जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

भाजपचे घाण राजकारण

साधूंच्या हत्येचे संधीसाधू राजकारण

दत्तकुमार खंडागऴे 
संपादक वज्रधारी, 
मो. 9561551006

माझ्या लहानपणापासून मी शंकराची आणि भस्मासुराची कथा ऐकत आलो आहे. भोऴा सांब कुणालाही वर द्यायचा आणि अडचणीत यायचा. त्याने स्वभावाप्रमाणे भस्मासुराला वर दिला आणि स्वत:वरच आपत्ती ओढवून घेतली. शंकराने दिलेल्या वरदानानुसार भस्मासुराने कुणालाही हात लावला की त्याचे भस्म होत असे, त्याची राख होत असे. एक दिवस वरदानाने उन्मत झालेला भस्मासुर शंकराच्याच मागे लागतो. शंकरालाच भस्म करायला तयार होतो. शेवटी तो भस्मासुर स्वत:च भस्म होतो. अशी ती कथा आहे. सध्या महाराष्ट्रात व एकूणच देशभरात भाजपने जे धर्मांध राजकारण चालवले आहे त्या राजकारणाची दशा एक दिवस अशीच भस्मासुरासारखी झाल्याशिवाय राहणार नाही. भाजप व आर एस एस जे पेरते आहे ते नक्कीच उगेवल. ते जो धर्मांधतेचा भस्मासुर उभा करतायत तोच भस्मासुर भाजपवाल्यांची, आर एस एस वाल्यांची राख करेल. एक दिवस त्यांनाच नेस्तनाबूत करेल. कारण जे पेरलं जातं तेच उगवतं हा निसर्गाचा नियम आहे. आजवरच्या धार्मिक आणि धर्मांध राजकारणाचा हाच इतिहास आहे. जगभरच्या राजकारणाचा धांडोऴा घेतला तर हेच दिसून येते. सद्दाम, लादेन, पाकीस्तान, अफगाणीस्तान यांची जी माती झाली ती याच प्रवृत्तीमुऴे आणि विकृतीमुऴे झाली. त्यांनी जे पेरले ते भरभरून उगवले. त्याच धर्मांध राजकारणात ते संपले. भाजपवाले धर्मांधतेचे निखारे भारतात पेरत आहेत. हे पटते निखारे एक ना एक दिवस भाजपवाल्यांना होरपऴून काढल्याशिवाय राहणार नाहीत. आज ते सत्तेच्या मस्तीत चुर आहेत, सत्ता लालसेने हपापलेले आहेत. दुसर्याला भस्म करायला निघालेल्या भस्मासुराला शेवटी स्वत:च जऴून खाक व्हावे लागले, भस्म व्हावे लागले होते. भाजपकडून सत्तेच्या लालसेपोटी जी विषपेरणी केली जातेय त्याला जेव्हा फऴं लागतील तेव्हा हेच घडेल. तो वणवा सर्वप्रथम भाजपवाल्यांना भस्म करेल, त्यांचीच राख करेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे. त्यांची राख होईलच पण त्यांच्या नालायकीने या देशाचे खुप मोठे नुकसान होईल. देशाने सत्तर वर्षे या लोकांना सत्तेपासून का लांब ठेवले होते ? याचे उत्तर आता मिऴते आहे. खरंच जुणे लोक समजदार, शहाणे आणि जाणतेच होते याची खात्री पटते आहे. त्यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट प्रवृत्तीची नालायकी स्विकारली पण देश तोडणारी, समाज नासवणारी हरामखोरी नाकारली याचे कारण आज उमगते आहे.

          पालघरला साधूंची अतिशय निंदाजनक आणि क्रुर हत्या झाली. हिंस्र जमावाने अत्यंत क्रुरपणे त्यांना मारले. या हल्लेखोरांना फासावर द्यायला पाहिजे. ते फासावर लटकेपर्यंत सरकारने पाठपुरावा केला पाहिजे. तेवढे सक्षम पुरावे पोलिसांनी  न्यायालायाला दिले पाहिजेत. कारण अशा अमानुष श्वाप्वदांना मोकऴीक मिऴता कामा नये. ही हिस्र जनावरं फासावर गेलीच पाहिजेत याबाबत तडजोड अजिबात करू नये. मग तो कोण आहे ? कुठल्या जातीचा आहे ? कुठल्या धर्माचा आहे ? याचा काही संबंध नाही. हल्लेखोर फासावर लटकवले गेलेच पाहिजेत. याबाबत आमचे अजिबात दुमत नाही.

