चार चाकी वाहन असणाऱ्यांचे रेशनवरील धान्य बंद
केल्यास राज्यव्यापी आंदोलन पुरवठा विभागाला टाळे ठोक आंदोलन करणार काँग्रेस प्रदेश सचिव संजय पाटील यांचा जिल्हा पुरवठा अधिकारी श्री दत्तात्रय कवितके यांना इशारा
आज जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची काँग्रेस प्रदेश सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने त्यांच्या कार्यालयात भेट घेतली यावेळी संजय पाटील म्हणाले चारचाकी वाहन ही चैनीची वस्तू नसून आर्थिक गरजा भागवण्यासाठी व्यवसायिक रूपाने घेतलेले ते वाहन आहे सध्या मार्केटमध्ये सेकंड हॅन्ड मारुती व्हॅन तीस हजार रुपयाला मिळते त्या वाहनाचा वापर भाजपाला आणण्यासाठी तसेच बचत गटांचे जेवणाचे डबे पोहोचवण्यासाठी व इतर तत्सम कामासाठी केला जातो मार्केटमध्ये टुविलर नवीन घ्यावी म्हटल्यास 70 हजार रुपये किंमत आहे त्यामुळे हा जो केंद्र शासनाने फतवा काढला आहे चार चाकी वाहन असणाऱ्यां लाभार्थ्यांची लाभ रेशनवरील बंद करण्यात यावे हा फतवा केंद्र शासनाने मागे घ्यावा तसेच राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करु नये यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करून प्रसंगी टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल जर याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील पन्नास टक्के लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊन रेशन व्यवस्थेचा आकार अतिशय मर्यादित होईल त्यामुळे गोरगरिबांच्या घरचा दरोडा केंद्र शासनाने तातडीने थांबवावा अन्यथा राज्यव्यापी सर्वच पातळ्यांवर मोठा संघर्ष जनता करेल. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर किमान अडीच लाख लोकांचे रेशनवरील धान्य या नवीन निकषानुसार बंद होईल या नवीन पत्राबाबत महाराष्ट्र शासनाला अधिकृत घोषणा अजून मिळालेले नसले तरी उत्तर प्रदेश सरकारने केंद्र शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यावर ती विनाशकारी ठरू शकतो. केंद्र शासनाने गेल्या सहा वर्षात रेशन व्यवस्था संकुचीत केली असून जवळपास पुरवठा विभाग रेशन विभाग हा बंद करत आणलेला आहे मागील भाजप सरकारने महाराष्ट्र राज्यामधील काही!!;! तुघ!लकी निर्णय घेतले यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली रेशन व्यवस्थेचा आकार कमी करून त्या पैशाचे भांडवलदारांना लाभ करून देणे हा धंदा केंद्र शासनाने तातडीने थांबविला पाहिजे. दोन चाकी वाहन असणाऱ्यांना रेशन धान्य लाभ न देण्याचा!!निर्णय यापूर्वी झाला होता तो आम्ही व्यापक आंदोलनाने हाणून पाडलेला आहे अशाच पद्धतीने भविष्यामध्ये मोठा संघर्ष उभा करून केंद्र शासनाचा हा फतवा मागे घेण्यास राहुल भाग पाडू असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला या चर्चेवेळी श्री संजय पाटील प्रदेश सचिव .,अनिल कवाळे. योगेश हातलगे, अतुल कांबळे, संजय बोधे, संग्राम जाधव, रियाज जैनापूरे, प्रकाश पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!