जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

कुख्यात देशद्रोही दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनो

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण; कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल
दाऊदच्या पत्नीलाही झाला करोनाचा संसर्ग

१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण मालिका बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये फरार असलेला गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्येच वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिलं आहे. दाऊदबरोबरच त्याच्या पत्नीलाही करोनाचा संसर्ग झाला असल्याचे पाकिस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी दाऊदला करोना झाल्यामुळे संभ्रमात पडले असून दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजते. दाऊद आणि त्याच्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा दावा सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती ब्रिटनमधील एका न्यायालयाला मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली होती. मात्र आता दाऊदला करोना झाला असून त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरु असल्याचे सीएनएनचे म्हणणे आहे. मागील अनेक वर्षांपासून दाऊदला आम्ही आश्रय दिला नाही असं पाकिस्तान सांगत असतानाच आता त्याला करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच दाऊद लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना भेटल्याचेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे आता दाऊदच करोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर येत असल्याने मागील काही दिवसांमध्ये तो ज्या ज्या व्यक्तींना भेटला आहे त्यांची तपासणी करावी लागणार असल्याचे वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. असं झाल्यास जगभरामध्ये मोस्ट वॉण्टेड असणाऱ्या दाऊदला पाकिस्ताननेच मागील २५ वर्षांपासून अधिक काळ आसरा दिल्याचे उघड होईल असं सांगण्यात येत आहे.

*पाकिस्तानची गोची*

दाऊदला करोनाचा झाल्याचे वृत्तसमोर आल्यानंतर आता पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. दाऊदला भेटलेल्या व्यक्तींचे करोना चाचणीचे निकाल सकारात्मक आले तर पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यत आहे. असं झाल्यास पाकिस्तानला दाऊद आणि त्याची पत्नी कराचीमध्ये उपचार घेत असल्याचे सांगावे लागले. त्यानंतर राजकीय दबाव वापरुन दाऊदला ताब्यात घेण्यासंदर्भात भारत हलचाली सुरु करु शकतो असं सांगण्यात येत आहे.

भारताने मागील अनेक वर्षांपासून दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचे म्हटलं होतं. तसेच यासंदर्भात पाकिस्तानने चौकशी करुन दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याच्या मागण्याही अनेकदा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळेस पाकिस्तानने दाऊद पाकिस्तानमध्ये नाही असं सांगत त्याची पाठराखण केली होती. मात्र आता करोनामुळे पाकिस्तानचं पितळं उघडं पडलं आहे. दाऊद हा कराचीमधील एका उच्चभ्रू वस्तीत राहत असून येथे पाकिस्तानी सुरक्षा दलाशी संबंधित अधिकारी आणि आयएसआयचे अधिकारी राहतात. त्यामुळेच आता दाऊदला करोनाची लागण झाल्यची माहितीसमोर आल्याने पाकिस्तान यासंदर्भात काय स्पष्टीकरण देतं हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!