जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

सामाजिक न्याय हा भारतीय लोकशाहीचा गाभा आहे : अँड.गजानन सावगावे

स्वातंत्र्य, समता, बंधुता यांवर आधारित सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय असलेली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांना आपण भारतीय आहोत याची जाणीव झाली पाहिजे - अमोल मडामे 

सामाजिक न्यायाच्या संदर्भात समकालीन भारतातील संविधानिक समस्या व उपाय

डॉ. वर्षा रामचंद्र चौरे यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करताना मान्यवर 



मुंबई, दि. १३/०२/२०२० (प्रतिनिधी)

यशराज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा  आणि WJRC च्या भारत  देशाच्या राष्ट्रीय प्रमुख डॉ.वर्षा रामचंद्र चौरे-भारतीय यांच्या वाढदिवसा निमित्ताने "सामाजिक न्यायाच्या संदर्भात समकालीन भारतातील संविधानिक समस्या व उपाय" या विषयावर सत्याग्रह महाविद्यालय सभागृह खारघर या ठिकाणी वतीने चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक न्याय हा भारतीय लोकशाही चा गाभा आहे असे म्हणत अँड.गजानन सावगावे यांनी भारतीय संविधानातील कलमाबद्दल अतिशय सविस्तर माहिती दिली. सामाजिक न्याय जोपासण्यासाठी आपल्याला जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन सलोखा प्रस्थापित करणे गरजेचे आहे असे मत डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले. राजकीय सत्ता हीच आपल्याला समांतर सामाजिक न्याय मिळवून देवू शकते असे मत एस. एल. अक्किसागर यांनी मांडले. आपण आपल्या महापुरुषांच्या विचारांचे पाईक होवून समाजात एकता स्थापन केली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. जे. पी. बघेल यांनी केले तर राजकीय लोकांची इच्छा शक्तीच  सामाजिक समस्या सोडवू शकते असे मत अँड. एम. ए. पाचपोळ यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांवर आधारित सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय असलेली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांना आपण भारतीय आहोत याची जाणीव झाली पाहिजे व त्यातून आपण सामाजिक लोकशाही विकसित करू शकतो असे अध्यक्षीय भाषणात अमोल मडामे यांनी सांगितले.

चर्चासत्रात अँड.गजानन सावगावे - जेष्ठ विधितज्ञ मुबई उच्च न्यायालय, अँड.अभिमान पाटील मुंबई उच्च न्यायालय, एस.एल.अक्कीसागर, चंदूदादा जगताप, अँड.एम.ए.पचपोळ, डॉ. जे.पी.बघेल आदी मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

 यावेळी डॉ. वर्षा रामचंद्र चौरे यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमोल स. भा. मडामे भारतीय हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.जी के डोंगरगावकर, प्रमुख पाहुणे रामशेठ ठाकूर, अहवेश कुमार यादव, वीरेंद्र धीवर, स्टीव्ह डाबरे, गीता चौधरी, अशोक गुरखे, ब्रिजेश पटेल आदि मान्यवरांच्या उपस्थितीत  कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.वर्षा चौरे भारतीय यानी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!