राजू शेट्टी यांचे लढणे..!
राजू शेट्टी यांचे लढणे..!
या पोस्ट सोबत जो फोटो आहे ना तो नीट पहा.. हा फोटो आहे महावितरणच्या कोल्हापूर कार्यालयासमोरील रस्त्यावरील आंदोलनातील आहे..हो आणखी रात्रीच्या मुक्काम समयी या अंथरुणात राजू शेट्टी झोपले आहेत..मागणी काय आहे तर शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी....आणखी कधीतरी माझा पक्ष माझा नेता माझा गट या पलीकडे जाऊन या मागणी व लढ्याकडे पाहिले पाहिजे..शेतीला रात्रीचे पाणी देताना किती संघर्ष..किती जीविताला धोका..? त्यामुळे ही मागणी बळीराजाच्यादृष्टीने खूप महत्त्वाची आहे.
आणखी खरे तर महाराष्ट्राने राजू शेट्टी व त्यांचे लढणे अनेकदा अनुभवले आहे व ते ना केंद्रातील भाजप ना राज्यातील महाविकास.. यांच्या सोबत न जाता स्वतंत्र पणे लढत राहिले तरच शेतकऱ्यांचे हित आहे व शेट्टी यांचे राजकीय अस्तित्व देखील यातून अधिक बळकट होते हा पूर्वानुभव देखील आहे..आणखी लढणारे व राजसत्ता यांचे फारसे जुळत नसते म्हणून तर गोर गरिबांसाठी लढणारी अनेक मोठी माणसे सत्तेला जवळ करण्यापेक्षा लढत राहिली,प्रश्न विचारत राहिली,झुंजत राहिली..व त्यातच असंघटित कामगार,श्रमिक,शेतकरी यांना न्याय मिळण्याची पण शक्यता अधिक असते..आता एफआरपी चे तुकडे पाडल्यावर आघाडी सोबत आहे म्हणून शेट्टी गप्प कसे बसतील.? व असे लढताना विधानपरिषदेच्या लटकलेल्या आमदारकीचे पण काही सोयरसुतक नाही.. त्यामुळे यापुढे राजू शेट्टी हे एकाच वेळी भाजप व महाविकास आघाडी यांच्या विरोधात अधिक आक्रमकपणे लढताना दिसण्याची शक्यता आहे..
--मधुकर भोसले--
9423278276
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!