यांच्या संपत्तीला सरंक्षण देण्याचा मोठेपणा दाखविला. त्यांनी चालविलेले हंटर, अखंड भारत, आघाडी, धडाडी हे वृत्तपत्रे तत्कालीन ईंग्रज सरकारने प्रतिबंधीत केलेत. त्यांच्या मर्मभेदी वकृत्त्व शैलीमूळे त्यांच्या भाषणावर सुद्धा सरकारला बंदी आणावी लागली.

भारतीय स्वतंत्रता लढ्यात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. १९४० ते १९४७ या कालावधीत त्यांचा गांधी, नेहरू, पटेल यांचेसोबत अगदी नजीकचा संबंध आला. १९३० मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या माधवरावांनी पुढे कॉंग्रेसच्या शेतकरी-कामकरी ध्येयधोरणा सोबत मतैक्य नसल्याने स्वातंत्र्यप्राप्ती नंतर क्रांतीसिंह नाना पाटील, केशवराव जेधे, शंकरराव मोरे या मातब्बरांसोबत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराजांचे सहकारी भाष्करराव जाधवांसोबत माधवरावांनी कोल्हापूरच्या परिसरात कृषी सहकारी सोसायट्यांची स्थापना करुन शेतकऱ्यांना पतपुरवठा करणेकरिता महत्त्वाचे कार्य केले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा भाई माधवराव बागलांनी हिरीरीने सहभाग घेतला. बेळगाव सत्याग्रहामुळे त्यांना सहा महीने तुरुंगवास भोगावा लागला. कूंचला, लेखणी, कूदळ, फावडे असा माधवरावांच्या जीवनाचा प्रवास होता. कला व क्रांती या दोन्ही क्षेत्रात सहज व समर्थपणे संचार करणाऱ्या या विभुतीच्या व्यक्तीमत्त्वावर राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ.आंबेडकर या विचारवादळांची छाप होती. त्यांनी ९ डिसेंबर १९५० ला कोल्हापूर नगरीत डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा उभारला. गांधीजींच्या प्रेरणेतुन समाजकार्याकरिता बाजुला सारलेला कूंचला आंबेडकरांप्रती असलेल्या निष्ठेतून त्यांनी परत हातात घेवून हा पुतळा बाबासाहेबांच्या हयातीतच स्वतः साकारला हे विशेष.

५० ते ५५ विवीध साहित्यकृती निर्माण करणार्‍या भाई माधवराव बागलांच्या लेखणीतून ज्योतीराव फुले यांचे सत्यशोधकी विचार कागदावर सहजरित्या उतरुन सर्वसामान्य जनतेच्या काळजापर्यंत भिडत असत. समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी, अस्पृश्यता, सनातनी दहशतवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विखारी वृत्ती, अशा अनेक विषयांवर त्यांची लेखणी धारदार करवतीसमान चालत असताना त्यांनी कुणाचीही भीड राखली नाही. त्यांनी अनेकदा स्वजातीय मराठा व्यक्तींना सुद्धा त्यांच्या लेखणीतुन आडव्या हाताने घेतले हे त्यांच्या पुर्वग्रहरहित लिखाणाचे सौंदर्य होय. 

धार्मिक सनातन्यांविरुद्ध त्यांची चाललेली लेखणी तत्कालीन धर्ममार्तंडांना मोठी अडचणीची ठरलेली असायची. कोल्हापुरातील महाद्वार रोडवर आर.एस.एस. च्या एका स्वयंसेवकाने त्यांचेवर एकदा अशाच एका लिखाणामुळे जिवघेणा हल्ला केलेला होता ही बाब महाराष्ट्र सरकारने प्रकाशीत केलेल्या त्यांचेवरील एका सन्मानग्रंथात नोंदविलेली आहे. त्यांच्या बुद्धीप्रामाण्यवादी विचारांमुळे जनमानसांत मोठी जागरुकता निर्माण होत असल्याच्या न्यूनगंडातुन कोल्हापुरातील सनातन्यांनी त्यांची जीवंतपणी प्रेतयात्रा काढल्याचे दुष्कृत्य या महाराष्ट्राने बघितलेले आहे. १९६९ मध्ये मनुस्मृतीवर त्यांनी ‘गोळवलकरी राज्य आले तर’ या पुस्तकातुन प्रचंड वैचारिक लत्ताप्रहार केलेला आहे. सद्यस्थितीत माजलेली असहिष्णुता व व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी त्यांनी आजपासुन ५० वर्षापुर्वी लिहिलेल्या या पुस्तकात नोंदवुन ठेवण्याचा दुरदृष्टिकोन बाळगला होता.

दिर्घ आयुष्य जगलेल्या या उत्तुंग उंचीच्या समाज सुधारकाने स्वतःचे संपुर्ण आयुष्य लोककल्याणकारी आंदोलनांच्या यज्ञात झोकून देताना एकदा पत्रके छापण्याकरिता पत्नीच्या अंगावरील मंगळसुत्र विकण्यासही मागेपुढे बघितले नाही. मात्र आयुष्याच्या अंतिम कालखंडात या महामानवाला आर्थिक विवंचना सहन करावी लागली हा दैवदुर्विलास म्हणावा की आमचा कृतघ्नपणा. अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक उन्नतीच्या ध्येया करिता धगधगत असलेले हे गांधीवादी सत्यशोधकी यज्ञकुंड ६ मार्च १९८६ ला कायमचे विझले. महाराष्ट्र शासनाने त्यांचे स्मृतीस्मरणार्थ माधवरावजी बागल विद्यापीठ, कोल्हापुर स्थापन करुन त्यांच्या विचारांना मानवंदना दिली. १९९८ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचेवर 'भाई माधवराव बागल-निवडक लेखसंग्रह' हा ग्रंथ प्रकाशित करुन त्यांचा आयुष्यपट उघडण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राच्या अशा या उपेक्षित कर्मयोग्यास सलाम !

सचिन चौधरी, अमरावती

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

********************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!