जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

इमाकुली अलिबाघीझा आणि लॉकडाऊन

लॉकडाऊन, कंटाळा आणि त्याचा उपयोग, इमाकुली अलीबगीझा  : दत्ता जोशी 

जर तुम्हाला तुमच्या घरात बसण्याचा कंटाळा आला असेल तर हे नक्की वाचा आणि नंतर ठरवा की तुमचं घरात बसणं मी सांगणार आहे त्या व्यक्तीच्या अनुभवापेक्षा  कठीण आहे का. 

होय, मी जिच्या विषयी सांगणार आहे ती व्यक्ती आहे इमाकुली इलिबागीझा, जीला एका 3 x 4 फूट ( म्हणजे फक्त 12 स्क्वेअर फूट ) आकाराच्या बाथरूम मध्ये थोडे थोडके नव्हे तर तब्बल 91 दिवस घालवावे लागले.तिथं तिच्या सोबत अजून सात महिला होत्या.निव्वळ कल्पना करा की येव्हढ्याशा जागेत सात व्यक्तींना 91 दिवस राहायचं आहे. किती कठीण होतं असेल आणि त्यांनी हे दिव्य कसं पार पाडलं असेल?  हे सर्व जाणून घ्यायच्या आधी बघू या इमाकुलीवर ही वेळ का आली, कोण आहे ही इमाकुली.
आफ्रिकेमध्ये रेवंडा नावाचा छोटासा देश आहे. जिथली लोक संख्या दीड कोटी असून,तिथं  स्वाहिली भाषा बोलली जाते. अश्या  देशातल्या एका छोट्या खेड्यात इमाकुलीचा जन्म झाला. ती आणि तिची तीन भावंड यांच्या सोबत तिचे बालपण खूप सुखात गेले. त्यांच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक आणि शिक्षणाला महत्व देणारे होते.इमाकुली अत्यंत हुशार होती.रेवंडाच्या राजधानी असलेल्या शहरातील युनिव्हर्सिटीत ती इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीरिंग चे शिक्षण घेत होती. सगळं काही व्यवस्थित सुरु होतं. 1994 साली ईस्टर संडे ला इमाकुली तिच्या घरी आली. आणि त्यानंतरच तिचं  सगळं आयुष्यच बदलून गेलं.
त्या दिवशी रेवंडा मध्ये वंश वादाने प्रचंड हिंसाचार सुरु झाला. एकमेकांशी गोडी गुलाबीने राहणारे तुत्सी आणि हुतू समुदायाचे शेजारी एकमेकांवर तुटून पडले.तुत्सी समुदायाची क्रूर पणे सामूहिक हत्या, खून, बलात्कार यांचा उद्रेक झाला.या हत्याकांडात इमाकुलीचे आई बाबा आणि सर्व कुटुंब ठार झाले. फक्त तिचा आईमेबल नावाचा एक भाऊ जो सेनेगल शहरात शिकत होता तो वाचला. एका भावाची तर डोक्यात कुऱ्हाड घालून तिच्या डोळ्यासमोर हत्या करण्यात आली. त्या रात्री तिच्या बाबांनी तिला आपले राहते घर सोडून, तिचे कॅथॉलिक चर्चचे पास्टर असलेल्या शिक्षकाच्या घरी आश्रय घ्यायला सांगितला. हा निर्णय फार धाडसाचा होता. कारण इमाकुली तुस्तू जमातीची होती आणि शिक्षक होते हुतू जमातीचे.परमेश्वरावर आणि आई वडिलांवर विश्वास ठेऊन इमाकुली त्या शिक्षकांकडे आश्रय घ्यायला आली.तिथं गेल्यावर तिला कळलं की आपल्या सारख्याच अजून सात महिला त्यांच्या कडे आश्रयाला आलेल्या आहेत. शत्रू पक्षाच्या लोकांना आश्रय देणं खूप धोकेदायक गोष्ट होती. पण त्या दयाळू असलेल्या शिक्षकाने या मुलींना आश्रय द्यायचे ठरवले. घरात कुठेच सुरक्षित जागा नव्हती. फक्त एक बाथरूम होतं, जे वापरात नव्हतं. या सात मुलींना त्यांनी बाथरूम मध्ये लपण्यास सांगितले. बाथरूमच्या दरवाजा ला एक भलंमोठं लाकडी कपाट आडोसा म्हणून ठेऊन दिलं. त्यामुळे त्या कपाटामागे बाथरूम आहे हे कोणालाच समजून येत नव्हतं. त्या मुलींना, आपल्याला किती दिवस आतमध्ये लपून राहावे लागेल हे माहित नव्हतं. आतमध्ये अपुरा प्रकाश असायचा.जागा इतकी अपुरी होती की सरळ उठता बसता येणं अवघड होतं.दुपारी ते दयाळू शिक्षक त्यांना दरवाजाच्या खालच्या फटीतून जेवण सरकावायचे. अंघोळ करणं शक्यच नव्हतं. शिवाय नेहमीच्या शारीरिक प्रातर्विधी सारख्या गोष्टी सगळ्यांसमोर करणं खूप अवघड होतं. पण हळूहळू सगळ्यांना त्याची सवय व्हायला लागली. सगळ्यांनी एकमेकांना ऍडजेस्ट करून जगायची सवय लावून घेतली. पण तरीही सतत एकमेकांचा स्पर्श व्हायला लागला की चिडचिड व्हायची. त्यात स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात त्यांच्या मनस्थितीत खूप बदल व्हायचे. अंघोळ नसल्याने शरीराला खूप घाण वास यायला लागला. त्यात डोक्यात उवा आणि त्वचेचे आजार व्हायला लागले. मुख्य म्हणजे सगळ्या स्त्रीया मानसिक रुग्ण व्हायला लागल्या. त्याच काळात रेवंडात तुत्सुच हत्याकांड सुरूच होतं.सुमारे दहा हजार लोकांची निघृणपणे हत्या करण्यात आली. 
