जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

त्यावेळी नेहरुंनी ट्रॅक्टर ऐवजी विमान खरेदी केले असते तर..?


त्यावेळी नेहरुंनी ट्रॅक्टर ऐवजी विमान खरेदी केले असते तर..?

पंडित जवाहलाल नेहरूंच्या आयुष्याचा तीस वर्षे पेक्षा जास्त काळ ब्रिटिश साम्राज्य व भारतातील काही संस्थानांच्या विरोधात लढण्यात गेला. ९ वर्षापेक्षा जास्त काळ नेहरू तुरुंगात राहिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट उपसलेले नेहरू स्वातंत्र्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदी आले हे देशाचे भाग्यच म्हणावे लागेल. आज अन्नधान्य उत्पन्नात स्वयंपूर्ण होऊन धान्य निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख असली तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरीच वर्षे आपला देश अन्नधान्य आयात करीत होता; अन्नधान्यासाठी इतर प्रगत देशांवर अवलंबून होता. तो भारत स्वयंपूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पादन झाले पाहिजे हे नेहरूंचे धोरण होते. त्या काळात सिंचनाच्या सोयी नव्हत्या, शेतीसाठी आधुनिक औजारे नव्हती, वीज नव्हती. भारत अन्नधान्याने स्वयंपूर्ण झाला पाहिजे याचा ध्यास नेहरूंनी घेतला होता. त्यांना ट्रॅक्टर हे शेतीसाठी आधुनिक औजार म्हणून उपयुक्त वाटले. आज जरी भारतात खेडोपाडी लाखो ट्रॅक्टर दिसत असले तरी त्या काळी भारतीयांसाठी ट्रॅक्टर ही नवीन आणि चमत्कारीक वस्तू होती.

ऑक्टोबर 1948 ला नेहरू लंडनला गेले होते. तिथे ते ट्रॅक्टरचे पितामह म्हटल्या जाणाऱ्या हेन्री फर्ग्युसन यांना भेटले. हेन्री यांनी १९०९ मध्येच स्वतःचे विमान सुद्धा बनवलेले होते. परंतु लंडनमध्ये पंतप्रधान नेहरू हेन्रीचे विमान पाहायला नाही तर हेन्रीने बनवलेला अगदी अलीकडील तंत्रज्ञानाने युक्त असा ट्रॅक्टर पाहायला गेले होते. हा ट्रॅक्टर भारतीय रस्त्यांवर चालेल आणि शेतीची कामे करू शकेल असा होता. महत्वाचे म्हणजे अमेरिकन बनावटीच्या ट्रॅक्टरपेक्षा हेन्रीचा ट्रॅक्टर स्वस्त होता. 

नेहरूंना ट्रॅक्टर सर्वदृष्टीने पसंत पडला आणि त्यांनी आपले अन्नधान्य व शेती मंत्री जयरामदास दौलतराम यांना तिथूनच तार पाठवली – ‘मी इथून ३०-४० ट्रॅक्टर चाचणीसाठी म्हणून पाठवतो आहे. मला खात्री आहे की काश्मीरच्या श्रीनगरला यातील २ ट्रॅक्टर पाठवले तर तिथले अन्नधान्याचे उत्पादन निश्चितच वाढेल’. नेहरू इतका सूक्ष्म विचार करायचे.

पुढे भारतात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आले. राष्ट्रपती भवनच्या आवारातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी एक ट्रॅक्टर मशागतीला लावला गेला. तेव्हा तेथील इस्टेट विभागाने बागीच्याच्या जमिनी लागवडीखाली आणायला विरोध केला. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ही गोष्ट नेहरूंना कळवली. तेव्हा नेहरूंनी संबंधित विभागालाच थेट समज देणारे पत्र लिहिले – ‘फुलांपेक्षा अन्नधान्य महत्वाचे आहे. देशातील जमिनीचा अगदी कानाकोपरा अन्नधान्याच्या उत्पादनासाठी उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी बगीचेच काय, वापरात नसलेले बंगले सुद्धा पाडून त्याखालील जमिनी देखील आम्ही लागवडीखाली आणू’. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी नेहरूंनी ‘फूड प्रोडक्शन प्रोग्राम’ आखला होता आणि तो काटेकोर अंमलात आणण्यासाठी नेहरू किती आग्रही होते ते त्यांच्या वरील विधानावरून दिसून येते.   

