डॉ वर्षा रामचंद्र चौरे धनगररत्न पुरस्काराने सन्मानित
डॉ वर्षा रामचंद्र चौरे धनगररत्न पुरस्काराने सन्मानित
नवी मुंबईतील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वर्षा रामचंद्र चौरे यांना काल ठाणे येथे “धनगररत्न (आरोग्य क्षेत्र) पुरस्कार २०२३” ने सन्मानित करण्यात आले. अमेरिकेच्या जागतिक संविधान आणि संसद परिषदेच्या सदस्य व सोबतच डॉ. वर्षा युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पूलची देखील सदस्य आहेत. सन २०२१ मध्ये, त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग प्राग, झेक प्रजासत्ताक, संस्थेचे सरचिटणीस सर राफाल मार्सिन यांनी आयोगाच्या स्पेशल मॉनिटरिंग मिशन चे सदस्यत्व जाहीर केले आहे. यापूर्वी 8 मार्च 2019 रोजी माय स्टॅम्प से टेनंट या मालिकेअंतर्गत भारत सरकारच्या टपाल विभागाकडून डॉ. वर्षा चौरे जी यांचे पोस्टल स्टॅम्प जारी करण्यात आले आहे.
त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध आहेत. डॉ वर्षा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवेत योगदान देत आहेत आणि त्यांच्या अन्य संस्थांच्या माध्यमातून ते इतर सामाजिक कार्य करतात. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील इर्ला या छोट्याशा गावातून मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेऊन आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणे हे नि:संशय कौतुकास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या डॉ. वर्षाजीनी आपले राष्ट्रीय कर्तव्य मानत कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिलेले आरोग्य सेवेतील योगदान उल्लेखनीय आहे. लहानपणापासूनच धडपडणाऱ्या डॉ. वर्षा चौरे जी आपल्या यशाचे श्रेय नेहमी त्यांचे आई-वडील सुनीता-रामचंद्र, मार्गदर्शक डॉ. सुधीर तारे आणि गुरुजनांना देतात. प्रखर इच्छाशक्तीचे दुसरे नाव म्हणजे डॉ. वर्षा रामचंद्र चौरे या भारताच्या कन्येबद्दल केवळ त्यांचे गाव, शाळा, गुरुजन यांनाच नाही तर संपूर्ण भारतीयांना गर्व आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी डॉ. वर्षाजींची ही सर्व कामगिरी पाहून त्यांची निवड साप्ताहिक झिरो माईल या साप्ताहिकाद्वारे दरवर्षी देशभरातील केवळ 20 लोकांना दिल्या जाणाऱ्या “झिरो माईल आयकॉन अवॉर्ड 2022” मध्ये झाली होती. धनगर प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी सांगितल्यानुसार २८/०५/२०२३ रोजी, धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे आयोजित धनगररत्न पुरस्कार सोहळा २०२३ हा पुरस्कार सोहळा नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका मुख्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, मा. नरेश मस्के, अँड. नानासाहेब मोटे, मा. बाबासाहेब दगडे, मा. सुनील कुराडे, मा. सुहास होनमाने, अँड अभिमान पाटील तसेच धनगर प्रतिष्ठानचे दीपक कुरकुंडे, तुषार धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!