गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 42.78 मि.मी. पाऊस
सातारा, दि. 14 ( जिमाका ) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 42.78 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 72.53 (600.67) मि. मी., जावली – 70.18 (1005.56) मि.मी. पाटण – 46.00 (937.63) मि.मी. कराड – 23.38 (429.07) मि.मी., कोरेगाव – 33.33 (392.83) मि.मी. खटाव – 29.66 (340.06) मि.मी. माण – 13.57 (291.57) मि.मी., फलटण – 10.44 (280.62) मि.मी. खंडाळा – 20.54 (340.70) मि.मी. वाई – 32.29 (532.97) मि.मी. महाबळेश्वर – 181.93 (3437.18) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 8588.87 मि.मी. तर सरासरी. 780.81 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी
सातारा दि. 14 ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 77.26 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 77.17 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 112 नवजा येथे 122 व महाबळेश्वर येथे 177 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.92 (67.78), धोम -बलकवडी- 3.52 (88.78), कण्हेर – 7.85 (81.85), उरमोडी – 8.92 (92.41), तारळी- 4.60 (78.74), निरा-देवघर 7.25 (61.83), भाटघर- 17.40 (74.03), वीर – 9.20 (97.85).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!