      पालघरच्या घटनेवरून महाराष्ट्रातील भाजप नेते व भाजपाकडे वैचारिक अंग गहाण टाकलेल्या लोकांनी समाजमन भडकावण्यास सुरूवात केली आहे. प्रारंभी अनेक खोटे मेसेज सोशल मिडीयात पसरवून लोकांना चिथावणी देण्याचे काम चालवले आहे. साधूंच्या हत्येचे संधीसाधू राजकारण चालवले आहे. मेलेल्या माणसाच्या मढ्यावरचे लोणी खाण्याची प्रवृत्ती नालायकीत मोडणारी असते. भाजपवाले आपली हिच प्रवृत्ती असल्याचे परत परत दाखवून देत आहेत. या सगऴ्या कुरापतींना, उचापतींना देवेंद्र फडणवीस खतपाणी घालत आहेत. मुऴात तेच व्यापक भूमिका घेत नाहीत. महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे थिल्लर आणि चिल्लर राजकारण करत आहेत. ते ज्या लायकीचे राजकारण करत आहेत तसे राजकारण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतही होत नाही. राजकारणात सगऴ्यात थर्ड क्लास राजकारण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत होते. पण ग्रामपंचायतीचे म्हणजे गल्लीतले राजकारण आज खुपच सभ्य वाटते आहे. सध्या भाजपवाल्यांच्या राजकारणाने ती पातऴीही ओलांडली आहे. देवेंद्र  फडणवीस स्वत:ची उरली-सुरली अब्रूही काढून घेत आहेत. स्वत:च्या प्रतिमेची वाट लावून घेत आहेत. त्यांनी साधूंच्या मॉब लिंचींगवरून सरकारवर टिका केली आहे. पण ते मुख्यमंत्री असताना मॉब लिंचींगचे प्रकार या महाराष्ट्रात घडलेले आहेत. त्यांच्या नागपुरातले गुन्हेगारीचे प्रमाण त्यांना रोखता आलेले नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाऴाचा अभ्यास केला तर या बाबी लक्षात येतील. ते स्वत:च गृहमंत्री होते. गुन्हेगारी मोकाट सुटलेली होती. आज त्याच भाजपाचे काही लोक गृहमंत्र्यांचा राजिनामा मागत आहेत. एकूणच भाजपवाल्यांच्या मानसिकतेला कोरोना झालाय की दांभिक राजकारणाचा कुष्टरोग झालाय ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्यावाचून रहात नाही. त्यांना कशाचेच भान राहिलेले दिसत नाही. ते साधूंच्या हत्येवरून संधीसाधू राजकारण करू लागले आहेत. या हत्येला धर्माचे रंग चढवत सोशल माध्यमातून अत्यंत भडकावू वक्तव्ये करणारी माणसं पुढं आणली जात आहेत. मुऴातच हत्या करणारे आणि ज्यांची हत्या झाली त्यातले कुणीच परधर्मीय नाहीत. तरीही या घटणेला धर्माचा रंग फासून लोकांना भडकावण्याचे काम चालवले आहे. भाजपच्या आणि संघ परिवाराच्या वऴचणीच्या लोकांनी लगेच "जस्टीस फॉर साधू" असे स्टेटस व डीपी ठेवत वातावरण कसे पेटेल ? यासाठी प्रयत़्न चालवला आहे.

       सरकारने हल्लेखोरांना अटक केली आहे. हल्लेखोर आज तुरूंगात आहेत असे असताना भाजपवाल्यांनी यात सांप्रदायिकता आणली आहे. ज्यांच्या बुडाखाली रोजच मॉब लिचींगचे प्रकार घडतात, जिथे माणसं जनावरासारखी मारली जातात त्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही लगेच उध्दव ठाकरेंना फोन करत विचारणा केलीय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही तेच केलय. एकूणच आगीत तेल ओतण्याचे काम पध्दतशीरपणे चालू आहे. खरेतर अमित शहा आणि आदित्य नाथ यांना याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? त्यांच्या बुडाखाली काय घडतय ? गुजरात, युपीत अशी किती हत्याकांडं होतायत ? आयपीएस अधिकार्याला अशीच हिंस्त्र झालेली झुंड एकत्र येवून मारते, मुलीवर बलात्कार करून तिच्यासह तिच्या बापाला मारले जाते. कित्येक दलितांना निघृणपणे मारले जाते. हे असले प्रकार ज्यांच्या बुडाखाली सातत्याने होतायत त्यांनी पालघर घटनेवर बोलावं का ? त्यांनी विचारणा करावी का ? हे हास्यास्पद नाही काय ? खरेतर पालघरची घटना संतापजनक व निंदाजनक आहे. कुठल्याही संवेदनशील माणसाची तऴपायाची आग मस्तकात जाईल अशीच आहे. पण म्हणून त्यावर राजकीय वांगी भाजायला कोणी येवू नये. सामान्य जनतेच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना असल्या हलकट राजकारणाचे पट मांडू नयेत. पालघर घटणेबाबत सोशल माध्यमात तर अतिशय भडकावू मेसेज टाकून लोकांना चिथावले जात आहे. हा एकूणच प्रकार लाजिरवाणा आहे. राज्यासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना असले विकृत राजकारण का केले जात आहे ? जरा तरी जनाची नाही मनाची लाज ठेवायला हवी ना. कुठलीच सत्ता कायमची नसते. सत्तेचा मुकूट परिधान करून कुणी जन्माला येत नाही. ज्या इग्लडच्या सत्तेवर सुर्य मावऴत नव्हता ती सत्ताही अस्ताला गेली. तिच्या ठिकर्या झाल्या. महासत्ता असलेल्या रशियाचे तुकडे तुकडे झाले. जर्मनीचा शक्तीमान हुकूमशहा हिटलरही उध्दवस्त झाला. झार गेला, मुसोलिनी गेला. इतकेच नव्हे तर जग जिंकणारा सिंकदरही गेला. मग या टिनपाटांची काय बात ? काऴाचा नियम सारखाच असतो. तो कुणालाही सोडत नाही. काऴ म्हणजे काय पैसे घेवून मुहूर्त काढणार भामटा वाटला काय ? भाजपवाल्यानो, सामान्य लोकांचे राहू द्या किमान काऴाचे तरी भय बाऴगा आणि सावध व्हा. अन्यथा आज जे पेरताय ते जेव्हा उगवेल तेव्हा तुमचा भस्मासुर झाल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!