भुमिपुत्रांसाठी भुमिपुत्रांचा मदतीचा हात!
परजिल्ह्यातून परतलेल्यांना कोल्हापुरात नोकरीच्या संधीसाठी मिशन जॉब👨🏻🚒
मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यातून कोल्हापुर जिल्ह्यात परतलेल्या भुमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच नोकरीची संधी मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भुमिपुत्र एकत्रित आले आहेत. ना राजकीय पक्ष...ना कोणती संघटना...केवळ सामाजिक नोकरीचा सेतु उभारण्यासाठी स्थानिक भुमिपुत्रांचा हा प्रयत्न आहे. माननीय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांंच्या आवाहनानुसार भुमिपुत्रांना नोकरीची संधी मिळावी, या आवाहनाला प्रतिसाद देत हा सामाजिक उपक्रम नियोजित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने परप्रांतिय निघून गेल्याने भुमिपुत्रांना नोकरीची या मंदीतही संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील युवकांनी एकत्र येऊन मुंबई पुण्यासह इतर जिल्ह्यातील युवकांसाठी राबविलेला हा सामाजिक उपक्रम आहे. ज्यांनाही या संधीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी खालील प्रत्येक तालुक्यातील सदस्यांशी संपर्क साधून नांव नोंदवावे. हा उपक्रम सामाजिक असून कोणत्याही प्रकारचे मुल्य आकारले जाणार नाही, याची नोंद कोल्हापूरच्या भुमिपुत्रांनी घ्यावी. इच्छूकांनी नाव नोंदणीसाठी 10 जून 2020 पुर्वी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. इच्छुकांनी तालुका प्रतिनिधींकडे नाव नोंदवून Jobkop2020@gmail.com या ईमेल आयडीवरही आपला बायोडाटा पाठवावा.
कोल्हापूर जिल्हा समन्वयक ः- प्रशांत साळुंखे
चंदगड ः विक्रम पाटकर- मो.9325851903
आजरा ः कृष्णा पाटील -मो. 9870565122
गडहिंग्लज ःअमर बाबर मो. 9821651566
भुदरगड ःअभिषेक पाटील मो. 7447702417
शाहूवाडी ःश्रीकांत अस्वले मो. 9930621001
कागल- राधानगरी ःरविकिरण सावडकर 9637122929
करवीर सागर चव्हाण 9158882867
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!