अन माणुसकी धावून आली....
डॉक्टर परबकर आणि सहकारी धावले मदतीला !
अर्जुनवाडा (प्रतिनिधी):- सेनापती कापशी ते अर्जुनवाडा दरम्यानच्या रस्त्यावर एक घोडा गेले पंधरा ते वीस दिवस आजारी अवस्थेत होता त्याच्या पायाला जखम झाली होती त्यामुळे धावणाऱ्या घोड्याला नीट चालता येत नव्हते रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे तो घोडा आशाळभूत नजरेनं पाहत राहायचा... मदतीची हाक मारायचा पण, त्या घोड्याच्या नजरेतील ती आर्त हाक कुणाच्या लक्षातच येत नव्हती. आयुष्यभर धावणारा तो घोडा आता मात्र उपेक्षिताप्रमाणे दुसऱ्याच्या मदतीची वाट पाहत होता आणि वाट पाहण्याशिवाय त्याचाकडे दुसरा पर्यायही नव्हता पण त्या घोड्याचे ते दुःख कासारी येथील डॉक्टर परबकर आणि त्यांचे सहकारी यांनी ओळखले स्वतः व्यवसायाने जनावरांचे डॉक्टर असणारे परबकर घोड्याच्या मदतीला धावून आले त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज नागपंचमीच्या दिवशी त्या घोड्याला लागणारी सर्व मदत त्याच्यावर लागणारे सर्व उपचार केले. आजच्या युगामध्ये माणूस माणसाकडे बघेणासा झालेला आहे अशा परिस्थितीत देखील भूतदया दाखवून रस्त्याने फिरणाऱ्या बेवारस घोडयावर उपचार करणाऱ्या डॉक्टर परबकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . लंगडणाऱ्या घोड्यावर उपचार करून त्याला धावण्यासाठी तयार करण्यासाठी डॉक्टर परबकर व त्यांच्या सहकाऱ्यांची माणुसकीच धावून आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!