जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

पुणे महानगर पालिकेने नविन 'आधार कार्ड' काढण्याचे विभागवार सेंटर चालू करावीत...

राज्य सरकार व पुणे महानगर पालिकेने...
नविन 'आधार कार्ड' काढण्याचे विभागवार सेंटर चालू करावीत... 

धनकवडी - 'आधार कार्ड' प्रत्येक नागरिकाच्या महत्त्वाचे आधारभूत कागदपत्र (डॉक्युमेंट) झालेले आहे. महाराष्ट्रात 'आधार कार्ड' ही लोकांची जीवनावश्यक गरज होऊन बसलेली आहे. लहान मुलांना शाळेच्या प्रवेशापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आधारकार्ड गरजेचे आहे. बरेच नागरिकांनी आधार कार्ड काढली असली तरी त्यामध्ये पत्ता दुरुस्ती, नाव दुरुस्ती व इत्यादी दुरुस्ती चे प्रकार प्रलंबित आहेत. तसेच बऱ्याच नागरिकांनी किंवा त्यांच्या लहान मुलांनी नवीन आधार काड अजून काढलेले नाहीत. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र सारखे सर्व सेंटर सध्या बंद आहे. त्यामुळे सुरू अषालेल्या एकाच केंद्रावर शहरातील इतर ठिकाणच्या नागरीकांचा अतिरिक्त भार पडत आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी आधार कार्ड काढले जातात, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेकडो च्या रांगा लागलेल्या असतात. क्षेत्रीय कार्यालयात महिन्याला १२० लोकांना लोकल स्वरुपात फॉर्म वाटले जातात. मात्र ते फॉर्म घेण्यासाठी ४०९ ते ५०० लोक रांगेमध्ये उभे असतात. 120 लोकांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर इतर लोकांना एक महिन्याची पुढची तारीख दिली जाते, त्यासाठी परत प्रतीक्षा करावी लागते, हे दुर्दैवी आहे. तर महिन्याला त्याच पद्धतीची गर्दी होत आहे.

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये महिन्याच्या एक तारखेला 120 लोकांना टोकन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात चारशे ते पाचशे नागरिक याठिकाणी लहान मुलांसह पहाटे सहा वाजल्यापासून रांगेमध्ये उभे असतात. टोकण संपल्यानंतर इतर लोकांना पुढची तारीख सांगितली जाते हे दुर्देवी आहे. राज्य सरकार व पुणे-नगर महानगरपालिकेने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आधार कार्ड सेंटर वाढवली पाहिजे अशी 'संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे.

सामान्य नागरिकांवर 'आधार कार्ड' चे भूत राज्य सरकार व केंद्र सरकारने बसवलेले आहे. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवक मंडळी या गैरसोय व गर्दीकडे दुर्लक्ष करत असून, संपर्क केला तर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मात्र सेंटर कमी आहेत. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड सेंटर वाढवावी किंवा महा ई सेवा केंद्र परवानगी द्यावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. कारण नवीन आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी शेकडो लोकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि या लोकांकडे कुणाचेही लक्ष नसते हा दुर्दैवी प्रकार महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर व जिल्ह्यात सुरू आहे म्हणून नवीन आधार कार्ड केंद्र सुरू करा... सध्या ही लोकांची गरज आहे.

सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार खासदार यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!