जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी निदर्शने

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी बांधकाम कामगारांची निदर्शने,

आणखी ५ हजार रुपये कोविड अनुदान देण्याची मागणी 

कोल्हापूर (प्रतिनिधी): बांधकाम कामगारांच्या राज्य व स्थानिक पातळीवरील पेंडीग प्रश्न व वाढीव ५ हजार रूपये कोविड अनुदान मागणीसाठी आज झालेल्या राज्यव्यापी आंदोलनांमध्ये जिल्ह्यातील साधारण सात हजार कामगारांनी आपआपल्या दारात उभा राहुन निदर्शने केले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे व जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी दिली. 
             राज्यातील बहुतांशी बांधकाम कामगारांना मागील २ व ३ हजार कोविड अनुदान अध्याप मिळालेले नाही, तसेच मागील कोविड अनुदान ज्या बांधकाम कामगारांना मिळालेत त्याच बांधकाम कामगारांना १५००/-रूपयाचे काेविड अनुदान मिळत आहेत. परंतु मागील कोविड अनुदाना पासुन जो बांधकाम कामगार वंचित आहे. तोच बांधकाम कामगार १५००/- रूपयाच्या अनुदानापासुन वंचित रहात आहे. त्यामुळे राज्यभरातील बांधकाम कामगारांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.  
            कोविड अनुदानासह शैक्षणिक व इतर लाभाचे हजारो अर्ज मंडळाकडे पेंडिंगआहेत. यामागणीसह, बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करा, ६० वर्षावरील बांधकाम कामगारांना ५ हजार रूपये पेन्शन द्या,घरकुलासाठीच्या जाचक अटी रद्द करा व घरकुलासाठी ५ लाख रुपये अर्थसाह्य द्या, कल्याणकारी मंडळावर सिटुचा प्रतिनिधी घ्या, बोगस नोंदीत कामगारांची चौकशी करा व बोगस नोंदणीवर आळा घाला, ऑनलाईन नोंदणी व नुतणीकरणाचा आठ दिवसात निपटारा करा,डिसेंबर २०१९ अखेर ज्यांची नोंदणी जीवित होती अशा सर्व कामगारांना अवजारे खरेदी अनुदान देनेबाबत आदेश करावा, वशिला आणि भ्रष्ट शोध पद्धत(searching)बंद करा, बोगस दाखला देणाऱ्यावर कडक कारवाई करावी, भांड्याचे अनुदानाची रक्कम कामगाराच्या बँक खात्यात जमा करा,नूतनीकरण केलेल्या कामगारांना पावती ऐवजी स्मार्ट कार्ड द्यावे, बांधकाम कामगारांचे एका मुलीच्या लग्नकारिता 1 लाख रुपये अनुदान दया. आदी मागण्याबाबत घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. 
          सदर मागण्यांचे निवेदन मान. मुख्यमंत्री, उद्धवजी ठाकरे, कामगार मंत्री मान हसन मुश्रीफ , मंडळाचे सचिव मान. श्रीरंगम यांच्याकडे मेलव्दारे देण्यात आले. 

         या आंदोलनाची दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 
         हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे,जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश कुभांर, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर, आनंदा कराडे, कुमार कागले,रामचंद्र निर्मळे, शिवाजी मोरे, मनोहर सुतार, दगडु कांबळे, मोहन गिरी, पोपट कुरणे,रामचंद्र नाईक, नामदेव पाटील, दत्ता कांबळे, नुरमहंमद बेळकुडे बापू कांबळे विजय कांबळे,अरंजय पाटील, जितेंद्र ठोंबरे, कॉ शिवाजी कांबळे, उदय निकम, संतोष राठोड, दत्ता गायकवाड, राजाराम आरडे, अशोक सुतार, यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!