पुढे फर्ग्युसन ट्रॅक्टरची निर्मिती भारतात सुरु झाली. त्याचवेळी खास भारतीय बनावटीची यंत्रसामग्री निर्माण करणे हे सुद्धा नेहरूंचे ध्येय होते. त्यानुसार ‘हिंदुस्थान मशीन टूल्स’ –एचएमटी, या नावाने सार्वजनिक उद्योग सुरु करण्यात आला आणि एचएमटी नावाने ट्रॅक्टर बाजारात आला जो शेतकऱ्याच्या पसंतीला उतरला. पुढे या ट्रॅक्टरने भारतात मोठी कृषी क्रांती घडवून आणली हे सर्वांना ज्ञात आहे. मोठमोठ्या अवजड यंत्रांच्या निर्मितीसाठी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ या नावाने एक दुसरा सार्वजनिक उद्योग सुरु करण्यात आला. त्यातून देशाच्या रेल्वेला लागणाऱ्या इंजिन्सची आणि त्यासारख्या अनेक अवजड यंत्रांची निर्मिती आजही सुरु आहे. 'याला म्हणतात देश स्वयंपूर्ण होणे, आत्मनिर्भर होणे.' संरक्षण सामग्रीसाठी खाजगी कंपन्यांवर अवलंबून राहणे यास स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता म्हणणे ही देशाची फसवणूक आहे.

नेहरूंच्या या सर्व योजना आणि त्यांची अंमलबजावणी ऑक्टोबर १९४८ मधील आहे. १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाचे संस्थान भारतात विलीन करण्यात आले होते. भारताच्या राज्यकारभाराची, शासन कसे असावे यासाठीची संहिता- राज्यघटनेची निर्मिती चालू होती; देशाने कोणत्या दिशेने प्रवास करायचा त्याचे लेखन चालूच होते. परंतु जसा महात्मा गांधींच्या स्वप्नातला एक भारत होता तसा नेहरूंच्या सुद्धा स्वप्नातला एक विज्ञान-तंत्रज्ञान व विविध उद्योगांनी, लोककल्याणाच्या सोयींनी युक्त असा भारत होता आणि त्याला आकार देण्यासाठी त्यांना उसंतच नव्हती. नेहरूंच्यापुढे शेती बरोबरच शिक्षण, आरोग्य, तेल, विविध खनिज उद्योग, सिंचन, वीजनिर्मिती, दळणवळण, विविध क्षेत्रातील संशोधन आदी कामांचा ढीगच ढीग होता; त्यामुळे नेहरूंना ‘आराम हराम’ होता. त्यांनी नवीन भारताच्या निर्मितीसाठी सर्व भारतीयांना ‘आराम हराम है’ हा मंत्रच दिला होता. 

नेहरूंनी जर त्यावेळी हेन्री यांच्याकडून ट्रॅक्टर न घेता हेन्रीचे विमान पाहून विमानच खरेदी केले असते तर? तर, आजच्या फकिराला स्वतःच्या चैनीसाठी ८००० कोटींचे विमान घेणे दूरच आजही आम्हा भारतीयांचे अन्नावाचून भूकबळी झाले असते. पण फकीर ज्या देशाद्रोद्रोहींच्या शाळेत शिकला ते नेहरूंविषयी खोट्यानाट्या गोष्टी सोशल मिडीयावर प्रसारित करून तरुणांच्या डोक्यात विष पेरून बहुजनांच्या नेत्यांविषयी त्यांच्या मनात घृणा निर्माण करीत आहेत. तरुणांच्या डोक्यात गुन्हेगारी वृत्ती पेरत आहेत. बहुजन समाजाला गुन्हेगार बनवले जाते आहे.

तरुण मित्रांना माझी नम्र विनंती आहे, काँग्रेस पक्ष आणि गांधी, नेहरु, पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा खरा इतिहास वाचा. जे सत्य व वास्तव आहे तो इतिहास तुमच्यापासून लपवून खोटा इतिहास तुमच्यापुढे मांडला जात आहे. आपल्या नायकांनी, समाजसुधारकांनी आपल्यासाठी काय कष्ट उपसले ते समजून घ्या तरच या देशाचे स्वतंत्र्य टिकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!