बँकेचा सावळा गोंधळ पण भुर्दंड मात्र सामान्य खातेदारांना... लाल बावटा इन एक्शन
कागल : देना बॅकेचे बॅक ऑफ बडोदा बॅकेत विलीनीकरण झाले. विलीनीकरण झाल्यानंतर सर्वच खातेदारांचा बॅक खाते व आएफएससी कोड नंबर बदलला आहे. हा बदललेला खाते नबंर दैनंदिन व्यवहार असलेल्या कांही खातेदारांनी अपडेट करून घेतला परंतु कामगार, शेतकरी, शेतमजुर यांच्यासह फारसा बॅकेशी संबंध येत नसलेल्या खातेदारांनी अपडेट केला नाही.
त्यांनी आपला जुना खाते नबंर पिएम किसान योजनेसह विविध योजनांच्या लाभासाठी दिलेला आहे. आपला खाते नबंर बॅक विलीनीकरण झाल्यामुळे बदललेला आहे हे माहीतच नसल्याने अनेक गोरगरीब शेतकरी, शेतमजूर कामगार, व सर्वसामान्य खातेदारांची पि. एम. किसान योजनेची रक्कम तसेच इतर लाभाची जमा होणारी रक्कम बहुतांशी खातेदारांच्या खातेवर जमाच झालेली नाही हा बॅक व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ आहे.
सिद्धनेर्ली येथील बॅक ऑफ बडोदा च्या प्रशासनाला शेतकरी व कामगारांनी धरले धारेवर.....
बॅक विलीनीकरणामुळे खातेदार अडचणीत........
आंदोलनाचा इशारा देताच आठ दिवसात रक्कम खातेवर जमा करण्याचे अश्वासन........
रक्कम जमा न झालेस ७ सप्टेंबर रोजी मोर्चाचा इशारा.......
बॅकेचे विलीनीकरण शासनाने केले, विलीनीकरणानतंर खाते नबंर, बॅक आएफएससी कोड बडोदा बॅक व्यवस्थापनाने बदलले यामध्ये खातेदारांचा कुठेही संबंध येत नाही.जर पूर्वीच्या खातेदारांची बॅक व्यवस्थापनाने आपल्या सोईसाठी खाते नबंर बदलले असतील तर बॅक व्यवस्थापनानेच या सर्व खातेदारांच्या जुन्या खात्यावर येणारी सर्व रक्कम या नविन खातेनबंरवर रक्कम जमा करण्यासाठी जबाबदारी घ्यावी व रविवार पर्यंत सर्व शेतक-यांचे पिएम कीसान योजनेची रक्कम व विविध योजनांची जमा होणारी रक्कम बॅक खात्यामध्ये जमा करावी या मागणीसह विद्यार्थ्यांची शैक्षणिक शिष्यवृत्ती बॅक प्रशासनाच्या धोरणामुळे परत गेली आहे. ती खाती अपडेट करावीत,शिष्यवृत्तीसाठी काढलेली खाती निष्क्रीय झाली त्यामुळे जमा होणारी रक्कम परत जाते त्यामध्ये सुधारणा करावी, बॅक विलीनीकरण झाल्यानंतरसध्दा या खातेदारांची रक्कम जुण्या खात्यावर आल्यानतंर ती रक्कम आपल्या बॅक ऑफ बडोदा च्या खात्यावरून देण्यात आली होती त्याप्रमाणेच कार्यवाही करवी. व जुण्या खात्यावर रक्कम आल्यास ती रक्कम बॅक ऑफ बडोदा खात्याला वर्ग करून सदर रक्कम देण्याची कार्यवाही करावी. अन्यथा बॅकेवर नाईलाजास्तव ७ सप्टेंबर २०२१ रोजी मोर्चा काढावा लागेल असे लाल बावटाने सांगितले.
या मागण्यांचे निवेदन लाल बावटाने सिद्धनेर्ली येथे दिले. यावेळी शिवाजी मगदूम, गणेश पाटील, नामदेव पाटील, रवि सुतार, बाजीराव साठे, उत्तम सुतार, अशोक पोवार, बाबुराव मगदूम, मोहन लाड, विवेक पोतदार, हेमंत कांबळे, शिवाजी तवंदे, आऊबाई लाड, जयसिंग मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच क्षेत्रिय विकास प्रबंधक मोहसीन शेख, निलेश जमदाडे बॅक कृषी सहाय्यक, किशोर गायकवाड ब्रॅच मॅनेजर, प्रणय मेश्राम नुतन शाखा अधिकारी, नितीन लिहीने कागल ब्रॅच मॅनेजर आदी बॅक प्रतिनिधी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!