जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

सौंदर्याला जोड समाजसेवेची ! अनोखी भेट वर्षाच्या वाढदिवसाची !!


सौंदर्याला जोड समाजसेवेची ! 

अनोखी भेट वर्षाच्या वाढदिवसाची !!

एक हात मदतीचा ! जन्मदिवस वर्षाचा !



कागल : तालुक्यातील सोनगे गावातील वर्षा उर्फ जुही  दिनकर ढोले ह्या सॉफ़्टवेअर इंजिनिअर असलेल्या नवं तरुणीने  आपल्या २३ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे रोजंदारीवर गुजराण करणाऱ्या अनेक कुटुंबाना अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता. दैनंदिन मजुरी मिळत नाही आणि उधारीवर किती दिवस जगणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ह्याची चर्चा वर्षा उर्फ जुहीच्या कानावर आली. म्हणून मग गेली एक तप हमिदवाडा माळावर पाले टाकून राहणाऱ्या आणि रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करत असलेल्या राठोड कुटुंब आणि इतर अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयाना तिने जीवनावश्यक वस्तू पुरवठा केला.  

ती जितकी दिसायला सुंदर आहे, तितकेच तिचे मन ही सुंदर आहे ..!   

शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी ||

अशा अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करून तिने आपल्या सामाजिक जबाबदारीचे दर्शन समाजाला करवून दिले. परिसरात तिच्या या कार्याचे कौतुक सर्वच स्तरांतून केले जात आहे.

कोरोनोच्या सर्व त्या उपाययोजना करून गावातील प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत तिच्या कुटुंबियांनी हे वाटप केले. 

या प्रसंगी रघुनाथ ढोले, के.व्ही.पाटील, पांडूरंग कुंभार, जयसिंग पाटील, धनाजी पाटील, मोहन तांबेकर, बाळासो तांबेकर, विजय कांबळे, सुनिल ढोले, बाबासो लोंढे, मोहन गुरव, महादेव तांबेकर, आण्णासो ढोले,जगन्नाथ ढोले,शहाजी घोरपडे, मारुती ढोले व ढोले कुटुंबिय उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!