खाकी वर्दी आडून चालू असलेली गुंडगिरी थांबवा - संभाजी ब्रिगेड
सातारा : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे मुंबई अध्यक्ष अमोल जाधवराव हे लाकडाऊन मुळे गेले तीन महिने त्यांच्या मूळ गावी झरेवाडी येथे राहत आहेत. त्यांच्या पुतण्याने कोर्ट स्टे असलेल्या जागेवर ग्रामपंचायतीने काम करु नये असे निवेदन सरपंचांना द्यायला गेले असता, त्यांना सरपंच व त्याच्या भावाने शिवीगाळ करून मारहान केली. म्हणून सबंधीत विषयासंदर्भात ते सातारा तालुका पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल व्हावा याकरिता गेले होते. तेथे चर्चे दरम्यान तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार सावंत यांनी शिवीगाळ देवून शांत रहा नाही तर तुमच्यावर च गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली. यासंदर्भात जाधवराव यांनी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने व त्याचा पुतण्या या नात्याने चर्चा करीत होते. परंतू तुम्ही येथे बोलू नये अन्यथा तुमच्या वर देखील गुन्हा दाखल करु असं म्हणत त्यांना ही धमकी दिली. त्याचसंदर्भात ते ठाणे अंमलदार यांच्यासोबत चर्चा करत असताना तेथे उपस्थित सिव्हिल कमांडर भोसले व अन्य काही जणांनी थेट धक्का बुक्की करत लाथा मारत संपूर्ण ठाण्यात त्यांना मारायला सुरूवात केली. हे होत असताना त्यांनी थेट जाधवराव यांची मान पकडून डोके टेबल वर आपटले. टेबल वर असलेली काच फुटली व त्यांना जबर झटका डोक्याला बसला हे संपूर्ण उपस्थित जनतेने पाहिले आहे. जर पिडितावर अन्याय होत असेल त्याच्या बाजूने जर कोणी त्याचे म्हणणे मांडत असेल तर यात चूकीचे काय? एखादी चूकीची गोष्ट असेल तर संविधानिक पध्दतीने प्रशासनाने जरूर कारवाई करावी परंतू गुंडागर्दी सारखी भाषा आणि मारहाण करण्याची परवानगी यांना कोणी दिली असा थेट सवाल जाधवराव यांनी प्रशासन व सरकार ला केला आहे. तरी सदर प्रकाराची चौकशी करून त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी असे निवेदन गृहराज्यमंत्री शंभूराज जी देसाई, विरोधी पक्ष नेते मा. प्रविण जी दरेकर, जिल्हा पोलिस अधिक्षका वैशाली सातपुते यांना त्यांनी दिले आहे. यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!