या काळात बाथरूम मध्ये बंद असतांना छोटी इमाकुली मात्र पॉसिटीव्ह विचार करत होती. देवाने मला नक्कीच काहीतरी हेतूने जिवंत ठेवले आहे. म्हणून मी या संधीचा फायदा करून घेईन असं तिनं ठरवलं. तिनं या काळात इंग्रजीचा अभ्यास करायचं ठरवलं.इंग्रजी शिकायचं आणि इथून सुटका झाली की थेट युनो मध्ये जाऊन रेवंडातील परिस्थिती जगापुढे मांडायची, असली अचाट स्वप्न ती पहायला लागली.आणि त्या दिशेने तिनं वाटचाल सुरु केली.त्या शिक्षकाला तिने इंग्रजीची पुस्तकं द्यायला सांगितले आणि बाथरूम मध्ये अभ्यासाला सुरुवात केली. 
आणि बघता बघता ती त्या भाषेत पारंगत झाली.
हळू हळू हिंसाचार थांबत गेला. आणि एक दिवस तब्ब्ल नव्वद दिवसांनी या मुलींना बाहेर निघण्याची संधी मिळाली. प्रखर सूर्यप्रकाश त्यांना सहन होत नव्हता.  एकोणीस वर्षाच्या इमाकुलीच वजन झालं होतं फक्त एकोणतीस किलो. आयुष्य कुठून कुठं आलं होतं. तिच्या कुटुंबाला ठार करणाऱ्या लोकांमधील एकानेच तिचा जीव वाचवला होता. रेवंडा मध्ये झालेल्या हत्याकांडा बद्दल बाहेरच्या जगाला काहीच माहिती नव्हती. हजारो कुटुंब उध्वस्त झाली होती, अनाथ झाली होती. पोरकी झाली होती. 
आणि एक दिवस खरोखरच स्वप्न पहिल्या प्रमाणे इमाकुलीने युनो च्या ऑफिस मध्ये प्रवेश मिळवला. आणि बाहेरच्या जगाला ही माहिती दिली. तिच्या माहितीने सगळं जग हादरून गेलं.
युनोने तिच्या माहितीची पूर्ण दखल घेतली.तिला युनो मध्ये रेवंडाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिने ज्या ठिकाणी, ज्या लोकांनी तिच्या कुटुंबियांना ठार केलं होतं त्या ठिकाणी घेऊन जाण्याची युनोच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. तिच्या विनंती नुसार तिला तिच्या गावी, जिथं तिच्या आई बाबांना ठार केलं गेलं होतं, जिथं तिच्या हुशार भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याला मारलं गेलं होतं तिथं ती गेली. त्या नंतर ज्या लोकांनी तिच्या डोळ्यसमोर हे घडवून आणलं होतं त्या लोकांसमोर तिला नेण्यात आलं. आता ती अबला नव्हती. तर सर्व शक्तीमान अशा युनोची एक प्रतिनिधी होती. क्षणभर तिच्या मनात वेदनेचा डोंब उसळला. मनात आणले असते तर ती त्या मारेकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देऊ शकली असती. पण अचानक तिच्या मनात परमेश्वराने जणू विवेक जागृत केला.तिच्या मनात आले की या लोकांना शिक्षा द्यायसाठी देवाने नक्कीच मला जिवंत ठेवलेले नसणार. माझं कार्य अजून वेगळं आहे. असे म्हणून ती त्या मारेकऱ्यांसमोर उभी राहिली आणि तिने प्रभू येशुला त्यांना क्षमा करण्यासाठी प्रार्थना केली. त्याच क्षणी तिचं हृदय एका अनामिक शांतीने भरून गेलं. 
त्या नंतर तिने तीन आठवड्यात आपली कहाणी लिहून काढली. पुस्तकाचं नाव होतं.. लेफ्ट टू टेल... या पुस्तकाची संपूर्ण जगात सत्तर भाषेत भाषांतरं झाली. 
इमाकुलीने आपले आयुष्य निराधार लोकांच्या सेवेत घालवायचं ठरवलं आणि आज ती हे काम रात्रंदिवस करत असते. युनाइटेड स्टेटस ऑफ अमेरिकेने तिला आपल्या देशाचे नागरिकत्व दिलेले आहे. अनेक सन्माननीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, उच्च डॉक्टरेट पदवी तिला बहाल केली गेली आहे. 
मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी ती सगळ्या जगभर प्रवास करत असते. अंतरराष्ट्रीय शांतंतेचा महात्मा गांधी पुरस्कार तिला देण्यात आलेला आहे. 
तिच्या मते आजूबाजूला मृत्यू च थैमान सुरु असतांना जगण्या साठी जेव्हा परमेश्वर आपल्याला संधी देत असतो, त्या मागे निश्चितच काहीतरी प्रयोजन असते. म्हणून जगायचं असतं आणि या संकटाचा संधी म्हणून उपयोग करून घ्यायचा असतो.
म्हणून मित्रांनो लॉक डाऊन ही  अचानक हातात आलेली संधी समजा आणि त्याचा चांगला उपयोग करून घ्या. 

(इमाकुली इलिबागीझा हिचे Left  to Tell हे पुस्तक वाचल्या नंतर तिच्याशी संपर्क साधण्याची ईच्छा झाली आणि अनपेक्षित पणे तिच्याकडून उत्तर आलं.  जगातील या निष्ठुर वास्तवाला सामोरं जाऊन इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणाऱ्या या लेखिकेच्या मनाच्या मोठेपणाने मी भारावून गेलो... दत्ता जोशी )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!