अभासे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोव्हिड लसीकरण कॅम्प
अभासे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोव्हिड लसीकरण कॅम्प
कोल्हापूर : अखिल भारतीय सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड लसिकरण कॅम्प मोरेवाडी येथे आयोजित केला होता. त्याला नागरीकांचा चांगला प्रतिसाद भेटला.
माजी आमदार अरूण गवळी यांनी जास्तीत-जास्त लोकांची सेवा करण्याचे सांगितले आहे. तोच संदेश स्वामी आदेश म्हणून आम्ही पाळत आहोत. समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या सचिन पाटील यांनी असेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन केले.
पत्रकार, व्हिडीओ-फोटो-ग्राफर, मोरेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी, तसेच एमआयडीसी शिरोली येथील कामगारांनी याचा लाभ घेतला. या प्रसंगी अभासेचे संघटक श्रेष्ठी अमरसिंहराजे जगदाळे, उद्योजक अरुण जाधव, विष्णु गायकवाड, विश्वजीत यादव, आरोग्य विभागाचे राहुल खाबडे, आशा स्वयंसेविका यांची उपस्थीत होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!