देशभरातील पाठिंब्यामुळेच शेतकऱ्यांचा विजय...!
देशभरातील पाठिंब्यामुळेच शेतकऱ्यांचा विजय
शिवाजी मगदूमःविविध पक्ष,संघटनांप्रती कृतज्ञता
संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने वर्षभरापासून तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू होते.या आंदोलनाला सर्व संघटना तसेच राजकीय पक्षांसह देशभरातून मिळालेल्या पांठीब्यामुळेच केंद्र सरकारला हे तिन काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले असे मत लाल बावटा संघटनेचे जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.यावेळी त्यांनी सर्वच संघटनांच्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.
या आंदोलनामध्ये किसान सभेसह सिटुतंर्गत लाल बावटा बांधकाम कामगार संघटना,कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन, शालेय पोषण आहार, ऊस तोडणी कामगार संघटना, यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या आंदोलनात सक्रिय भागीदारी केली होती.
हा संघर्षात 631 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. आंदोलकांवर अनन्वित अत्याचार केले.परंतु न डगमगता आंदोलन चालू ठेवले.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला.येणाऱ्या निवडणुकांमध्येही पराभवाचे संकट समोर दिसल्यानेच नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला असल्याचेही काँ मगदूम यांनी सांगितले.
आता लढाई कामगारविरोधी धोरणांबाबत...
कामगार विरोधी असणारे 4 लेबर कोड रद्द करण्यासह खाजगीकरणाचे धोरण मागे घेण्याची मागणी आहे. त्यासाठी सिटूसह सर्व कामगार संघटना आक्रमक भूमिका घेणार आहेत.किमान वेतन वाढविणे,कंत्राटी पद्धत रद्द करणे,खाजगीकरणाचे व देशाची संपत्ती विकण्याचे धोरण रद्द करणे.यासाठी बजेट अधिवेशनदरम्यान दोन दिवसाचा देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सिटुचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल.कराड,राज्य सचिव कॉ.एम.एच.शेख, कॉ भरमा कांबळे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!