जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

भुजबळ, वडेट्टीवारांसाठी फडणवीस खोटं बोलत आहेत- शिवाजी कवठेकर

मराठा संघटनांनी जागे व्हावे ! 
कारण, भुजबळ, वडेट्टीवारांसाठी फडणवीस 
खोटं बोलत आहेत- शिवाजी कवठेकर 
बीड दि.14 (प्रतिनिधी):- ओबीसींचा डाटा गोळा करण्याची पद्धत सदोष असल्याने ओबीसींची संख्या घटणार आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणताहेत, जे सपशेल खोटं आहे.पण आम्ही 54 टक्के आहोत असे वर्षानुवर्षे दरडावून सांगणाऱ्या ना.छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांना वाचविण्यासाठी फडणवीस तसं बोलत आहेत.म्हणून ओबीसी आरक्षणात अपहार करणार्‍या अपराध्यांना पकडण्यासाठी मराठा संघटनांनी आता तरी जागे व्हावे, असे आरक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.
         पत्रकात पुढे म्हटले आहे की, आडनावांवरून ओबीसी ठरविण्याच्या पद्धतीमुळे ओबीसींची संख्या घटेल, असे फडणवीस म्हणत आहेत.पण ते कसे शक्य आहे? कारण, या पद्धतीने संख्या वाढू शकते, ती घटू कशी शकते? पण माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी हा उलटाच तर्क दिला आहे. ज्याचे समर्थन मंत्री विजय वडेट्टीवार व माजी खा.हरिभाऊ राठोड यांनी खूप तत्परतेने केले आहे.मोजणी केल्यावर ओबीसींची संख्या घटणार आहे. कारण, ती वास्तवातच खूप कमी आहे.पण, ओबीसी आरक्षणाचा मुख्य कायदेशीर आधारच लोकसंख्या आहे.आणि महाराष्ट्रात घटनेनुसार ओबीसी असलेल्या 33 टक्के मराठा समाजाला आरक्षणाबाहेर ठेवलेले असल्याने,उर्वरित हिंदू ओबीसींची संख्या 6-7 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाही.आणि त्यामुळे, ओबीसींची आरक्षण पात्रता केवळ 3-4 टक्के असताना त्यांना 30 टक्के आरक्षण भुजबळांनी 1994 ला बहाल केलेले आहे.जे बेकायदेशीर आहे,आणि जे त्यांना त्यांच्या आरक्षणपात्रतेच्या नऊ दहा पटीत लागू झालेले आहे.आणि जे मराठयांच्या वाट्याचे आहे.आणि त्यामुळे, ओबीसींची मोजणी करून येणाऱ्या कायदेशीर आरक्षणपात्रतेनुसार त्यांना आरक्षण द्यावे, व अतिरिक्त खुले करावे, या मागणीसाठी तर आमच्या आरक्षण बचाव आंदोलन समितीने 12 डिसेंबर 21 पासून आंदोलन सुरू केलेले आहे. ज्याचा आज 185 वा दिवस आहे. या दरम्यान आंदोलन समितीने बारा उपोषणे व ओबीसींच्या लोकसंख्येवर आणि मंत्र्यांसह देवेन्द्र फडणवीस यांच्या खोटं बोलण्यावर आणि या प्रश्नाकडे ओबीसी नेत्यांच्या भितीने जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांविरुद्ध 120 पेक्षा अधिक प्रसिद्धी पत्रके काढली आहेत. पण ते सगळेच चोर चोर मौसेरे भाई असल्यामुळे, या185 दिवसांत आमच्या आंदोलनाची कोणी काही दखल घेतली नाही. पण आम्ही मांडत असलेलं सत्य या सगळ्या नेत्यांनी आजपर्यंत उडवून लावलेलं असल्यामुळे, ते आता स्पष्टपणे समोर येणार आहे.आणि भुजबळांसह सगळे खोटं बोलत होते, हे सिद्ध होणार आहे. म्हणून, पद्धत सदोष आहे म्हणून नाही, तर ओबीसींची लोकसंख्या वास्तवातच खूप कमी आहे. आणि म्हणून ती घटलेली असणार आहे, हेच फक्त खरं आहे. म्हणून, याच बेकायदेशीर ओबीसी आरक्षणामुळच मराठ्यांना आरक्षण मिळालेले नाही, हे ध्यानात घेऊन आपल्या नेत्यांकडून आरक्षणाची खोटी आशा दाखवून फसवल्या गेलेल्या मराठा समाजाच्या संघटनांनी आता तरी जागे व्हावे, असे प्रसिद्धी पत्रकातून शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.

#भुजबळ #वडेट्टीवार #फडणवीस  
#शिवाजीकवठेकर #मराठाआरक्षण
#Maratha#Reservation
#Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!