नोकर
नको, सहकारी हवा आहे !
आमचा इतिहास
आमच्या संस्थेची सुरुवात सन २००७ साली
झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल www.abnnitv.asia या
नावाने आम्ही सुरु केले. तोपर्यंत ABP माझा (पूर्वाश्रमीचे STAR माझा), Zee २४तास
आणि साम टीव्ही फक्त सैटेलाईट ब्रॉडकास्टच करत होते. आम्ही जगातील २ नंबरचे आणि
आशिया खंडातील पहिले ग्रामीण टीव्ही चैनेल नेटवर्क आहोत. आम्ही डॉ एपीजे अब्दुल
कलाम यांना फॉलो करतो.
आम्ही जगातील विविध पत्रकार संघटनाच्या
सोबत संलग्नित आहोत. व्यवसाय आणि पत्रकारितेचे व्रत आम्ही निष्ठेने आणि ध्येयाने
या आजच्या पत्रकारितेच्या-वेश्यावृत्तीत ही जपले आहे. पत्रकारिता क्षेत्रात आम्ही
गेली १५ वर्षे सातत्याने ग्रामीण वार्ताहर, प्रतिनिधी आणि त्यांचे जीवनमान यांचा
प्रकर्षाने अभ्यास करतो आहोत. पत्रकारिता क्षेत्रातील वास्तव page ३ या चित्रपटात
मधुर भांडारकर ने खूप लीलया हाताळले आहे. आर्थिक अडचणी आणि व्यवसायिक गळेकापू
स्पर्धेत आम्ही थोडे मागेच राहणे पसंद केले होते, “पत्रकारितेच्या नैतीकतेसाठी आणि
पवित्र्यासाठी”
काळ
बदलला
पण आज काळ बदलला आहे. तुमच्या
नैतिकतेला आणि शांत बसण्याला तुमची कमजोरी म्हणून ओळखले जात आहे. आज पुन्हा एकदा
भारत गुलामीत-पारतंत्र्यात अडकला आहे. जस्टीस लोया यांचा संशयास्पद मृत्यूनंतर
भारतीय न्यायालय आणि त्या न्यायालयात काम करणारे न्यायाधीश व सरकारी वकील मंडळी कमालीच्या
दहशतीत जगत आहेत. सर्व सामान्य लोकांना न्याय हा मृगजळ झाले आहे. न्याय फक्त विकत
घेता येतो आणि हवं तसे त्याला एडी, CBI आणि RAW ची मदत घेऊन वळवता येतो. भारत
देशातील सुधारणावादी आणि स्वतंत्र विचारसरणीचे राज्य फैसिस्ट विचारसरणीच्या
लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे विविध प्रलोभने दाखवून विकासाच्या नावाखाली
कागदीघोडे नाचवून भकास करायचे काम सुरु आहे.
स्वत:
जागृत होणे गरजेचे आहे.
यासाठी आम्ही आमच्या देशहित-देशभक्त
विचाराच्या लोकांचे एक संविधानिक मजबूत संघटन उभा करत आहोत. आम्ही आमच्या प्रत्येक
सहकाऱ्याला किमान पक्षी उज्ज्वल भवितव्य आणि समाधानकारक आनंदी जीवनमान देण्याचा
प्रयत्न करत आहोत. “कष्टाविना ना मिळे भाकर,तुका म्हणे”. यासाठी स्व जागृत
असलेल्या किंवा जागृत होऊन जगण्याची इच्छाशक्ती असलेल्यांना आम्ही आमचे सहकारी
होण्यासाठी आवाहन करत आहोत. कारण एक एक माणूस जागृत झाला कि समाज जागृत होईल आणि
देशावरील बालट टळेल.
नोकर
नको, सहकारी हवा आहे !
आम्हांला नोकर नको सहकारीच हवा
आहे. का ? कारण गेल्या १५ वर्षात आम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक
वृत्तपत्रे उभारताना बघितली, विकताना आणि बंद होताना, सुद्धा बघितली. या
सर्वाच्यात एक मुख्य घटक असलेला ग्रामीण वार्ताहर किंवा प्रतिनिधी मात्र आहे तिथेच
आम्ही बघितला. उलट त्याला आम्हीं तुटताना आणि आत्महत्या करताना सुद्धा बघितले.
आर्थिकदृष्ट्या खचताना आणि स्वतच्या पोरा बाळांना विष पाजताना सुद्धा बघितले.
दुसऱ्याला न्याय देणारे पण स्वत: मात्र घाबरलेले भेदरलेल्या अवस्थेतील न्यायाची
याचना करताना बघितले आणि जगाच्या कौतुका साठी हजारो शब्द लिहिणारा आणि कौतुक सोहळे
भरवणारा स्वत:साठी आणि स्वत:च्या पोरांच्या कौतुकाला मुकलेलाही आम्हीं बघितला आहे.
हजार-दोन हजारच्या तुटपुंज्या मानधनावर जगण्याची कसरत करणारा आणि जाहिरातीसाठी
आमदार-खासदारांची तळवे चाटणारा प्रतिनिधी आम्ही याची देही-याची डोळा बघितला आहे.
उत्पन्न कमी म्हणून लग्न करायला घाबरणारा आणि वार्ताहर आहे म्हणून कर्ज-नोकरी ही न
मिळणारा ग्रामीण वार्ताहर आम्हीं बघितला आहे. किबहुना बघतो आहोत. आज whats एप आणि
सोशल मिडिया मुळे ग्रामीण वार्ताहर-प्रतिनिधी ची गरज तशी कुणालाच भासत नाही.
हे का झाले-
होते आहे?
कॉपी-पेस्ट करण्याची घाण खोड, कमी
शिक्षण, व्यवसायिक दृष्टीकोणाचा अभाव, मार्गदर्शन व पाठबळ नसल्यानेच झाले. एकांगी
जीवन प्रणाली. वार्ताहर असताना चढलेला पत्रकारितेचा कैफ. ही धुंदीच माणसाला प्रगती
करू देत नाही. उद्योगपती व्हावं महिन्याला जास्त नाही पण किमान एक लाख रुपयाची तरी
मिळकत करावी असा विचार कधी मनाला शिवलाच नाही. किंबहुना तसा विचार तुमच्या मनात
येऊ नये म्हणूनच आपले बगलबच्चे चौकडी यातून आपल्याला बाहेर पडू देत नाही.
आजही आम्हीं जाहिरात दिली कि आमच्याकडे
नोकरीच मागितली जाते. पण आम्हांला काम चलाऊ मानसिक गुलामगिरी ने ग्रस्त नोकर नकोच
आहे. स्वतंत्र विचार सारणीचा, प्रत्येक संकटात संधी पाहणारा आणि बाजारातील जोखीम घेऊन उद्योजकपत्रकार म्हणून
ओळख निर्माण करू पाहणारा सहकारी आम्हांला हवा आहे.
संधी-मार्गदर्शन आणि साथ आम्हीं देणारच
सोबत यायची मानसिक-शारीरिक आणि आर्थिक तयारी आपणाकडे हवी?
मन
करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण !
इथे आपल्याला काय मिळेल. जे तुम्हाला
हव आहे ते! इथे मिळेल तुमचा वृद्धिंगत झालेला आत्मविश्वास. वाढलेले आर्थिक उत्पन्न
आणि जागितक स्तरावरील पद आणि प्रतिष्ठा !
निर्णय
सर्वस्वी आपला !
कल्याणपर्णमस्तू ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!