जयप्रभा स्टुडिओ बचावसाठी इचकरंजीतून पाठिंबा रॅली
कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ म्हणजे मराठी चित्रपसृष्टीचा इतिहास.. जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता.. मराठी चित्रटसृष्टीचे युगपुरुष भालजी पेंढारकर यांच्याकडून लतबाईनी जुन्या काळात हा स्टुडिओ नाममात्र किंमतीत चित्रिकरणाच्या अटिवर विकत घेतला आणि तो परस्पर राजकीय नेत्याचा मुलांना व बिल्डर यांना विकला .काही वर्षांपूर्वी या स्टुडिओचे अस्तित्व संपण्याकमी प्रयत्न सुरू झाले आणि कोल्हापूरची अस्मिता असलेल्या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित राहावे याकरिता तीव्र संघर्ष सुरू झाला. याचाच भाग म्हणून इचलकरंजी आणि परिसरातील कलाकारांनी इचलकरंजी ते जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर अशा बाईक रॅलीचे 20 मार्च रोजी सकाळी 9 वा. आयोजन करण्यात आले आहे. घोरपडे नाट्यगृह पासून निघणाऱ्या या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शहर व परिसरातील कलाकार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!