जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

राधानगरी बस स्टँड वरून संशोधकाचा मोबाईल अज्ञाताने केला लंपास

राधानगरी बस स्टँड वरून संशोधकाचा मोबाईल अज्ञाताने केला लंपास

प्रतिनिधी (दिनांक २६ सप्टेंबर) :  राधानगरी बस स्टँड वरून एका संशोधकांचा अनवधानाने विसरलेला मोबाईल एका अज्ञात प्रवाशाने लंपास केला आहे. 

एक संशोधक आपल्या व्यक्तिगत कामासाठी बसची वाट बघत राधानगरी बस स्टँड वर बसले होते. बस येताच लगबगीने त्यांनी बसकडे धाव घेतली. अनवधानाने त्याच्या हातातील मोबाईल तिथेच बसलेल्या ठिकाणी राहिला. सदरचा मोबाईल तिथे आलेल्या एका प्रवाशाला दिसला आणि तो त्याने आगार नियंत्रकांला जमा न करता लागलीच अवघ्या ८ मिनिटात स्वीच ऑफ करून लंपास केला. 

मोबाईलच्या किमती पेक्षा त्यात असलेली राष्ट्रहिताची संशोधनात्मक माहिती व अभ्यास कार्य महत्त्वाचे आहे. सदरच्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याबाबतीत राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार केली असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत. 

सदरचा व्यक्ती हा प्रथमदर्शनी सराईत चोरटा दिसत नाही. पण त्याने राधानगरी येथील साई ट्रेडिंग मधून हुज्जत घालून #200₹ ची बांधकाम तार विकत घेतली आहे. तो राधानगरी शहर आसपासच्या गावातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेंव्हा भागातील समस्त #मोबाईल दुरुस्त व सेवा देणाऱ्या सर्व दुकादारांना या नोटीसने आगाह करण्यात येते की चॉकलेटी लेदर फ्लीप कव्हर असलेला #नारझो #50A मोबाईल हा लॉक तोडण्यासाठी आपल्या दुकानात आला असल्यास तत्काळ याची खबर राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये देणे किंवा ड्युटीवर हजर असलेल्या राधानगरी बस स्टँड आगार व्यवस्थापक यांचेकडे जमा करणे. मोबाईल बद्दल कोणतीही माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल आणि त्यास योग्य बक्षीस देण्यात येईल. अति उत्साहात किंवा काही पैशाच्या बदल्यात लॉक तोडण्याचे काम मोबाईल दुरुस्त करणाऱ्याने केल्यास आणि पोलीस तपासात तसे निष्पन्न झाल्यास याचे परिणाम फार भयंकर होतील. 

राष्ट्रहिताच्या माहितीचा भंग के्याप्रकरणी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सरकारच्या वतीने जरी पोलीस तपास करत असले तरीही संशोधक टीम स्वतः सर्व त्या शक्यतांचा विचार करून स्वतः तपास करत आहे. त्यामुळे ही माहिती राधानगरी शहरा जवळील सर्व त्या गावात गावात व्हायरल करावी. घर बांधकामास वापरणारी तार हा तपासाचा मुख्य धागा आहे. 

कोणत्याही प्रकारची छेडछाड न करता सदर व्यक्तींनी मोबाईल परत दिल्यास त्यांना अभय देण्याची हमी संशोधकांच्या कडून देण्यात आली आहे. 

मध्यस्थी करिता :
पिरळ येथील BPN News चे पत्रकार श्री उत्तम पाटील (940 499 0713) किंवा #ABS #News #TV (820 894 8896) ला संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!