राज्यातील सर्व खासगी इस्पितळे ताब्यात घ्या : उद्धव ठाकरे यांचा ठाकरे तडका
मुंबई : राज्यातील सर्व खासगी इस्पितळात रुग्णांची पिळवणूक होत असलेल्या अनेक तक्रारी मिळाल्यामुळे अखेर काल रात्री उशीरा हा आदेश मुख्यमंत्र्यांनी पारित केला.
या आदेशानंतर राज्यातील सर्व खासगी व धर्मदायसाठी वापरात असलेली सर्व इस्पितळे ताब्यात घेण्यात येणार आहेत. मेस्मा व आपत्ती निवारण कायदा या सर्व इस्पितळाना लागू केला आहे. जर कोण याला आडकाठी करत असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे CEO व महापालिका आयुक्त यांनी ही इस्पितळे ताब्यात घेणेची आहेत.
खासगी रुग्णालयात कोरोनो च्या पेशंट कडून एका दिवसासाठी ५० हजार ते लाखों रुपयांपर्यंत आकारणी करून सर्व सामान्य जनतेला छळत असल्याने एका दिवसांत तातडीने हा आदेश काढल्याचे सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!