जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

पत्रकारांच्या हिताबाबत गांभिर्याने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करणार : कामगार हितैषी लोकप्रिय मंत्री हसन मुश्रिफ

पत्रकारांच्या हिताबाबत गांभिर्याने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करणार 

कामगार हितैषी लोकप्रिय मंत्री हसन मुश्रिफ 


Hasan Mushrif nuj




कोल्हापूर : कामगार हिताबाबत नेहमीच दक्ष असणारे कामगार हितैषी लोकप्रिय मंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांच्या हिताबाबत गांभिर्याने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करु असे आश्वासन त्यांनी एनयुजेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ.सुभाष सामंत यांना दिले.


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात एनयुजे महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष सामंत यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळासह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रिफ यांनी शब्द दिला.

हे निवेदन एनयुजे महाराष्ट्रचे शिवेंद्रकुमार व राज्याध्यक्षा शितलताई करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिले. WJRC चे साऊथ एशिया हेड व महाराष्ट्र एनयुजेचे सदस्य अमरसिंहराजे जगदाळे, जिल्हाउपाध्यक्ष विनयकुमार पाटील, सचिव शेखर धोंगडे, खजिनदार भुपेश कुंभार, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे(हातकणंगले तालुका), कुबेर हंकारे, भारत जमणे, सागर जमणे, समीर कटके आदी पत्रकारांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

मंत्रीमहोदयांच्या भेटीसाठी शिष्टमंडळाला श्री उदय पाटील(बस्तवडेकर) यांचे विशेष सहाय्य लाभले.

या निवेदनातील मागण्या खालीलप्रमाणे

1. पत्रकारांसाठी महामंडळ गठीत करावे.

2. या महामंडळात अधिका-यांपेक्षा अनुभवी पत्रकारांचा भरणा जास्त असावा.

3. त्रिपक्षीय समितीच्या धर्तीवर महामंडळाच्या सदस्यांची वर्णी ही पाच वर्षांसाठी असावी.

4. प्रशासकिय अधिकारी व मालक नसलेले पत्रकार आणि वृत्तसंस्थाचे मालक संचालक यांचे समान वैचारीक व्यासपीठ तयार व्हाहे.

5. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना सामाजिक, आर्थिक, आरोग्य याबाबत सुरक्षा व मदत मिळावी.

6. मजेठीया बाबत सकारात्मक अमंलबजावणी व्हावी व इतर हक्क


internationalresourcebank




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!