देहूत काल तुझ्या रे भोंदू येऊन गेला,
सवयीने नेहमीच्या थापा मारून गेला!
माखलेत हात ज्याचे रक्तात माणसांच्या ,
बघ अहिंसेवरती बाता मारुन गेला!
गौरव तुझाच केला तुझ्याच संतत्वाचा,
डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
मुखवटा तुझा त्याने परिधान केला होता,
सोंग वारकर्याचे वठवून छान गेला!
तुझी रंजली माणसे हा त्यांना गांजतो आहे,
फेकून चार गोष्टी तो टाळ्या खाऊन गेला!
पाडू उघडे पितळ या ढोंगी माणसाचे,
गावात तुझ्या जरी तो खाऊन भाव गेला!
------ प्रा.प्रकाश नाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!