निरपेक्ष भाव व विश्वासावर चाललेली बस्तवडेची विठ्ठल भिशी राज्यात आदर्शवत
निरपेक्ष भाव व विश्वासावर चाललेली बस्तवडेची विठ्ठल भिशी राज्यात आदर्शवत : गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी.कमळकर यांचे प्रतिपादन
बाकी सर्व व्यवहार व आर्थिक व्यवहार यात खूप फरक आहे. समाजात स्वार्थ व आत्मकेंद्रीपणा वाढत असताना बस्तवडे सारख्या छोट्याश्या गावात केवळ 18 हजार रु वरून सुरू झालेली विठ्ठल भिशी 23 वर्षात 40 लाखावर पोचते व तीही वार्षिक केवळ 566 रु च्या खर्चात चालते हे राज्यात आदर्शवत व दुर्मिळ उदाहरण आहे.या भिशीचे काम पाहताना नोबेल पारितोषिक मिळालेल्या महंमद यूनुस यांनी बांगलादेशात उभा केलेल्या बचतगट चळवळीची व तिथल्या त्यांच्या शिखर बँकेची आठवण वारंवार येते असे प्रतिपादन कागल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी.कमळकर यांनी केले.
ते बस्तवडे येथील विठ्ठल मंदिर मध्ये श्री.विठ्ठल भिशीच्या कर्जवितरण तसेच नववर्षाच्या रजिस्टर पूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सरपंच सोनाबाई वांगळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
सन 2020-21 चा थोडक्यात भिशी आढावा...
एकूण जमा भिशी 31 लाख 29 हजार 722 रु
एकूण कर्ज वितरण 35 लाख 94 हजार 500 रु
सर्व कर्ज वसूल, फिरवाफिरवी अजिबात नाही.
वितरित कर्जापोटी जमा व्याज 4 लाख 79 हजार 430 जमा भिशीला 14 टक्के प्रमाणे दिले व्याज 4 लाख 38 हजार 160 रु इतके व्याज वाटले ते पण मंदिरातील सांस्कृतिक उपक्रमांना 41 हजार 270 रु व्याज रक्कम भेट देऊन. तर या एकूण 40 लाख 73 हजार 930 रु च्या
40 लाखावरील भिशीचा वार्षिक व्यवस्थापन खर्च केवळ 566 रु.
काय आहे हा 566 रु.खर्च झेरॉक्स 250 रु, स्टेपलर पिन:20 रु.प्रवास:150 रु.रबर पाकीट:10 रु.मोबाईल रिचार्ज 129 रु व व्यवस्थापक मानधन: 07रु
डॉ कमळकर यांनी हा सर्व कारभार समजून घेऊन सर्व भिशी मंडळाचे कौतुक केले. तसेच *अश्या विधायक बाबींचे कौतुक तर झाले पाहिजे पण या चांगुलपणाचा समाजात जाणीवपूर्वक प्रचार प्रसार केला पाहिजे असेही सांगितले.
यावेळी भिशीचे संस्थापक आदरणीय पां.रा.पाटील गुरुजी,व्यवस्थापक मधुकर भोसले, संकलन सहायक आर.डी. भोसले सर,भिकाजी पाटील यांचा सत्कार केला.
आणखी एक संकलक सहायक आनंदराव वाळेकर की जे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत त्यांच्या प्रति देखील यावेळी कृत ज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी हभप पां.रा.पाटील, उपसरपंच जयवंत पाटील, आर. डी.भोसले,मधुकर भोसले,कीर्तनकार व जिल्हा वारकरी क्रांती सेनेचे अध्यक्ष दत्तामामा खराडे यांचीही यावेळी मनोगते झाली.
यावेळी रामचंद्र कृष्णाजी पाटील,पांडुरंग वांगळे,एस.के.पाटील, नारायण माळी, प्रकाश यादव,अर्जुन भोसले-पाटील, विशाल इंगळे,लक्ष्मण माळी,शरद भोसले, माजी सरपंच तानाजी पाटील,मल्लू कोरे,रामदास जगदाळे, एकनाथ चिखलकर,प्रकाश सुतार,अमृता माळी, चंद्रकांत भोसले, सागर देसाई, इंद्रजित नरके,प्रवीण यादव, सदानंद देसाई उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वैशाली आनंदा पाटील यांनी केले तर आभार साताप्पा कांबळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!