जोपर्यंत आम्हांला न्याय मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवणार उपाध्यक्ष धनाजी यमकर
जोपर्यंत आम्हांला न्याय मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवणार उपाध्यक्ष धनाजी यमकर
कोल्हापूर : १२/२/२०२२: एका दैनिकामध्ये जयप्रभा स्टुडिओ विक्री झाल्याचे बातमी प्रसिद्ध झाली. त्यावेळेपासून चित्रकर्मींच्या मनामध्ये असंतोषाची लाट पसरली. सदरची दखल घेऊन आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सर्व चित्रपट व्यावसायिक कलाकार-तंत्रज्ञ-कामगार तात्काळ महामंडळाच्या कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन केले. यातुन सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर सर्वानुमते जोपर्यंत आम्हांला न्याय मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवणार असे एकमत झाले. अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.
याचसोबत
• जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे.
• जयप्रभा स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरणाव्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये.
• कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायिकीकरण/वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये.
• जयप्रभा स्टुडिओ याचे जतन होण्याकरिता शासनाने लक्ष घालावे.
या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उद्या दि.१३/०२/२०२२ रोजी सकाळी १० वाजलेपासुन साखळी पद्धतीने जयप्रभा स्टुडिओच्या दारात उपोषण सुरुच राहील. या बैठकीस सह खजिनदार शरद चव्हाण संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, स्विकृत संचालक रवि गावडे, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, अभिनेते स्वप्नील राजशेखर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, छाया सांगावकर, रोहन स्वामी, अमर मोरे, अर्जुन नलवडे, बाबा पार्टे, विजय शिंदे, अवधुत जोशी, संग्राम भालकर आदी कलाकार-तंत्रज्ञ व कामगार वर्ग उपस्थित होते.
जयप्रभा स्टुडिओ, हा कलानगरी कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न तर आहेच, पण समस्त चित्रपट सृष्टीच्या वैभवशाली परंपरेचा, मुकपट जमान्यापासूनचा इतिहास आहे. फक्त मराठीच नव्हें तर हिंदीबरोबर इतर प्रादेशिक विविध भाषेतील चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडिओत झाले आहे. जयप्रभा स्टुडिओत चित्रीकरण म्हणजे, समाजप्रबोधनाचा प्रसार आणि व्यावसायिक यश असे समीकरणच चित्रपट सृष्टीत रूढ झाले आहे.अशा ह्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या जयप्रभा स्टुडिओचे आस्तित्व कायमपणे रहावे, ही आम्हा सर्व चित्रपट व्यावसायिकांची आणि रसिकांची मनापासून सदिच्छा आहे.
खरे तर अश्या ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तू आपल्या राज्याचा व देशाचा लौकिक वाढवत असतात. परदेशात अश्या वास्तू मुद्दाम सरकार स्वतः आहे तश्या राखून जनतेला असा ठेवा कायमस्वरूपी पाहण्यासाठी उपलब्ध करून देत असतात, तसेच आपल्या राज्य व केंद्र सरकारने ही वास्तू जपली पाहिजे.
मी, मेघराज राजेभोसले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने, सर्व कार्यकारिणीच्या वतीने ग्वाही देतो की, जयप्रभा स्टुडिओच्या आस्तित्वासाठी सनदशीर मार्गाने जे करणे शक्य आहे ते करण्यासाठी, कटिबद्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!